अकोला: सांस्कृतिक कार्य विभागाच्या गणेशोत्सव स्पर्धेत राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पटकावला आहे. पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आकर्षक पर्यावरणपूरक सजावटीमध्ये पातूरचे गणेशोत्सव मंडळ राज्यात अव्वल ठरले आहे.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्यावतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा -२०२३ चा निकाल घोषित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पातूर, जिल्हा अकोला, द्वितीय पुरस्कार तिरंगा गणेशोत्सव मंडळ,यशवंतराव, विटा, ता. खानापूर, जि. सांगली यांना तर आणि तृतीय पुरस्कार मार्केट यार्ड मित्र मंडळ, मंचर,ता. आंबेगाव, जि. पुणे यांना जाहीर झाला. राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २ लाख ५० हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख रकमेचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय ३६ जिल्ह्यांसाठीही जिल्हानिहाय पारितोषिक विजेते जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप प्रत्येकी रुपये २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.

Kolhapur, Kolhapur lok sabha,
उद्योजक ते कलाकार… कोल्हापुरात सारेच प्रचारात
Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

हेही वाचा… १५ दिवसांत आकाशांत दोनदा ‘खेळ सावल्यांचा’; अनोखा आकाश नजारा बघण्याची संधी

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज, १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक समारंभ होणार असून शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला ‘गणराज रंगी नाचतो’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले आहे.