scorecardresearch

Premium

डोंबिवली: लोढा पलावामध्ये घर विक्री दलालांकडून नोकरदार महिलेला बेदम मारहाण

मोहम्मद हमजा, मोहम्मद अनश आणि त्यांचा एक भाऊ अशी आरोपींची नावे आहेत.

employed woman brutally beaten house brokers lodha palava dombivli
लोढा पलावामध्ये घर विक्री दलालांकडून नोकरदार महिलेला बेदम मारहाण

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा वसाहतीमध्ये घर विक्री मधील दलाल आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका नोकरदार महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. या महिलेच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात हा मारहाणीचा प्रकार घडला आहे.

sanjay raut kirit somaiya
किरीट सोमय्यांची नक्कल करत संजय राऊतांची खोचक टीका; म्हणाले, “सगळे साखर कारखानदार मुलुंडमध्ये…”!
PM Modi Mumbai Fire
Goregaon Building Fire : मृतांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून मदत जाहीर, पंतप्रधान मोदी म्हणाले…
Air India Passenger Burns As Crew Spill Hot Water on Leg Angry Post Saying My 4 Year Son Heard Cut Scissors Mental shock
Air India च्या क्रूमुळे प्रवाशाला सेकंड डिग्री बर्न! संतप्त पोस्ट चर्चेत, म्हणाल्या “दोन तास कळवळताना, ४ वर्षांचा मुलगा..”
Philippines News
नावाचा घोळ आणि भारतीय व्यावसायिकाला फिलिपाईन्समध्ये भोगावा लागला पाच वर्षांचा तुरुंगवास, धक्कादायक घटनाक्रम वाचाच!

सपना श्रीकांत शिंदे (४४, रा. अरबानो, लोढा पलावा, डोंबिवली) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या नोकरदार आहेत. मोहम्मद हमजा, मोहम्मद अनश आणि त्यांचा एक भाऊ अशी आरोपींची नावे आहेत. मारहाणीत तक्रारदार महिलेच्या पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. तक्रारदार सपना शिंदे आणि आरोपी मोहम्मद हमजा हे पलावामधील एकाच सोसायटीत राहतात. मोहम्मद हे घर विक्रीमधील दलाल आहेत. हे सपना यांना माहिती होते.

हेही वाचा… भाजपा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीमुळे डॉ. श्रीकांत शिंदे दोनदा खासदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

गेल्या काही दिवसांपासून सपना यांना एक घर विक्री दलाल तुम्हाला तुमचे घर विक्री करायचे आहे का, अशी सतत मोबाईलवर विचारणा करत होता. आपले घर विकायचे नाही तरी आपणास अनोळखी घर विक्री दलाल का संपर्क करतोय, असा प्रश्न सपना यांना पडला होता.

हेही वाचा… “जेव्हा बोट बुडेल तेव्हा पळणारा पहिला उंदीर…”, राजन विचारेंची खोचक टीका, नेमका रोख कुणाकडे?

सोसायटीतील मोहम्मद घर विक्री दलाल आहेत. त्यांनी आपला मोबाईल क्रमांक कोणाला दिला आहे का, याची विचारणा करण्यासाठी सपना शिंदे गेल्या रविवारी मोहम्मद यांच्या घरी गेल्या. त्यावेळी मोहम्मद यांनी ‘तुम्ही माझ्या घरी कशासाठी आल्या आहात’. असे बोलून मोहम्मद आणि त्याच्या दोन साथीदारांनी सपना यांना घरात बेदम मारहाण केली. आरोपींनी कानावर ठोशे बुक्के लगावल्याने सपना यांच्या कानाचा पडदा फाटला आहे. पायाचे बोट तुटले आहे. त्यांच्या कानातील सोन्याची रिंग हरवली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय सहारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Employed woman brutally beaten by house sales brokers in lodha palava dombivli dvr

First published on: 12-06-2023 at 12:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×