Maharashtra Breaking News Live Today, 12 October 2023: शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून १३ ऑक्टोबरऐवजी सुनावणी आज दुपारी २ वाजता होणार आहे. जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तिकडे जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे. पण याच प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने बदललेल्या वेळापत्रकावर जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे की पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं. शरद पवारांनी भाजपाला डीच केलं. त्यावर काही प्रतिक्रिया येतात का याकडे पाहणार आहोत.या बातम्यांवर आणि राज्यातल्या इतर घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असणार आहे.
Mumbai Maharashtra Live News in Marathi| शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचा वाळव्याचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपकडून निशीकांत भोसले पाटील हेच उमेदवार असतील असा निर्वाळा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इस्लामपूर भेटीवेळी दिला. यामुळे भाजप महायुतीतील मित्रपक्षांच्या साथीने आमदार जयंत पाटील यांना राज्यभर दौरे न करता मतदारसंघातच अडकवून ठेवण्याची रणनीती अवलंबत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : दादरमधील फुल बाजारातील रस्ता अडवून अनधिकृतपणे फुलांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने गुरुवारी सकाळी कारवाई केली. अतिक्रमण निर्मुलन विभाग आणि घनकचरा विभागाने संयुक्तपणे सकाळी ९ वाजता ही कारवाई केली.
अलिबाग – राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो असे म्हणतात. याचा प्रत्यय आता रायगडकरांना येतोय. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये धुसफूस संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांकडून सकारात्मक पावले टाकली जात असून, गाठीभेटी आणि बैठकांना वेग आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२२चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याचा कट ऑफ जाहीर करण्यात आला असून यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका हद्दवाढ माझ्या पद्धतीने करणार आहे, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया आज उमटली. कोल्हापूर शहराभोवतीच्या संभाव्य हद्दवाढीतील १८ गावांमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. कोल्हापूर हद्दवाढीला विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देण्यात आले.
राज्य शासनाने नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलला भारतीय प्रशासकीय सेवा निवासी प्रशिक्षण वर्ग उघडण्यासाठी ५२ एकर जागा भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली – सर्वाधिक वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पूर्वेतील फ प्रभाग हद्दीतील फडके रस्ता, नेहरू रस्ता, चिमणी गल्ली भागाला फेरीवाल्यांचा विळखा कायम आहे. दररोज सकाळ, संध्याकाळी फ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कामगारांकडून फेरीवाल्यांवर देखाव्यापुरती कारवाई करून वरिष्ठांसमोर कारवाईचा देखावा उभा केला जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
मेडिकल रुग्णालयात बीपीएल रुग्णांना नि:शुल्क ‘एमआरआय’ काढून दिले जातात. परंतु, मेयोत मात्र शुल्क आकारले जाते.
वसई – विवाहविषयक संकेतस्थळावर तरुणींची वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक आणि शारीरिक फसवणूक होत असते. आता फसवणुकीच्या या प्रकारामध्ये नायजेरिन भामट्यांनीदेखील प्रवेश केला आहे. विवाहविषयक संकेतस्थळावर भारतीय तरुणाच्या नावाने बनावट खाते तयार करून तरुणींची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशा प्रकारच्या दोन घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत.
या मित्रांपैकीच एकाने शिजलेले मटन काढून ठेवले होते. त्यातून वाद झाला. त्यापैकीच एकाने वन खात्यास ही माहिती कळविली.
विश्र्वकुंज पिक्चर्सचे प्रकाश पवार यांनी बलोच हा मराठी चित्रपट शाळांमध्ये दाखविण्याची परवानगी शासनाकडे मागितली होती.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये, लाभार्थी अपात्र का झाला, हे जाणून घेण्याचा अधिकार संबंधित लाभार्थ्यांना आहे.
एकाच आठवड्यात सलग दोन खुनाच्या घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांसमोर दोन्ही घटनेतील हल्लेखोर पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
काँग्रेसचे ओबीसींबद्दल ‘पुतना मावशी’चे प्रेम आहे. काँग्रेसने मंडल आयोगाच्या शिफारसींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे ओबीसी आर्थिकदृष्ट्या कमजोर राहिला, असे देशमुख म्हणाले.
महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा साठा कमी होत आहे. विशेष म्हणजे, खाणीत पाणी असल्याने कोळसा उत्खननावर मर्यादा येत असून महानिर्मितीची चिंता वाढली आहे.
