गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपू्र्वी राज्यसभेची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचे समोर आले होते. त्यामुळे अभिषेक मनू सिंघवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. क्रॉस मतदान केल्याप्रकरणी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी काँग्रेसच्या सहा आमदारांना अपात्र ठरवले होते.

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आमदारांनी गेल्या आठवड्यात भाजपात प्रवेश केला होता. यानंतर भाजपाकडून सहा आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

nilesh kumbhani
भाजपा उमेदवाराला जिंकून देणारा काँग्रेस उमेदवार बेपत्ता; गुजरातमध्ये नक्की काय घडतेय?
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
odisha assembly elections BJD chief Naveen Patnaik chosen to contest from two seats
ओडिशाचे मुख्यमंत्री दोन जागांवर लढवणार निवडणूक; काय आहेत डावपेच?
congress bastar candidate kawasi lakhma
“यंदा मोदी लाट नाही, आमचा विजय निश्चित”, काँग्रेसच्या उमेदवाराचा दावा

कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. यासाठी भाजपाने आज (२६ मार्च) उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये धर्मशाळामधून सुधीर शर्मा, सुजानपूरमधून राजिंदर राणा, लाहौल स्पीतीमधून रवी ठाकूर, बडसरमधून इंदर दत्त लखनपाल, गगरेटमधून चैतन्य शर्मा, कुतलाहारमधून देवेंद्र भुट्टो यांना तिकीट दिले. या सहा मतदारसंघात १ जून रोजी मतदान होणार आहे.

हेही वाचा :शिवाजीराव आढळराव पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश, शिरूर लोकसभेचं तिकीट पक्कं?

काँग्रेसचे सरकार कोसळण्याची शक्यता किती?

राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्यामुळे काँग्रेसला धक्का बसला होता. यानंतर या आमदरांवर कारवाई झाली होती. यानंतर हे आमदार भाजपाकडून पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांना भाजपाने उमेदवारीही दिली. या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार जिंकून आले तर काँग्रेसचे सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत एकूण ६८ आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला ४० तर भाजपाला २५ जागा मिळाल्या होत्या. तसेच तीन अपक्ष उमेदवार निवडून आले होते. हिमाचल प्रदेशमध्ये बहुमतासाठी ३५ आकडा आहे. त्यामुळे भाजपाने पोटनिवडणुकीत सहा जागा जिंकल्या तरी आकडा ३१ पर्यंत जातो. तर अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेचे एकूण संख्याबळ ६५ होईल. त्यामुळे बहुमतासाठी ३३ चे संख्याबळ आवश्यक असेल. मात्र, सध्या काँग्रेसकडे ३४ आमदार आहेत.