Mumbai Pune Nagpur News Updates, 05 November 2025 : राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींची निवडणूक २ डिसेंबरला होणार आहे. या संदर्भातील घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे नेते जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडानी हल्ला केला’, असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Mumbai Updates Today : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

11:02 (IST) 5 Nov 2025

आयटीआयच्या बळकटीकरणासाठी राज्य सरकारचे पाऊल… नेमके होणार काय?

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पीएम सेतू या योजनेचे उद्घाटन केले. …अधिक वाचा
10:51 (IST) 5 Nov 2025

Metro Line 9 :‘मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी कारशेड लवकरच रद्द ? स्थानिकांच्या विरोधानंतर एमएमआरडीएचा विचार, लवकरच निर्णय

मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेड सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. या मार्गिकेतील कारशेड राई, मुर्धा, मोर्वा येथे प्रस्तावित करण्यात आली होती. …सविस्तर बातमी
10:50 (IST) 5 Nov 2025

Maharashtra Municipal Elections 2025 : सविस्तर : नगरपालिकांवर वर्चस्व कुणाचे? आतापर्यंतची कामगिरी काय सांगते?

Maharashtra Local Body Elections 2025 : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पार पाडत आहेत. …वाचा सविस्तर
10:41 (IST) 5 Nov 2025

‘शेतकऱ्यांना काही ठिकाणी फक्त २ रुपये मदत मिळाली’, उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर; सरकारवर केली टीका

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पैठणमधील काही शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. पालघरसह आणखी काही ठिकाणी शेतकऱ्यांना पीकविम्याचे अवघे दोन रुपये मिळाले आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याच मुद्यांवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली.

10:38 (IST) 5 Nov 2025

“हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडाचा हल्ला”; रवींद्र धंगेकरांचा मंत्री मोहोळांवर पुन्हा गंभीर आरोप; शेअर केली नवी पोस्ट

शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पुण्यात चांगलंच राजकारण तापलं होतं. त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडानी हल्ला केला आहे’, असा गंभीर आरोप करत धंगेकरांनी नवी पोस्ट शेअर केली आहे. तसेच या प्रकरणात कारवाईची मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

सविस्तर वाचा

“हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मोहळांच्या गुंडाचा हल्ला”; रवींद्र धंगेकरांचा मंत्री मोहोळांवर पुन्हा गंभीर आरोप, (फोटो-संग्रहित छायाचित्र)