PM Narendra Modi Speech : गेल्या चार महिन्यांपासून मणिपूरमध्ये अंतर्गत असंतोष व हिंसाचाराच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. यावर पंतप्रधान मोदींनी अद्याप संसदेत भूमिका न मांडल्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. यानंतर विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या भाषणांमध्ये मोदींवर अनेक आरोप व टीका-टिप्पणी झाल्यानंतर पंतप्रधानांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं.
अखेर आज हे पंतप्रधानांच्या उत्तराचा संसदेच्या कामकाज पत्रिकेत समावेश करण्यात आला.
PM Modi No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदेत भाषण…
जे शब्द आपल्या पंतप्रधानांविषयी वापरलेत, मी म्हणेन या सभागृहात नाही, देशाच्या जनतेसमोर माफी मागायला हवी – ज्योतिरादित्य सिंदिया
#WATCH | Union Minister Jyotiraditya Scindia says,"…Mujhe 20 saal ho gaye hai iss sansad mai lekin aisa drishya maine do dashak mein nahin dekha hai…Pradhan Mantri ke prati jo shabd istemal kiye gaye hai vipaksh ke dwara mai manta hu sadan ke samne nahi lekin desh ki janta ke… pic.twitter.com/ZVrHWc22q8
— ANI (@ANI) August 10, 2023
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत सविस्तर भूमिका मांडल्यानंतर आज खुद्द पंतप्रधानांच्या भाषणाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
पंतप्रधान मोदी मणिपूरच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच संसदेसमोर आपली भूमिका मांडणार असल्यामुळे त्यांच्या भाषणातील मुद्द्यांच्या आधारे सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे.
अविश्वास प्रस्तावावर संध्याकाळी ४ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. १० ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. (Photo – PTI)
PM Modi No Confidence Motion Live: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधकांच्या टीकेला पंतप्रधानांचं उत्तर