जगातील सर्वात उंच रेल्वेचा पूल भारतात आहे. याच पूलाला ‘चिनाब रेल्वे पूल’ असे म्हटले जाते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज या ‘चिनाब रेल्वे पूला’ची एक झलक अधिकृत ट्विटर (एक्स) अकाउंटवर शेअर केली आहे. हा पूल म्हणजे केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैंकी एक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जम्मू आणि काश्मीरला जोडले जाते. जम्मूच्या रियासी जिल्ह्यात हा पूल असून पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षाही उंच आहे. त्यामुळे या चिनाब पूलाला रेल्वे क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून ओळखले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार वारा आणि भूस्खलनाचा धोका असतो. अशा प्रदेशामध्येही हा जगातील सर्वात उंच रेल्वेचा पूल स्थित आहे. या पूलाला ‘अभियांत्रिकी चमत्कार’ म्हणूनही ओळख मिळाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ‘चिनाब रेल्वे पूला’चा एक व्हिडीओ एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर केला आहे. तसेच पोस्टमध्ये ‘चिनाब रेल्वे पूल हा भारताचा अभिमान’ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाची मोठी खेळी, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांना दिली उमेदवारी

‘चिनाब रेल्वे पूला’ची वैशिष्ट्ये काय आहेत?

चिनाब रेल्वे पूल हा भूकंप-प्रतिरोधक आहे. जगातील सर्वात उंच सिंगल कमान असलेला हा रेल्वे पूल आहे. रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर हा पूल निर्माण करण्यात आलेला आहे. या एकट्या चिनाब पुलासाठी अंदाजे 14 हजार कोटी रुपये खर्च आला असल्याचे सांगितले जाते. काश्मीरला इतर राज्यांशी जोडण्याचे काम हा पूल करतो. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरसाठी हा पूल एक महत्त्वाचा घटक मानला जातो. चिनाब रेल्वे पूल हा नदीच्या पात्रापासून तब्बल ३५९ मीटर उंचीवर आहे. तसेच या पूलाची लांबी १.३ किमी आहे. हा पूल पॅरिस येथील ‘आयफेल टॉवर’ पेक्षा ३५ मीटर जास्त उंच आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World highest railway bridge chinab video in ashwini vaishnaw twitter share marathi news gkt