नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांत काँग्रेसचा सुपडा साफ करून भाजपच्या पारडय़ात मोठी भर घालणारे मध्य प्रदेश आता लोकसभेतही हीच परंपरा कायम ठेवते की, पारडे बदलते याकडे लक्ष लागले आह़े ‘आप’ने सर्वाना ‘झाडू’न टाकण्याचा दावा केला असला, तरीही २९ खासदार संख्येच्या या राज्यात प्रमुख लढत रंगणार आहे ती काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच!
संघ परिवाराची पाळेमुळे जिथे अगदी खोलवर रुजली आहेत, ते मध्य प्रदेश राज्य गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीच्या तख्तावर विराजमान करण्यासाठी खासदारांची
मध्य प्रदेशचे एक मात्र वैशिष्टय़ आहे, तेथे प्रादेशिक पक्ष किंवा अपक्षांचा फारसा प्रभाव दिसत नाही़ त्यामुळे येथील जागा पंतप्रधानपदाच्या खुर्चीला भक्कम खांब पुरविणाऱ्या ठरतात़ याही वेळी येथे ‘दुरंगी’च लढत होणार आह़े नाही म्हणायला रेवा या मतदारसंघात १९९१ पासून २००९ पर्यंत तीन वेळा खासदार निवडून आणणाऱ्या बसपचे गजराज काही ठिकाणी माफक धडका देतील इतकेच! त्यातच जन्मानंतरची पहिलीच लोकसभा अनुभवणारा ‘आम आदमी’ मध्य प्रदेशसाठी बऱ्याच जोर-बैठका मारत आह़े परंतु, त्याच्या अस्तित्वाची दखल ना भाजपला घ्यायची आहे ना काँग्रेसला़ भाजपने तशी दखल घेऊही नव्हे, अशी काहीशी परिस्थिती मध्य प्रदेशात आहे खरी़ शिवराजसिंह चौहान यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झालेली आणि
दिग्गजांचे गड
एकूण जागांची गणिते काहीही असली तरीही दिग्गज त्यांचे गड अबाधित राखण्याचा नेहमीच प्रयत्न करतात़ मध्य प्रदेशातही असे गड आहेतच़ गेल्या वेळी ३.१० लाख मतांच्या फरकाने निवडून येणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज याही वेळी विदिशाचा गड लढविणार आहेत़ काँग्रेसकडूनही केंद्रीय मंत्री कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे हेही छिंदवारा आणि गुणा मतदारसंघांवर आपापले प्रभुत्व राखून आहेत़