Maharashtra News Updates : भारत आज आपला ७९ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. राजधानी दिल्ली ते देशाच्या प्रत्येक हा दिवस साजरा केला जात आहे. दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यांनंतर पंतप्रधान देशाला संबोधित करत आहेत. मोदींनी लागोपाठ १२व्या वेळा तिरंगा झेंडा फडकवला. असे करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान बनले आहेत.
मुंबई महापालिकेचे अभियंते पदोन्नतीपासून वंचित, दुय्यम अभियंत्यांची पदे बाहेरून भरणार
मुंबई : विसर्जित गणेशमूर्ती २४ तासच पाण्यात, पीओपी गणेशमूर्ती पुनर्प्रक्रियेसाठी पाठवणार
गोरेगाव – बोरिवलीदरम्यान जलद लोकल धावणार नाही
मुंबई : कल्याण-कसारादरम्यान ब्लॉक
मुंबई : जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी रुग्णालये सज्ज
…तर अशा मुलींचाही वडिलांच्या मालमत्तेवर अधिकार, उच्च न्यायालयाचा तीन बहिणींना दिलासा
मुंबई : अभियांत्रिकीच्या दुसऱ्या फेरीत केवळ १८ टक्के विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश, पहिल्या फेरीच्या तुलनेत प्रवेशात घट
तीव्र वास क्षमतेचे बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वानपथक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दाखल
पोलीस, सरकारी कर्मचारी ‘झोपडीवासीय’? बायोमेट्रीक तपासणीत अडथळा
मुंबई : २३ व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या, ओबेरॉय संकुलातील चौथी आत्महत्या
आंबा घाटात दरड कोसळली; वाहतुकीला फटका
हिंदू खाटीक संघटनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचे अभिनंदन
हिंदू खाटीक संघटनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचे अभिनंदन करण्यात आले. आमच्या आंदोलनाला आव्हाड यांनी पाठिंबा दिला आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत, असे हिंदू खाटीक संघटनेचे पदाधिकारी समीर मानकर यांनी सांगितले.
सवलती देऊनही १० वर्षांत घरांच्या किंमती कमी झाल्या नाहीत, मुख्यमंत्र्यांकडून विकासकांची कानउघाडणी
दापोलीत ५.४५ कोटींची व्हेलची वांती जप्त; कस्टम विभागाची मोठी कारवाई
मुंब्रा रेल्वे स्थानकात १५ डबा लोकलच्या थांब्यासाठी एक ते तीन फलाटांचा विस्तार
आपल्या शहिद मुलाच्या स्मारकासाठी ते १९ वर्षे लढले; अखेर स्मारकाला मिळाली अधिकृतता, स्वातंत्र्यदिनी पालकांचे स्वप्न पूर्ण
गडकरी रंगायतन शिवाय ठाण्याला शोभा नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर प्रवाशी रिक्षांसाठी; कराड, मलकापूर शहरांसह लगतच्या परिसरात छापे; ११ जणांविरुद्ध गुन्हे
धुळ्याच्या पालकमंत्री पदावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रतिक्रिया
काल नाशिक येथे प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की धुळ्याचे पालकमंत्री पद मला देण्यासाठी सांगितले होते मात्र मी तेव्हाही स्पष्ट बोललो होतो की देणार ते नाशिकला द्या नाहीतर मला धुळ्याला नको आणि कुठेही नको अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज राज्याची पणन तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर मत व्यक्त केले आहे. छगन भुजबळ हे महाराष्ट्र आणि महायुतीचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून नेमका हा विषय काय आहे हे समजून घेऊ अशी सावध प्रतिक्रिया धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली.
कराडजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
मनोज जरांगे यांच्या कायद्यात बसणाऱ्या मागण्यांना माझे समर्थन; पंकजा मुंडेंनी केलं स्पष्ट
मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतील त्यांना माझं समर्थन असल्याचे जालनाचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. जरांगे यांच्या ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांचे मी वेळोवेळी समर्थन केले असल्याचेही पंकजा यांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान मुंबईतील नागरीक आणि आंदोलक दोघांनाही त्रास होणार नाही, असं प्रशासनाचे नियोजन असेल, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात दोषींवर गुन्हे दाखल होणारच असल्याचे देखील पंकजा मुंडे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले आहे.
