India vs Australia 3rd ODI: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना राजकोट येथे खेळवला जाईल. ज्यासाठी टीम खास चार्टर्ड विमानाने राजकोटला पोहचली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या देखील पोहचले असून अंतिम सामन्यातील प्लेईंग-११मध्ये ते आपल्याला खेळताना दिसतील. दोन्ही संघांमधील मालिकेतील अंतिम सामना २७ सप्टेंबर रोजी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता खेळवला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या वन डे मालिकेवर कब्जा केला आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ९९ धावांनी जिंकली. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला विजयाची नोंद करून मालिका क्लीन स्वीप करायची आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळले नाहीत. त्याच्या अनुपस्थितीत राहुलने संघाची कमान सांभाळली. मात्र, आता हे तिन्ही खेळाडू तिसऱ्या वन डेत संघात सामील होतील. शुबमन गिल आणि शार्दुल ठाकूर या दोन्ही खेळाडूंना शेवटच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराह विश्रांतीमुळे दुसऱ्या वन डेत खेळला नाही. बीसीसीआयने ट्वीट केले होते की, “संघ व्यवस्थापनाने त्याला त्याच्या कुटुंबाला भेटण्याची आणि थोडा वेळ सुट्टी घेण्याची परवानगी दिली आहे. दुसऱ्या वनडेसाठी बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाज मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात आला होता. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील राजकोट येथे होणाऱ्या तिसऱ्या वन डेसाठी बुमराह उपलब्ध असेल.”

युजी चहलला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळाले नाही

भारतीय स्टार यूजी चहल बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे आणि त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठीही निवड झाली नाही. याशिवाय २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही त्याला दुर्लक्षित करण्यात आले आहे. मात्र, आर. अश्विन अजूनही विश्वचषक संघाचा भाग होऊ शकतो. त्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळत असून, खेळाडू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे.

हेही वाचा: Asian Games, Hockey: चक दे इंडिया! हॉकीत भारतीय संघाचा दबदबा कायम, एक-दोन नव्हे पुन्हा १६ गोल करत सिंगापूरचा उडवला धुव्वा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus team india reached rajkot for the third odi rohit kohli and pandya will also be included avw