Maharashtra Political New Updates, 11November 2025 : दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान काहीही झालं तरीही मनसेसह जायचं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महापालिका आणि इतर निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. या बातमीसह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : दिल्लीत झालेला कारचा स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश, नाना पटोलेंची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 

12:15 (IST) 11 Nov 2025

Air Pollution Maharashtra : राज्यात वायू प्रदूषणाचे संकट

विविध प्रकल्पांची कामे, बांधकामे, वाहनांतून निघणारा धूर यामुळे वायू प्रदूषणात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. …सविस्तर बातमी
12:15 (IST) 11 Nov 2025

Air Pollution Maharashtra : राज्यात वायू प्रदूषणाचे संकट

विविध प्रकल्पांची कामे, बांधकामे, वाहनांतून निघणारा धूर यामुळे वायू प्रदूषणात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. …सविस्तर बातमी
12:13 (IST) 11 Nov 2025

छत्रपती संभाजीनगर : पैठण गेटवरील व्यापारी पेठेत एकाचा खून; जमावाकडून तोडफोड….

इम्रान कुरेशी आणि आरोपींमध्ये जुना वाद होता. दोघेही एकाच भागात व्यवसाय करत होते. …वाचा सविस्तर
12:08 (IST) 11 Nov 2025

केईएम रुग्णालयाच्या ढिसाळ कारभार, मंगलप्रभात लोढा यांनी अधिष्ठातांना धरले धारेवर

लोढा यांनी सोमवारी केईएम रुग्णालयाचा पाहणी दौरा केला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचा ढिसाळ कारभाराचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. …वाचा सविस्तर
12:04 (IST) 11 Nov 2025

Delhi Car Blast : “दिल्ली हल्ल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आश्वासनांची पोलखोल”, नाना पटोलेंची टीका; गृहमंत्री शहांवरही..

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. …सविस्तर वाचा
12:00 (IST) 11 Nov 2025

BMC Election : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीला एससी एसटी प्रभाग वाटपाने सुरुवात….

BMC Election Reservation Draw : यंदाच्या निवडणुकीसाठी चक्रानुक्रमे पद्धतीकरीता प्रथम निवडणूक ग्राह्य धरण्यात आली आहे. …अधिक वाचा
11:24 (IST) 11 Nov 2025

गळ्यात अडकलेला माशाचा काटा काढण्यास डॉक्टरांचा नकार, कूपरमध्ये मारहाण केल्याप्रकरणी डॉक्टरांमध्ये दहशतीचे वातावरण

परिणामी गंभीर स्थितीत येणाऱ्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येत असले तरी त्यांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. …अधिक वाचा
11:08 (IST) 11 Nov 2025

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन आकर्षण वाढणार; सिंह सफारी नोव्हेंबर, तर मिनी ट्रेन डिसेंबरपर्यंत सुरू होणार

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये विविध पुनर्बांधणी प्रकल्प सुरू आहेत. उद्यानात ऑर्किडॅरियम आणि विविध प्रकारच्या सुगंधी आणि फुलझाडांचा समावेश असलेली सुगंधी बाग विस्तारित करण्यात येत आहे. …सविस्तर बातमी
10:54 (IST) 11 Nov 2025

दिल्ली स्फोटांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांच्या सुरक्षेत वाढ

दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील गर्दीच्या ठिकाण असलेल्या अनेक देवस्थानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या गजानन महाराजांच्या शेगाव मंदिर परिसरातही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रात्रीपासूनच कुठलाच गैरप्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणेसह शेगाव मंदिर सुरक्षा रक्षक अलर्ट मोडवर आले आहेत. प्रत्येक येणाऱ्या भाविकांची या ठिकाणी कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या बॅगा तपासल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सुरक्षा यंत्रणा खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

10:49 (IST) 11 Nov 2025

मुंबई महानगरपालिकेच्या शाळासंख्येत घट… अन्य माध्यमाच्या शाळा घसरणीला; इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मात्र वाढ

मुंबई : विविध कारणांमुळे महानगरपालिकेच्या शाळा बंद पडण्याचे सत्र सुरूच असून न्यू माहीम शाळेच्या मुद्द्यामुळे बंद शाळांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईत गेल्या तीन वर्षात विविध माध्यमांच्या २८ शाळा बंद किंवा समायोजित झाल्याचे समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

10:43 (IST) 11 Nov 2025

दिल्लीतला स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश-नाना पटोले

आम्हीच करू शकतो अशा पद्धतीने आश्वासन देऊन लोकांना मूर्ख बनवलं. आता कश्मीर असुरक्षित आहे, छप्पन इंचाची छाती आता कुठे गेली आहे? आम्हाला राजकारण करायचं नाही. दिल्लीत आणि केंद्रात सरकार यांच असताना हे दहशतवादी या ठिकाणी आले कुठून? असा प्रश्न निर्माण होत आहे.नरेंद्र मोदींनी दिलेल्या खोटे आश्वासनांची पोलखोल आता झाली आहेभ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. आम्हाला यात राजकारण करायचं नाही पण देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात आम्ही तिथेच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या बॉम्बस्फोटामध्ये दहशतवादी येतात, सरकार बिहारच्या प्रचारात मग्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहे. देश सुरक्षित नाही, देशाच्या सुरक्षेची हमी घेणारे प्रधानमंत्री, गृहमंत्री कुठे लपले आहेत? या स्फोटाची जबाबदारी त्यांची आहे अशी टीकाही नाना पटोलेंनी केली आहे.

दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.