” स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांची ऐतिहासिक भेट!”, फडणवीसांनी मानले आभार
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज पासून लागू केलेली ₹1 लाख कोटींची ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना’ तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरेल. यामार्फत देशातील 3.5 कोटींहून अधिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, खासगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्या मुला-मुलींना सरकारतर्फे ₹15,000 दिले जातील. या महत्त्वाकांक्षी आणि दूरदर्शी योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार!” अशी पोस्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
स्वातंत्र्यदिनी मा. पंतप्रधान मोदीजी यांची ऐतिहासिक भेट!??
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 15, 2025
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज पासून लागू केलेली ₹1 लाख कोटींची 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना' तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरेल. यामार्फत देशातील 3.5 कोटींहून अधिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार… pic.twitter.com/Ur1KXX4mPX
‘लोकभाषे’तूनच शिकवा… ज्येष्ठ भाषा अभ्यासकाची स्पष्ट भूमिका
पंतप्रधान मोदींनी एक्सवर लाल किल्ल्यावरील स्वतंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
Sharing glimpses from the Independence Day celebrations at the Red Fort.
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2025
This is a great occasion to remember our freedom fighters and reaffirm our commitment to building a stronger, self-reliant India. pic.twitter.com/hdieMsJS9I
Here are more glimpses from the Red Fort.
— Narendra Modi (@narendramodi) August 15, 2025
May India keep scaling new heights of progress! pic.twitter.com/Je8S7qi7QN
सरकार लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा राज ठाकरे यांचा आरोप
PM Modi : ‘दाम कम, दम ज्यादा’; अमेरिकेबरोबरच्या ‘टॅरिफ वॉर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य
Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार, केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान मोदी देशात घुसखोरी करणाऱ्यांच्या संकटाबद्दल म्हणाले की, सीमेलगतच्या भागात डेमोग्राफी बदलत आह. आम्ही आपल्या देशात घुसखोरांनाच्या हवाली करू शकत नाहीत. घुसखोर आदिवासी यांना फसवतात. ते आदिवासींचा रोजगार हिसकावून घेत आहेत. मी देशाला या आव्हानाबद्दल सांगू इच्छितो. आण्ही यासाठी हाय पॉवर डेमोग्राफी मिशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने लाल किल्ला येथून दिलेल्या भाषणात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. पीएम मोदी म्हणाले की या दिवाळीला सरकार जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येईल. यामुळे लोकांना करांमध्ये दिलासा मिळेल. याबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारत रोजगार योजना लागू करण्याची घोषणा देखील केली. या योजनेअंतर्गत प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना सरकारकडून १५००० रुपये दिले जातील. त्या कंपन्यांना देखील सरकार प्रोत्साहन देईल. या योजनेमुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi says, "My country’s youth, today is 15th August, and on this very day, we are launching a scheme worth Rs 1 lakh crore for the youth of our country. From today, the Pradhan Mantri Viksit Bharat Rojgar Yojana is being implemented…… pic.twitter.com/KKFTHevUi9
— ANI (@ANI) August 15, 2025
देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्याला अपग्रेड होण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या १० वर्षात म्हणजेच २०३५ पर्यंत देशातील सर्व महत्त्वपूर्ण स्थळे ज्यामध्ये सामरिक ठिकाणांसह सिव्हीलीयन स्थळे जसे की रुग्णालये, रेल्वे, आस्थेची ठिकाणी यांना तंत्रज्ञानाच्या नव्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने सुरक्षेचे कवच दिले जाईल. देशाच्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटले पाहेज. कोणतेही तंत्रज्ञान असले तरी आपले तंत्रज्ञान त्यापेक्षा सरस ठरले पाहिजे. २०३५ प्रर्यंत मी राष्ट्रीय सुरक्षा कवचचा विस्तार करू इच्छितो, त्याला अधूनिक बनवू इच्छितो. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेत, त्यांच्या सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे. देश मिशन सुदर्शन चक्र लाँच करेल.
हे सुदर्शन चक्र पॉवरफुल वेपन सिस्टम असेल, जे शत्रूचे हल्ले नष्ट तर करेलच याबरोबरच अनेक पटीने शत्रूंवर वार देखील करेल. आम्ही सुदर्शन चक्र मिशनला पुढील दहा वर्षात वेगाने पुढे घेऊन जाऊ. – पंतप्रधान मोदी