Indian Hockey Team Beat Singapore: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने गट टप्प्यातील सलग दुसऱ्या सामन्यात सिंगापूरचा १६-१ असा दारूण पराभव केला. भारताने या सामन्यात सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली होती. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताची सुरुवात चांगली झाली त्यांनी एक गोल केला. यानंतरही संघाचा गोल करण्याचा क्रम थांबला नाही आणि भारताने एकापाठोपाठ एक गोल करत शानदार विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक ४ गोल केले दुसरीकडे, मनदीप सिंगने गोलची हॅट्ट्रिक केली.

आशियाई क्रीडा स्पर्धेत याआधी भारतीय हॉकी संघाने ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा १६-० असा पराभव केला होता. आज हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सिंगापूरचा १६-१ असा पराभव केला. मनदीप सिंगने १३व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. पहिल्या क्वार्टरअखेर भारताने १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला १६व्या मिनिटाला ललित कुमारने भारतासाठी दुसरा गोल केला.

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

टीम इंडियाने सिंगापूरला सामन्यात परत येण्याची संधीच दिली नाही. यानंतर २२व्या मिनिटाला गुजरांतने संघासाठी तिसरा गोल केला तर २३व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने संघासाठी चौथा गोल करत भारताची आघाडी आणखी वाढवली. गोल करण्याची संधी कर्णधार हरमनप्रीत सिंगने देखील सोडली नाही. त्याने शानदार हॉकी खेळत संघाच्या खात्यात पाचवा गोल केला. मनदीप सिंगने २९व्या मिनिटाला आपला दुसरा आणि संघाचा सहावा गोल केला. अशा प्रकारे भारताने पूर्वार्धात ६-० अशी आघाडी मिळवली.

उत्तरार्धातही भारताने खळबळ उडवून देत धमाकेदार सुरुवात केली

दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ३७व्या मिनिटाला मनदीप सिंगने संघासाठी ७वा आणि ३८व्या मिनिटाला समशेर सिंगने ८वा गोल केला. त्यानंतर ४०व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल केले. अशाप्रकारे दुसऱ्या हाफला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच भारताने १०-० अशी भक्कम आघाडी मिळवली. ४२व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने आणखी एक पेनल्टी कॉर्नर घेत संघासाठी ११वा गोल केला. अशा प्रकारे, तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस भारताने ११-० अशी कमांडिंग आघाडी मिळवली.

हेही वाचा: Team India World Cup Jersey: विश्वचषकात टीम इंडियाच्या जर्सीचा इतिहास, ३१ वर्षात किती रंग आणि डिझाइन बदलले? जाणून घ्या

चौथा क्वार्टर सुरु होताच मनदीप सिंगने ५०व्या मिनिटाला दोन गोल केले. अभिषेकनेही वाहत्या गंगेत हात धूत मिळालेल्या संधीचा फायदा घेत ५१व्या आणि ५२व्या मिनिटाला दोन गोल केले. यानंतर ५३व्या मिनिटाला सिंगापूरच्या झकी जुल्करनैनने संघासाठी पहिला आणि शेवटचा गोल केला. अवघ्या २ मिनिटांनंतर, भारताच्या वरुण कुमारने ५५व्या मिनिटाला सलग दोन गोल करत भारताला १६-१ ने आघाडीवर नेले. अशा प्रकारे भारताने सिंगापूरविरुद्ध दणदणीत विजय नोंदवला. या विजयाने भारतीय संघ ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.