Today’s Gold Silver Price : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. यात सध्या लग्न सराईचे दिवस सुरु असल्याने बाजार पेठांमध्येही सोने- चांदी खरेदीला मोठी पसंती मिळत आहे. पण सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे ग्राहकही चिंतेत आहे. काही दिवसांत १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दर जवळपास १ लाख रुपयांवर पोहोचला होता. मात्र आज २१ मार्च २०२५ रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. आज सोन्याचा दर २७० रुपयांनी तर चांदीचा दर ६२० रुपयांनी कमी झाला आहे. पण तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा दर नेमका काय आहे जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात आज सोन्या-चांदीचा दर नेमका काय आहे? ( Gold-Silver Price On 21 March 2025)

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८८, ८६० रुपये आहे. तर २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८१,४४६ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९९१ रुपये आहे, तर आज १ किलो चांदीचा दर ९९,०१० रुपये झाला आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या- चांदीच्या घसरण झाली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर सारख्या शहरांतही हे दर घसरले आहेत.

आज १ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर विचारात घेतल्यास तो ८,८८६ रुपये आहे. तर २२ कॅरेटचा दर ८,१४६ रुपये आहे.

पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८८, ७१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८८,७१० रुपये आहे.
नागपूर२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८८,७१० रुपये आहे.
नाशिक२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८१, ३१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८८, ७१० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आदल्या दिवशीचा म्हणजे २० मार्च २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१३० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९९, ६३० रुपये होता. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज २७० रुपयांनी तर चांदी ६२० रुपयांनी घसरले आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today gold silver price fall down today 13 march 2024 maharshtra mumbai gold silver rate today in marathi check todays gold silver price in your city sjr