Indian Primer League Auction 2024: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबईत होत आहे. या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने २४.७५ कोटींना विकत घेतले. याच लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले. स्टार्कने आपल्या राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराचा विक्रम मोडला. त्यांना लागलेल्या या बोलीवर भारताचे दिग्गज खेळाडू यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनील गावसकर यांनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान समालोचन करताना सूचक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले आहे की, “ इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही ना? आतापर्यंत ज्या ज्या परदेशी खेळाडूंवर मोठी बोली लागली त्यांनी काय केले आहे, हे आपणा सर्वाना माहिती आहे. बेन स्टोक्स, जोश बटलर, जोश हेझलवूड, कॅमेरून ग्रीन, सॅम करन आणि जोफ्रा आर्चर यांनी पूर्ण आयपीएल सामने देखील खेळले नाहीत. प्रत्येक संघ १४ सामने खेळतो, जर तुम्ही सेमीफायनल किंवा फायनल खेळणार असाल तर १६-१७ सामने होतात. तुम्ही बघा यांचा इतिहास काढून, एकही मोठी बोली लागलेला खेळाडू संपूर्ण आयपीएल खेळला आहे का? जर कोणी थोडेफार सामने खेळला असेल तर त्यांच्यामुळे किती संघाना त्याचा फायदा झाला? शेवटी त्यांचे नशीब आहे म्हणून त्यांना एवढे पैसे मिळत आहेत. यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही ना? असा प्रश्न त्यांनी आयपीएल फ्रँचायझींना विचारला आहे.”

हेही वाचा: IPL 2024 Auction: ऋषभ पंत पहिल्यांदाच लिलावाच्या प्रक्रियेत सहभागी; म्हणाला, “लहानपणापासूनचे स्वप्न…”

स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरुवातीला चुरशीची स्पर्धा होती. ९.४० कोटींची बोली लावल्यानंतर दिल्लीने स्वतःला दूर केले. तर मुंबई संघाने सर्वाधिक ९.६० कोटी रुपयांची बोली लावली. येथून गुजरात आणि कोलकाता यांच्यात सामना पाहायला मिळाला. गौतम गंभीर कोलकात्याच्या टेबलावर तर आशिष नेहरा गुजरातच्या टेबलावर बसला होता. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजासाठी भारताच्या दोन माजी खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. शेवटी गंभीरचा विजय झाला.

कमिन्सने सॅम करनचा विक्रम मोडला

कमिन्सची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूसाठी २० कोटी रुपयांची बोली लागली. सनरायझर्सने २० कोटींची बोली ओलांडली. शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून त्याने कमिन्सला विकत घेतले. कमिन्सने लिलावात सर्वाधिक किंमत मिळवण्याच्या बाबतीत इंग्लंडच्या सॅम करनचा विक्रम मोडला. करणला गेल्या वर्षी पंजाबने १८.५० कोटी रुपयांना खरेदी केले होते. कमिन्सचा हा विक्रम फार काळ टिकला नाही. मिचेल स्टार्कने त्याला मागे टाकले.

हेही वाचा: IPL 2024 Auction: स्टीव्ह स्मिथ, मनीष पांडे आणि करुण नायर राहिले अनसोल्ड; पुढच्या फेरीत लागेल का बोली? जाणून घ्या

न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला चेन्नई सुपर किंग्जने १४ कोटींना विकत घेतले. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. भारताच्या हर्षल पटेलला पंजाब किंग्जने ११.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ११.५० कोटी रुपयांना विकत घेतले. वेस्ट इंडिजच्या रोव्हमन पॉवेलची मूळ किंमत एक कोटी रुपये होती. त्याला राजस्थान रॉयल्सने ७.४० कोटी रुपयांना विकत घेतले. ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने ६.८० कोटी रुपयांना विकत घेतले. भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावीला लखनऊ सुपर जायंट्सने ६.४० कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. गुजरात टायटन्सने उमेश यादवला ५.८० कोटी रुपयांना खरेदी केले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी याला मुंबई इंडियन्सने ५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 auction sunil gavaskar questioned on bids on pat cummins mitchell starc says history wont repeat itself avw