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील मैदानावरील विश्वचषक क्रिकेट सामन्यासाठी पीएमपीने विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या सेवेला क्रिकेट शौकिनांचा प्रतिसाद मिळाल्यास आवश्यकतेनुसार जादा गाड्या सोडण्याचे नियोजनही वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
या लॉजवर नागपुरातील अनेक तरुणी वेश्याव्यवसाय करीत होत्या. त्यामध्ये काही महाविद्यालयीन तरुणींचा समावेश आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर जामठ्याजवळ कुऱ्हाडीचा धाक दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्याला आठवडाभराचा कालावधी उलटला तरीही पोलिसांना अद्याप आरोपी गवसला नाही.
जळगाव: शहरातील पिंप्राळा उपनगरातील सेंट्रल बँक कॉलनीत बंद घर फोडून रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीप्रकरणी अवघ्या काही तासांतच चार संशयितांना रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या. संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
‘वनदुर्गा’ हा सोहळा यावर्षी आसाममधील गुवाहाटी येथे येत्या चार ते आठ डिसेंबरदरम्यान आयोजित केला जाणार आहे.
पिंपरी : चिंचवड, पिंपरी, मावळमधील बूथ प्रमुख फोन उचलत नाही. निम्मे पन्नाप्रमुख गायब आहेत. चिंचवडमध्ये केवळ तीन, पिंपरीत १५ आणि मावळमध्ये १७ लोकांनी नुकतीच झालेली ‘मन की बात’ बघितली. मग कसा व्हायचा महाविजय? असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.
अकोला: सांस्कृतिक कार्य विभागाच्या गणेशोत्सव स्पर्धेत राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला आहे.
अकोला: चंद्र पृथ्वीभोवती तर पृथ्वी सूर्याभोवती फिरतांना दोन्ही बाजूंनी एकारेषेत आल्यावर सूर्य-चंद्र ग्रहण होते. या माध्यमातून निसर्गातील सावल्यांचा खेळ बघण्याची संधी उपलब्ध होते. या महिन्यात १४ व २९ऑक्टोबरला सूर्य व चंद्र ग्रहण आहे.
मुंबईत मराठा समाजातील बांधवांनी त्यांच्या न्याय हक्कांसाठी गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला असा मोर्चा काढला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोर्चाला सुरुवात झाली आहे. मराठा बांधवांचा मोर्चा निघणार हा व्हायरल मेसेज पोलिसांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राईव्ह परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. आता हाच व्हायरल मेसेज खरा ठरला असून मराठा आंदोलक मोर्चासाठी गिरगाव चौपाटीवर एकत्र आलेत. गिरगाव चौपाटीपासून मोर्चाला सुरुवात झाली असून हा मोर्चा मुंख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या दिशेनं कूच करत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरही कडेकोट पोलीस
बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) आणि बक्षिसाची रक्कम देण्यात येणार आहे.
पिंपरी: भामा आसखेड आणि आंद्रा धरणातील मंजूर पाणी आणण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामाला गती देण्यात आली आहे.
अकोला: शहरातील एका डॉक्टरने आपल्या राहत्या घरात हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.
“२०१९ च्या पहाटेच्या शपथवविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं की शरद पवारांनी विश्वासघात केला ते योग्यच आहे. मी शरद पवार यांना गुरु मानतो त्यामुळे मी असं म्हणणार नाही. पण त्यांनी भाजपाला २०१९ मध्ये डिच केलं. शरद पवारांनी शब्द दिला होता म्हणून शिवसेनेची साथ सोडली. शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी झाली होती. मात्र नंतर जाऊन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगितलं होतं की मला भाजपाबरोबर जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की विश्वासघात केला. ते तसं म्हणू शकतात. मी हे म्हणतोय की शरद पवारांनी भाजपाला डिच केलं.”
पुणे : मनसेचे नेते, पुणे लोकसभा निवडणुकीचे समन्वयक अमित ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर शहर मनसेतील वाद संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. अतिम ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर आणि त्यांनी केलेल्या सूचनेनुसार माजी शहराध्यक्ष वसंत मोरे पक्ष कार्यालयात बुधवारी उपस्थित राहिले. त्यामुळे हा वाद मिटल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे (फोटो – एएनआय)
शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून १३ ऑक्टोबरऐवजी सुनावणी आज दुपारी २ वाजता होणार आहे. जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तिकडे जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती आहे.