Maharashtra Mumbai News Today : अलिकडेच राज्यात झालेल्या दंगलींमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे राजकीय वातावण आणखी तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यात आलं आहे. दंगली, पलखी सोहळ्यारम्यान वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि सामनाचा अग्रलेख या सर्व प्रकरणांवर आज दिवसभरात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील.
Mumbai Maharashtra News Today : राजकीय बातम्यांचा आढावा
डोंबिवली: शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा वसाहतीमध्ये घर विक्री मधील दलाल आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका नोकरदार महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, “दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात”, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य मग त्या वह्या असतील किंवा तसंच एखादं छोटंसं शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे,” असंही ते पुढे म्हणाले.
नागपूर : असे अनेक अभ्यासक्रम आहेत की, ते पूर्ण केल्यानंतर नोकरीची किंवा स्वत:चा व्यवसाय करण्याची संधी मिळते. त्यामुळे हिंमत न हारता आणि चिंता न करता पुन्हा एकदा नव्या दमाने सुरुवात करायला हवी, असे मत शिक्षणतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. upsc.gov.in आणि upsconline.nic.in या संकेतस्थळवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.
नागपूर: प्रसूती वेदनेसाठी घरातच वाट बघणे जोखमीचे आहे. नागपुरातील मेडिकल रुग्णालयात असाच एक प्रकार घडला. रविवारी दुपारी मेडिकलच्या द्वारावर ऑटोरिक्षात महिलेला प्रसूती वेदना सुरू झाली. डॉक्टर आणि इतर कर्मचारी तेथे धावत गेले.
डोंबिवली – यापूर्वीच्या २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करून कल्याण लोकसभेसाठी शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना निवडून आणले. आता त्यांच्या बाजूने व्हाॅट्सअॅप , फेसबुकवर लिखाण करणारे समाज माध्यमी सल्लागार कार्यकर्ते त्यावेळी कोठे होते? असा प्रश्न करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खासदार डाॅ. शिंदे यांच्या समाज माध्यमी सल्लागार कार्यकर्त्यांना लक्ष्य केले.
सांगली : भाजपचे ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर होईल, अशी अपेक्षा असताना जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रमुखांची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाचा पर्यायी चेहरा कोणता असेल याचे स्पष्ट संकेत पक्षाने दिले आहेत.
दीपक गवळी हा माझा पीए नाही तर तो कृषी अधिकारी आहे. तो या पथकामध्ये समाविष्ट आहे. कृषी विभागातील ६२ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. मे महिन्यापासून या पथकाने ८६ कारवाया केल्या आहेत. तसेच आतापर्यंत या पथकाने एकूण २६९ कारवाया केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून ६२ अधिकाऱ्यांचा समावेश या पथकात केला होता. त्यात दीपक गवळीही होते. काही शासकीय दौऱ्यात त्यांचा पीए असा उल्लेख झाला आहे.
वादग्रस्त छापेमारीवर अब्दुल सत्तारांनी नुकतंच प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण दिलं.
गोंदिया : ‘धानाचे कोठार’ अशी गोंदिया – भंडारा या जिल्ह्यांची ओळख, दोन्ही जिल्ह्यांत धानाची पिके प्रामुख्याने घेतली जातात. यंदाच्या खरीप हंगामासाठी गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी तयारी पूर्ण तयारी केली आहे.
वर्धा : इव्हेंट प्रिय म्हटल्या जाणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाची नऊ वर्षे एक सुसंधी ठरली आहे. सुसंधीचा उत्सव महा जनसंपर्क अभियान म्हणून राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने इथे संयुक्त मोर्चा अभियानास सुरुवात झाली.
अमरावती : खारपाणपट्ट्यातील बोराळा या गावात पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून खाऱ्या पाण्याचे रुपांतर गोड्या पाण्यात होईल, असा दावा करण्यात आला असला, तरी अशा उपायातून कोट्यवधी रुपये खर्चूनही काहीच उपयोग होणार नाही, यात केवळ कंत्राटदारांचेच भले होणार आहे, असा आरोप शेतकरी नेते आणि श्रमराज्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद नळकांडे यांनी केला आहे.
अमरावती : महापालिकेने खासगी इंग्रजी माध्यमातील शाळांना आव्हान देण्याची तयारी पूर्ण केली असून यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून महापालिकांच्या शाळांमध्ये नर्सरी, केजी १, केजी २ व इंग्रजी माध्यमांच्या पहिल्या वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली येथील एका मनोरुग्ण वृद्धाश्रमात झोपलेल्या अवस्थेत एका महिलेच्या डोक्यावर दुसरीने जेवणाचा ताट जोरजोरात मारून जखमी केले. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आरोपी मनोरुग्ण महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र मनोरुग्ण असल्याने अद्याप अटक केलेले नाही.
