इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक काल (१९ डिसेंबर) दिल्लीत पार पडली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जागा वाटप आणि पंतप्रधान पदाचा चेहरा या दोन मुद्द्यांवर ही बैठक झाल्याचं सांगण्यात येतंय. तसंच, पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्याही नावाचा प्रस्ताव समोर आला आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, इंडिया आघाडीची पाटणा, मुंबई आणि बंगलोर येथे बैठक झाली. दिल्लीत काल जी बैठक झाली तिथे समन्वयक, पंतप्रधान या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली. बहुसंख्य पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. काल उद्धव ठाकरे दिल्लीत होते. त्यांनी महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या.. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह बैठक घेतली. इंडिया आघाडीच्या बैठकीआधीही उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव आला. काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्या पक्षात चर्चा होईल, मग निर्णय होईल.

हेही वाचा >> निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक; केल्या ‘या’ सूचना!

मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला उद्धव ठाकरेंचा विरोध आहे का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला विरोध केलेला नाही. काही प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात, त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी विरोध होत असल्याने मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगण्यात येतंय. त्यावर संजय राऊत म्हणाले, राहुल गांधींना सत्तेवर येण्याची इच्छा नसून राहुल गांधी हे इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत. ते त्यांच्या संघटनाबांधणीवर लक्ष देत आहे, काँग्रेसच्या बांधणीवर लक्ष देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, अत्यंत विचारपूर्वक आणि सगळ्यांशी चर्चा करून कालचे प्रस्ताव आले आहेत. जेव्हा प्रस्ताव येतो, ३० पक्ष एकत्र असतात तेव्हा निर्णय यायला वेळ लागतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kharges name forward as opposition to rahul gandhi for the post of prime minister sanjay raut said to come to power sgk