Premium

IPL 2023 Final GT vs CSK: देशी उपाय! पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ, पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच केली सुरुवात

चेन्नई धावांचा पाठलाग करताना अचानक पावसाला सुरुवात झाली होती. मात्र पाऊस थांबल्यावर वाळवण्यासाठी चक्क स्पंजचा वापर करण्यात आला. गुजरातने चेन्नईसमोर २१५ धावांचे मोठे लक्ष उभे केले.

Rain started suddenly while Chennai was chasing runs but when the rain stopped a sponge was used to dry it.
सौजन्य- IPL २०२३ (ट्विटर)

आयपीएल २०२३चा अंतिम सामना २८ मे २०२३ला रंगणार होता. मात्र कालचा संपूर्ण दिवस पावसात वाहून गेल्याने आज २९ मे रोजी पुन्हा घेण्यात आला. गुजरातने चेन्नईसमोर २१५ धावांचे मोठे लक्ष उभे केले. त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नईच्या डावात पुन्हा पावसाने खोडा घातला. तिसऱ्या चेंडूवर ऋतुराजने मोहम्मद शमीच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारताच पावसाला सुरुवात झाली. तब्बल अर्ध्या तासाने पाऊस थांबला आणि मैदानाला पूर्वस्थितीत आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. पावसाने चिखल झाल्याने तो वाळवण्यासाठी चक्क देशी उपाय वापरण्यात आला. पावसाच्या पाण्यानं ग्राऊंड्समन्सची तारांबळ उडाली त्यामुळे त्यांनी पाणी सुकवण्यासाठी थेट स्पंजनंच सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नईचा डाव सुरू होताच पुन्हा एकदा मुसळधार पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. चेन्नईच्या डावातील एक षटकही पूर्ण होऊ शकले नाही. मोहम्मद शमीने तीन चेंडू टाकले आणि चेन्नईने विकेट न गमावता चार धावा केल्या. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे क्रीजवर आहेत. अहमदाबादमध्ये आज पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. दिवसभर पाऊस पडला नाही, अशा स्थितीत पाऊस खलनायक ठरू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर चाहते आले आहेत. अशा स्थितीत हा पाऊस लवकरात लवकर थांबेल, अशी त्यांची अपेक्षा असेल.

म्हणजेच एकही विकेट न गमावता ४३ धावा, एक विकेट पडली तर ४८ धावा, दोन विकेट्स पडल्या तर ५५ धावा, तीन विकेट्स पडल्या तर ६५ धावा, चार विकेट पडल्या तर ७७ धावा आणि पाच विकेट्स पडल्या तर ९५ धावा. जमिनीवर जोरदार वारे वाहत असल्याने कव्हर अबाधित ठेवण्यासाठी ग्राउंड-कर्मचारी धडपडत आहेत. लक्षात ठेवा, आम्हाला अजून दोन तास बाकी आहेत, त्यानंतर षटके कापायला सुरुवात होईल.

हेही वाचा: IPL 2023 Final: धोनीच्या गळ्यात हात टाकण्यावरून माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर हार्दिकवर भडकले; म्हणाले, “तुम्ही वडिलांच्या…”

डकवर्थ-लुईस नियमानुसार काय असेल समीकरण

४३/०

४८/१

५५/२

६५/३

७७/४

९५/५

गुजरात टायटन्सने शानदार फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. आयपीएल फायनलमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ७ बाद २०८ धावा केल्या होत्या. चेन्नईला पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. यापूर्वी आयपीएल फायनलमध्ये २०० धावांचा पाठलाग फक्त एकदाच झाला होता. २०१४ साली कोलकाताने फायनलमध्ये पंजाबसमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. यापेक्षा जास्त धावांचा पाठलाग कधीच केला गेला नाही. गुजरातकडून साई सुदर्शनने तुफानी खेळी केली. त्याचे शतक जरी हुकले असले तरी त्याच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने चेन्नईला अंतिम सामन्यात अडचणीत आणले आहे. त्याने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ९६ धावा चोपल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 22:53 IST
Next Story
आयपीएलची फायनल आहे की गरबा? मैदानात पडला पाऊस, प्रेक्षकांना मात्र गरब्याची हौस, Video झाला व्हायरल