Marathi Ukhane For Mangalagaur : चल गं बाई खेळू या मंगळागौर खेळू या मंगळागौर खेळू या. गौराईचा खेळ बाई आनंदात नाचू गाऊ आनंदात खेळू या…
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र आणि आध्यात्मिक मानला जातो. या महिन्यात भगवान महादेवांची पूजा, आराधना करण्याचे महत्त्व सांगितले जाते. २५ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावणात श्रावणी सोमवारव्यतिरिक्त नागपंचमी, रक्षाबंधन, जन्माष्टमी हे सणदेखील साजरे केले जातात. तसेच श्रावणी मंगळवारी अनेक ठिकाणी मंगळागौरीचे पूजनसुद्धा केले जाते. तर उद्या पहिला श्रावणी मंगळवार असणार आहे. नवीन लग्न झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. या दिवशी महिला एकत्र येऊन विविध खेळ खेळतात. झिम्मा, फुगडी आणि गाणी गात मंगळागौर साजरी करतात.
जुने ते सोने म्हणतात अगदी त्याचप्रमाणे आजकालच्या मुलींनासुद्धा नऊवारी नेसून, छान-छान दागिने घालून, हेअरस्टाईल करून, सूप हातात धरून, कळशी काखेत ठेवून मंगळागौरीचे खेळ खेळण्याची उत्सुकता असते. यंदाच्या श्रावणात तुम्हीही मंगळागौर साजरी करणार असाल किंवा तुमची लग्न झाल्यानंतरची पहिली मंगळागौर असेल तर आम्ही तुमच्यासाठी अगदी लक्षात राहील असे सोपे, छान उखाणे घेऊन आलो आहोत. तेच तेच उखाणे म्हणण्यापेक्षा यंदा काहीतरी नवीन ट्राय करा आणि हे उखाणे जपून ठेवा आणि तुमच्या इतर महिला मंडळ ग्रुपबरोबर आणि मित्र-मैत्रिणींबरोबर आवर्जून शेअर करा.
लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी करते माहेरी
… रावांचे नाव घेते, नेसून साडी चंदेरी.
चल गं बाई खेळू या, मंगळागौर खेळू या
… रावांचे नाव घेते, आमच्या जोडीला तुमचे आशीर्वाद द्या
हिरव्यागार रंगाने, श्रावणात सजली सृष्टी
… रावांच्या नावाने, मी मंगळागौर पुजली.
श्रावण महिन्यात सजला मंगळागौरीचा थाट
… रावांचं नाव घ्यायला मी कशाला बघू वाट
भर श्रावणात, पाऊस आला जोरात
… रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या दिवशी … च्या घरात.
नव्या नवरीसाठी भन्नाट उखाणे (Marathi Ukhane For Mangalagaur)
गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाऊ
… रावांचं नाव घ्यायला मी कशाला बाई लाजू.
आई बाबांनी केले लाड, सासू-सासऱ्यांनी पुरवली हौस
… रावांचे नाव घेते, आज मंगळागौर खेळण्याची फिटली हौस
सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे हिरव्या बांगड्यांचे चुडे
… रावांचे नाव घेते, मंगळागौरी देवीच्या पुढे.
हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली कळशी
… रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी.
दारापुढे काढली मी ठिपक्यांची रांगोळी
… रावांचे नाव घेते मी मंगळागौरीच्या पूजेच्या वेळी.
तुम्हा सगळ्यांना मंगळागौरीच्या हार्दिक शुभेच्छा!