Chennai Super Kings vs Rajasthan Royals IPL Match Updates: आयपीएल २०२३चा ३७वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात संपन्न झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. राजस्थानचा संघ गेल्या दोन सामन्यात पराभूत झाला होता आणि सीएसकेचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. मात्र एवढे असूनही आज रजवाड्यांनी ३२ धावांनी सामना जिंकत आम्हीच खरे किंग आहोत हे दाखवून दिले. सीएसकेचा संघ गुणतालिकेत अव्वल होता तो राजस्थानने हिसकावून घेतला आणि आता ते पहिल्या स्थानावर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरआरने २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने ६ गड्यांच्या मोबदल्यात १७० धावाच करू शकली. यशस्वी जैस्वालने ४३ चेंडूत ७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून १७० धावाच करू शकला. शिवम दुबेने ३३ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याचवेळी ऋतुराज गायकवाडने २९ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. आयपीएलमधील हा राजस्थानचा २००वा सामना होता आणि त्यांनी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा २००+ धावा केल्या. त्यानंतर मोठा विजयही मिळवला.

राजस्थान रॉयल्सचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या गैरहजेरीतही राजस्थानच्या गोलंदाजांनी पॉवर-प्लेमध्ये कसून गोलंदाजी केली. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना मोठा फटका मारता येत नव्हता. सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर कॉनवेने फटका मारला , परंतु तो संदीप शर्माच्या हाती विसावला, तो ८ धावांवर बाद झाला. ऋतुराजने २९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४७ धावा केल्या. आर अश्विन आणि अजिंक्य रहाणे यांच्यात आज पुन्हा अश्विनने बाजी मारली. अश्विनने सहाव्यांदा अजिंक्यची ( १५) विकेट घेताना चेन्नईला अडचणीत आणले. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला अंबाती रायुडू भोपळाही न फोडता तंबूत परतला. अ‍ॅडम झम्पाने आज ३ गडी बाद करत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

हेही वाचा: IPL 2023: “हां भाई, क्या हाल हैं?”, संजू सॅमसनचा चाहत्याला सुखद धक्का! खास संवादाचा राजस्थान रॉयल्सने केला Video शेअर

या विजयासह राजस्थान संघ आठ सामन्यांत पाच विजय आणि १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याला केवळ तीनच सामने गमवावे लागले आहेत. यासोबतच चेन्नईचा संघ आठ सामन्यांत चार विजय आणि चार पराभवांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसर्‍या स्थानावर चेन्नईपेक्षा चांगला रनरेट आणि आठ गुणांसह गुजरात टायटन्स आहे. चेन्नईला पंजाब किंग्जविरुद्ध रविवारी चेपॉक येथे पुढील सामना खेळायचा आहे. त्याचवेळी राजस्थानला रविवारीच वानखेडेवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचे आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rr vs csk score rajasthan beat chennai by 32 runs samsons team topped the points table avw