Punjab Kings vs Gujarat Titans IPL Score Updates: आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना पंजाब किंग्जशी मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर संपन्न झाला. दोन्ही संघांनी आपला शेवटचा सामना गमावला असून या सामन्यात त्यांना विजयी मार्गावर परतायचे होते. त्यात गुजरात टायटन्सने बाजी मारत यजमानांना त्यांच्याच घरात तब्बल सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवला. हा सामना जिंकत गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या चार संघांमध्ये पोहोचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना १५३ धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल यांच्यात ४८ धावांची दमदार भागीदारी झाली. साहा १९ चेंडूत ३० धावा करत रबाडाकरवी बाद झाला. त्याने त्याच्या खेळीत ५ चौकार मारले. त्यानंतर आलेला नवोदित साई सुदर्शन फारशी मोठी खेळी करता आली नाही तो १९धावा करून बाद झाला.

मागील सामन्यात बाहेर असलेला कर्णधार हार्दिक पांड्या केवळ ८ धावा करून नवख्या हरप्रीत ब्रारकडून बाद झाला. मात्र, एका बाजूला शुबमन गिल जो पंजाबचा होम ग्राउंडवर लहानपणापासून खेळणारा फलंदाजाने पंजाब किंग्सला शानदार अर्धशतक झळकावत अस्मान दाखवले. त्याने ४९ चेंडूत ६७ धावा केल्या. त्याला सॅम करणने त्रिफळाचीत केले. डेव्हिड मिलरने १८ चेंडूत १७ धावा करत सामना जिंकवून दिला. पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तेवतियाने चौकार मारून सामना जिंकावला. अर्शदीप सिंग, कगिसो रबाडा, सॅम करण आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. हा सामना गमावल्याने संघाची ओनर प्रीती झिंटा मात्र नाराज झाली.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकांत ८ गडी गमावून १५३ धावा केल्या होत्या. पंजाबच्या पाच फलंदाजांनी २० पेक्षा जास्त धावा केल्या. मात्र असे असतानाही संघ केवळ १५३ पर्यंतच पोहोचू शकला. पंजाबकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक ३६ धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून पदार्पण करणाऱ्या मोहित शर्माने दोन बळी घेतले, तर चार गोलंदाजांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हेही वाचा: IPL 2023: DRS मास्टर! वृद्धिमानच्या हट्टापुढे कर्णधार हार्दिकच नाही तर अंपायरही झुकला, पाहा Video

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्ज संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात प्रभासिमरन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर शिखर धवनही स्वस्तात बाद झाला. त्याने ८ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्टने वेगवान खेळी खेळली. पण २४ चेंडूत ३६ धावा करून क्लीन बोल्ड झाला. भानुकाने अतिशय संथ खेळी खेळली. तो २६ चेंडूत २० धावा करून बाद झाला. जितेश २३ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. सॅम करणने २२ चेंडूत २२ धावा केल्या. शाहरुख खान धावबाद होण्यापूर्वी ९ चेंडूत २२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हरप्रीतने ८ धावा केल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pbks vs gt highlights gujarat titans beat punjab kings by six wickets shubman gill scored 67 runs avw