वसई : पंतप्रधान हा देशाचा असतो, तो कुठल्याही पक्षाचा नसतो. त्यामुळे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी भाजपाचा प्रचार करू नये असे शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणकावून सांगितले. मंगळवारी वसई महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजप गोमूत्रधारी तसेच बुरसटलेल्या मानसिकतेचा पक्ष असून मला नकली शिवसेना म्हणणारे भाकड जनता पक्षाचे नेते बेअकली नेते आहेत अशा शब्दात त्यांचा खरपूस समाचार घेतला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा मंगळवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर येथील मैदानात आयोजित करण्यात आली होती. आपल्या पाऊण तासांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजप तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर घणाघाती हल्ला केला.

हेही वाचा : मिरा भाईंदरला गणेशोत्सवापूर्वी ४० दश लक्ष लीटर पाणी; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रचारसभेत आश्वासन

पंतप्रधान हा कुठल्या पक्षाचा नसतो मात्र नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असून भाजपाचा प्रचार करत आहे. तो प्रचार करणे त्यांनी थांबावं असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले ल. यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाचा हवाला त्यांनी दिला. तुम्ही कितीही इंजिनाचे डबे लावा तुमचं दिल्लीचं इंजिनच बदलून टाकू असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाने देशात कंत्राटी पद्धती आणली आहे. देशात कोणाला काय कायम स्वरूपी रोजगार नाही कंत्राटी पद्धतीने अग्निववीर आणि कामगार पद्धती आणली आहे. त्यामुळे तुमचे कंत्राट येत्या निवडणुकीत रद्द करू असे उद्धव ठाकरे म्हणाले. जीएसटी मुळे व्यापारी देश घडला लागले आहेत आमची सत्ता आल्यावर हा ‘कर दहशतवाद’ संपवणार असेही त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलण्याचे भाजपाचा षड्यंत्र आहे. महाराष्ट्राबद्दल असलेल्या आकसातून हे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला

राष्ट्रपतींना आदिवासी म्हणून डावलले

राम मंदिरावरून भावनिक राजकारण करणाऱ्या भाजपाने राष्ट्रपती द्रोपदीमुळे यांना सोहळ्यासाठी का बोलावले नाही? त्या आदिवासी म्हणून त्यांना डावलले का? असा सवाल केला. राम मंदिर हे मोदींच्या नाही तर न्यायालयाच्या निर्णयानंतर झाल्याचेही त्यांनी सांगितलं होतं.

हेही वाचा : उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांची नालासोपार्‍यात सभा, इंडिया आघाडीवर टीका

मोदी सरकारच्या फसव्या जाहिरात

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारकडून सुरू असलेल्या फसव्या जाहिरातींचाही समाचार घेतला. पंतप्रधान आवास योजना गॅस या योजना फसव्या असून नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार आपल्या मुलांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजकारण करत असताना आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी वसईतील सभेत केला होता.त्याला उत्तर देताना तुम्ही बोहल्यावर नावरदेवा सारखे का चढला? आता सवाल केला

प्रफुल पटेल यांनी संभाजी महाराजांचा अपमान केला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल पटेल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डोक्यावरील जिरेटोप मोदींच्या डोक्यावर लावून महाराजांचा अपमान केला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.महाराजांचे जिरेटोप ज्यांच्या डोक्यावर ठेवताय ते डोकं तरी आधी तपासा असेही ठाकरे यांनी या सभेत सांगितले.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी काय चालते?

भाईंदर पश्चिमेच्या भागातील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये सुरवातीला संस्कार शिबिरातून माणसे घडविण्याचे काम केले जात होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबिधिनी मध्ये आता काय चालते ते सुद्धा तपासून बघायला हवे. तेथे सुद्धा ईडी, आयकर विभागाच्या धाडी टाकून काय सुरू आहे याचा तपास करायला हवा असे ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा : देश शरिया कायद्यावर चालू देणार नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कॉंग्रेसवर घणाघात

शिट्टीला मत देऊन नासवू नका

मते फोडण्यासाठी भाजपने उमेदवार उभा केला आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारावर टीका केली. परंतु शिट्टीला मत देऊन ते मत नासवू नका असे ठाकरे यांनी बहुजन विकास आघाडीचे नाव न घेता सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In vasai uddhav thackeray criticize pm narendra modi for his campaign for bjp css