Maharashtra Rain Updates : मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पूरांमुळे विदर्भातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी देखील (१९ ऑगस्ट) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दुसऱ्या बाजूला रात्रभर पावसाची रिपरिप चालू असून मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेसेवा खोळंबली आहे.
IMD Weather Forecast Today LIVE News Updates : राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Rain Update : मध्य रेल्वे ठप्प
पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. सध्या केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला स्थानकांदरम्यान वाहतूक चालू असून कुर्ल्याच्या पुढे वाहतूक ठप्प आहे.
टाटा मेमोरिअलमध्ये १०० खाटांच्या रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफ, राज्य मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय
मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ.
(महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमीटेड, संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र.६९७/३/६ मधील २ हे. ५० आर जमीन देणार. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला – कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग)
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास मान्यता. (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग).
कराड: बिबट्याच्या हल्ल्यात पाटणमध्ये शेळ्या ठार
सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबीत १५० मिमी पावसाची नोंद
मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची 3.9 मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. – देवेंद्र फडणवीस
नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा… ‘या’ नेत्याचे सरसंघचालकांना साकडे..
आता मुंबईकरांपुढे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे संकट! रुग्ण वाढण्याची भीती, लेप्टोस्पायरोसिसचाही धोका…
अतिवृष्टीमुळे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सावर अंत्यविधी पुढे
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, “राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील १२ ते १४ लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे. काही प्रमणात जणावरांचे नुकसान झाले आहे. नांदेडमध्ये ढगफुटीमुळे आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबईतील काही भागांत ३०० मी.मी पावसाची नोदं झाली आहे. त्यामुळे काही भागांत पाणी साचले आहे. याचा मुंबईच्या लोकलवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोकलची संथगतीने वाहतूक सुरू आहे.”
Nashik Rainfall Shortage : महाराष्ट्रात मुसळधार, नाशिकमध्ये…
Mumbai Heavy Rain Alert Warning: पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
प्रस्थापितांविरुद्धच्या संघर्षानेच माझी लोकसभा निवडणुकीत ‘विकेट’, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली खदखद
मुंबई पावसाचा कहर, मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; ठाण्यात रेड अलर्ट
मिठी नदीची धोकादायक पातळी ३.४० मीटर असून नदीतील पाणी मंगळवारी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. मिठी नदीतील पाण्याची पातळी ३.१० मीटरवर पोहोचली आहे. त्यामुळे मिठी नदीलगत वास्तव्याला असलेल्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने सुरू केले आहे. मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे परिसरात पुरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे पालिका आणि संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
कबुतरांना नियंत्रित पद्धतीने खाद्य देण्यास परवानगी दिल्यास आंदोलन करू; मराठी एकीकरण समितीचा इशारा
पुणे: प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर, हरकती-सूचना मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ
खडकवासल्यासह पानशेत आणि टेमघर धरणातून नदीपात्रात विसर्ग, जिल्हा प्रशासनाकडून धोक्याची सूचना
अहिल्यानगर : भंडारे महाराजांना पोलीस संरक्षणाची भाजपची मागणी
समुद्रातील वाऱ्याचा वेग प्रती ताशी ४५ – ५० किमी; मत्स्यव्यवसाय विभागाकडून राज्यातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा
एक वेगळा अनुभव… ‘दशावतार’ चित्रपट करताना भव्यता जाणवली – ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर
पहिल्या मजल्यावरील झोपडवासीयांना मोफत घर ?
मध्य व हार्बरपाठोपाठ पश्चिम रेल्वे देखील ठप्प! रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकलचा खोळंबा
सकाळपासून कासवगतीने धावणारी रेल्वे सेवा साडेअकरानंतर ठप्प झाली. रुळावंर पाणी साचल्याने हार्बर सेवा बंद झाली, तर मध्य रेल्वेवरील कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल बंद झाल्या. लोकल बंद पडल्याने प्रवाशांना पायी चालत जवळचे रेल्वे स्थानक गाठावे लागले. पाठोपाठ पश्चिम रेल्वे देखील खोळंबली आहे. वसई ते विरार स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेचा देखील खोळंबा झाला आहे.