Signs of High Cholesterol in Marathi: जीवनशैलीत अनियमितता, धूम्रपान, मद्यपान, अतिवजन यांमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढीस लागते. कोलेस्ट्रॉल हा मनाप्रमाणे असतो, तो ज्याचे रक्तातील प्रमाण वाढल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. शरीरात अतिकोलेस्ट्रॉल हे हृदयविकार, स्ट्रोक अशा समस्यांचे कारण ठरू शकते. मेणासारखे वाटणारे कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमून राहिल्यास रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि परिणामी अनेक अवयवांना धोका निर्माण होतो. महत्त्वाची बाब म्हणजे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. त्याचं कारण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो. जर शरीराने दाखवलेली काही लक्षणं आपण वेळीच ओळखली नाहीत, तर हा धोका सहज टाळता येऊ शकतो. एम्सचे माजी कन्सल्टंट व साओल हार्ट सेंटरचे संस्थापक डॉ. बिमल झांजर यांनी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यावर काय काय लक्षणं दिसतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय काय करावं, याबाबतची माहिती दिली आहे. ती जाणून घेऊ…

आजकालची धावपळीची जीवनशैली आणि चुकीचा आहार यांमुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आहे. मानवाच्या शरीरात दोन पद्धतीचे कोलेस्ट्रॉल असतात. त्यामध्ये LDL म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीनला वाईट कोलेस्ट्रॉल मानलं जातं आणि दुसरीकडे HDL म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. LDL नेहमी कमी असलं पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. LDL कोलेस्ट्रॉल शरीरासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात.

कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठीही आवश्यक आहे. निरोगी पेशी प्रामुख्यानं चांगल्या कोलेस्ट्रॉलपासून शरीरात तयार होतात. पण, जर शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल खूप वाढले, तर ही गंभीर स्थिती उद्भवू शकते. जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढते तेव्हा शरीरात अनेक प्रकारची लक्षणं दिसू लागतात. 

डॉ. बिमल झांजर यांच्या मते, कोलेस्ट्रॉल वाढत असल्यास थकवा जाणवणे, छातीत जडपणा, डोकेदुखी व शरीरात सूज ही लक्षणं दिसू शकतात. डॉ. झांजर सांगतात की, काही अंकुरित कडधान्यं दररोजच्या आहारात समाविष्ट केल्यास कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरीत्या कमी होऊ शकतो आणि शरीरातील विषाक्त घटकही मूत्रावाटे बाहेर पडतात. जाणून घ्या, कोणते आहेत ते ‘कोलेस्ट्रॉल कंट्रोल करणारे’ अंकुरित कडधान्यरूपी सुपरफूड्स:

मूग: फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले मूग कोलेस्ट्रॉल कमी करतात, पचन सुधारतात आणि शरीरातील वाईट वा त्रासदायक घटक बाहेर काढून टाकतात.

मेथी: यातील सॉल्युबल फायबरमुळे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते आणि पोट साफ राहतं.

चणे: आयर्न, प्रोटीन व फायबर यांचे उत्तम स्रोत असलेले चणे हृदयासाठी गुणकारी असून, शरीराला ऊर्जा देतात आणि विषाक्त घटक बाहेर टाकतात.