वर्धा : सर्वसामान्य नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. या प्रणालीचा जिल्हा, उपविभाग व तालुकास्तरावर अवलंब करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. सुरुवातीस आर्वी उपविभागातील तहसीलमध्ये सुरू करण्यात आलेली ही प्रणाली आता जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात कार्यान्वित झाली आहे.
चंद्रपूर : आजची महिला ही कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वाधिक योगदान महिलांचे आहे. महिलांचे शैक्षणिक आयुष्य उज्ज्वल व्हावे, महिला आत्मनिर्भर व्हावी, स्वतःच्या ज्ञानावर रोजगार शोधू शकेल, यादृष्टीने महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून येथील महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण होईल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
नागपूर : मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली. दरम्यान, येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
नागपूर : पत्नीने आंघोळ करण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या पतीने पत्नीला जबर मारहाण केली. तिचे डोके भींतीवर आपटून तिचा खून केला. ही घटना सावली-मावली गावात घडली. रुख्मिणी गणेश घोडेस्वार (४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
गडचिरोली: दहावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी शाळेत गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर दोन युवकांनी मिळून अत्याचार केल्याची घटना अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे शनिवारी घडली.
टेक्नॉलॉजी क्षेत्र हे खूप विस्तारलेले क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल आणि प्रगती होत आहे. आज आपण मागील आठवड्यामध्ये टेक क्षेत्रामध्ये कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये Apple WWDC इव्हेंट, रिअलमी आणि सॅमसंगने स्मार्टफोनच्या नवीन सिरीज लॉन्च केल्या आहेत. केरळ राज्याने मोफत इंटरनेटची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. अशा अनेक घडामोडी मागील आठवड्यामध्ये घडल्या आहेत. त्या पाहुयात. वाचा सविस्तर बातमी
Petrol-Diesel Rate Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. वाचा सविस्तर बातमी
मुंबईः देशातील संवेदनशिल तुरुंगांपैकी एक असलेल्या आर्थर रोड तुरुंगात एका कैद्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना घडली आहे.
वारकऱ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच या लाठीचार्जमागे भाजपाची टोळी आहे, अशा दावाही त्यांनी केला. राऊत म्हणाले, याप्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, तसेच आषाढीला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करण्याचा अधिकार नाही.
हिंदुत्त्वाचा टेंभा मिरवणारे मुख्यमंत्री कुठे गेले? हिंदुत्वावर वचावचा बोलणारा मिंधे गट गुठे गेला? असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला .
नाना पटोले म्हणाले, शेकडो वर्ष चालत आलेल्या या वारकरी परंपरेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने गालबोट लावलं आहे. ज्या पद्धतीने भोळ्याभाबड्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करवण्यात आला. त्या घटनेचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. वारी ही महाराष्ट्राची पुरोगामी पंरपरा आहे, या परंपरेनं सगळ्या धर्माच्या माणसांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचं काम वारकऱ्यांनी केलं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. वारकरी परंपरेनं हे काम केलं. परंतु या परंपरेला संपवण्याचं पाप जातीवादी सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सुरू झालं. या परंपरेला सरकारने गालबोट लावण्याचं काम केलं. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. त्यामुळे थोडी लाज लज्जा असेल तर या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो.
उद्धव ठाकरे – अजित पवार
“…म्हणून शरद पवारांनी फेरबदल केले”; ठाकरे गटाने ‘सामना’तून व्यक्त केला तर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा गमावला आहे. नागालॅण्डमध्ये त्यांचे चार-पाच आमदार निवडून आलेत. राज्याबाहेर लक्षद्वीप येथे त्यांचा एक खासदार आहे. केरळ विधानसभेत त्यांचे एक-दोन सदस्य आहेत. बाकी सर्व कारभार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे सर्व काही आटोपशीर आहे. मग एकाच वेळी दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज का पडली? हाच काय तो प्रश्न आहे”, असा मुद्दा ठाकरे गटाने ‘सामना’च्या अग्रलेखात उपस्थित केला आहे. “देशाचा आकार पाहता एकाच नेत्याला सर्व भागांत पोहोचणे अवघड असते. त्यामुळे कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दोघांत वाटून दिल्याचं शरद पवारांनी सांगितले. हे खरे असेलही, पण राष्ट्रवादी काँगेस पक्षापेक्षा अनेक मोठे पक्ष देशाच्या राजकारणात आहेत. त्यांनाही देश मोठा असल्याने दोन कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची गरज पडली नाही. मात्र शरद पवार यांनी ते केले. कारण त्यांना पक्षातील जुन्या-नव्यांत समतोल राखावा लागत आहे”, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.