नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) नागरी सेवा पूर्व परीक्षा २८ मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. upsc.gov.in आणि upsconline.nic.in या संकेतस्थळवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.

यूपीएससी २०२२ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार दरवर्षीप्रमाणे रविवार २८ मे ला पूर्व परीक्षा घेण्यात आली. दोन सत्रांत ही परीक्षा झाली. पहिल्या सत्रात सामान्य अध्ययनावर आधारित परीक्षा झाली, तर दुसऱ्या सत्रामध्ये सी-सॅटचा पेपर घेण्यात आला. या दोन्ही सत्रांतील परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा – नागपूर: रुग्णालयाच्या दारावर ऑटोरिक्षातच प्रसूती; डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची समयसूचकता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्य परीक्षा सप्टेंबरमध्ये

यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ आता १५ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित केली जाईल. पूर्व परीक्षेत पात्र ठरलेले उमेदवार या परीक्षेला बसतील.