Maharashtra Monsoon Session 2025 Updates, 15 July : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा चालू आहे. मात्र, युतीचा निर्णय निवडणुकीवेळी घेतला जाईल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच मनसे व शिवसेनेने (ठाकरे) घेतलेला मेळावा हा मराठीच्या विजयापुरता मर्यादित होता असंही राज यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे समर्थक गोंधळले आहेत. दुसऱ्या बाजूला निवडणुका जाहीर झाल्यावर युतीबाबत निर्णय घेऊ, असं मत शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच ते म्हणाले, “ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी अनेकांचे प्रयत्न चालू आहेत.”

शिवसेनेच्या (शिंदे) आमदारांमुळे व मंत्र्यांमुळे पक्ष सध्या अडचणीत सापडला आहे. यामुळे पक्षाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार, मंत्री व पदाधिकाऱ्यांना तंबी दिली आहे. “बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल”, असं शिंदे म्हणाले आहेत. “कोणाच्याही कुटुंबावर कारवाई करायला आवडणार नाही. तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं”, असंही शिंदे म्हणाले. आमदार संजय गायकवाड व मंत्री संजय शिरसाटांच्या कारनाम्यावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही शिवसेना व मनसेमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.

दरम्यान, विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून आज या अधिवेशनाचा १३ वा दिवस आहे. या अधिवेशनात काय घडतंय याबाबतचे अपडेट्स आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.

Live Updates

Latest Maharashtra News Live Today : राज्यातील सामाजिक व राजकीय घडामोडींचा आढावा वाचा एकाच क्लिकवर.

11:36 (IST) 15 Jul 2025

पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

आज दिनांक १५ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून पुढील ३ तासांत पुणे आणि सातारा येथील घाटांमध्ये वादळांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे., नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

11:35 (IST) 15 Jul 2025

टेस्लाच्या मुंबईतील पहिल्या शोरूमचं उद्घाटन

10:20 (IST) 15 Jul 2025

“लाडकी बहीण योजना सरकारसाठी गले की हड्डी, अजित पवार आता…”; ठाकरे गटाचं सूचक वक्तव्य

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीआधी सुरू केलेली लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी लाभदायक ठरत असली तरी या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत असल्याचं पाहायला मिळत आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या प्रचंड निधीमुळे राज्याच्या आर्थिक नियोजनाचा बोजवारा उडत असल्याची जाहीर कबुली सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांनीच दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या गटाती नेते तथा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. यावरून शिवसेनेने (ठाकरे) सरकारला टोला लगावला आहे. शिवसेनेच्या (ठाकरे) सामना या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटलं आहे की “लाडकी बहीण’ योजना राज्यातील भगिनी वर्गासाठी लाभदायक ठरली आहे, हे खरे असले तरी सरकारसाठी ‘गले की हड्डी’ बनली आहे. राज्यकर्ती मंडळी कितीही नाकारत असली तरी हेच सत्य आहे. हेच सत्य नाराजीच्या स्वरूपात मंत्र्यांच्या तोंडून जाहीरपणे बाहेर पडू लागले आहे आणि सरकारला तोंडावर आपटत आहे. स्वतः अजित पवारांनी देखील ‘लाडकी बहीण’ योजनेत चूक झाल्याचे मान्य केले होते. परंतु, ही ‘चूक’ दरमहा सहन करावी लागत असल्याने राज्याचे आणि वेगवेगळ्या खात्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. भरणे यांच्या या वेदनेवर अजित पवार आता कोणती गोळी देऊन फुंकर घालतात हे दिसेलच, पण बहिणींसाठी लाडकी ठरलेली ही योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी मात्र दोडकी ठरू लागली आहे हे नक्की.”

10:11 (IST) 15 Jul 2025

“शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न”, संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

 

जनसुरक्षा कायद्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहित

शहरी नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणल्याचा सरकारचा दावा अत्यंत हास्यास्पद आहे. हा कायदा आतून-बाहेरून काळा असून सामान्यांची गळचेपी करणारा आहे. सभागृहात सत्ताधारी पक्षाकडे बहुमत असल्याने त्यांनी बहुमताच्या जोरावर रेटून नेत कायदा मंजूर करून घेतला. सरकारने कायदा मंजूर करून घेतला असला तरी काँग्रेसचा विरोध कायम असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात या काळ्या कायद्याची होळी केली जाईल,अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी येथे दिली.

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात गेल्या आठवड्यात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले. विधानसभेत या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिला तर विधानपरिषदेत विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे स्पष्ट केले. जनसुरक्षा कायद्यामागचा हेतूच मुळात काळा आहे.