Maharashtra Political New Updates, 11November 2025 : दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान काहीही झालं तरीही मनसेसह जायचं नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही महापालिका आणि इतर निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. या बातमीसह महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Updates Today : दिल्लीत झालेला कारचा स्फोट हे केंद्र सरकारचं अपयश, नाना पटोलेंची टीका आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 

20:49 (IST) 11 Nov 2025

डॉक्टरांच्या कामचुकारपणाचा रुग्णांना फटका; मालाडमधील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग असतानाही रुग्णांची अन्यत्र रवानगी

मालाड येथील एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांच्या कामचुकारपणाचा फटका रुग्णांना बसत आहे. …सविस्तर वाचा
20:41 (IST) 11 Nov 2025

मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण गटासाठी १४९ आरक्षित प्रभाग; त्यातील ७५ प्रभाग सर्वांसाठीच खुले

मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीसाठी जागा आरक्षित झाल्यानंतर सर्वसाधारण वर्गासाठी १४९ प्रभाग जाहीर करण्यात आले. …वाचा सविस्तर
20:32 (IST) 11 Nov 2025

सत्तेसाठी एकत्र आलेले तीन साप एकमेकांना गिळू पाहताहेत; उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका

उद्धव ठाकरे म्हणाले, महायुती सरकारमध्ये सत्तेसाठी सापासारखे एकमेकांना गिळणे सुरू आहे; जनता आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. …सविस्तर वाचा
20:23 (IST) 11 Nov 2025

Maharashtra Cold Weather : राज्यात सर्वत्र हुडहुडी; पारा दहा अंशाच्या खाली

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा जोर वाढला आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा जोर कमी झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात घट झाली आहे. …सविस्तर बातमी
20:15 (IST) 11 Nov 2025

बालहक्क आयोगातील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिक्षण कार्यकर्त्याची उच्च न्यायालयात धाव

अल्पवयीन बालकांच्या हक्कांचे संरक्षण, संवर्धन आणि विकास करण्यासाठी केंद्र शासनाने महाराष्ट्रात राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्थापना केली. …वाचा सविस्तर
20:08 (IST) 11 Nov 2025

एनआयआरएफच्या प्रत्येक श्रेणीमध्ये एसडीजीचा समावेश; प्रत्येक गटवारीमध्ये एसडीजीसाठी ५ टक्के गुण

शैक्षणिक संस्थांनी शाश्वत विकासाला प्राधान्य द्यावे यासाठी २०२५ पासून राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) ‘शाश्वत विकास ध्येय’ (एसडीजी) ही नवी श्रेणी सुरू करण्यात आली असून या श्रेणीमध्ये पहिल्याच वर्षी १० संस्थांनी स्थान पटकावले. …वाचा सविस्तर
19:59 (IST) 11 Nov 2025

पिंपरीत दिग्ग्जांना धक्का; माजी उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्याची अडचण

महापालिकेच्या निवडणुकीसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मंगळवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली सोडत प्रक्रिया पार पडली. …सविस्तर बातमी
19:49 (IST) 11 Nov 2025

माजी महापौर, माजी विरोधी पक्षनेत्यांना नवे प्रभाग शोधावे लागणार; मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात आरक्षण चक्रानुक्रमे फिरवण्याच्या प्रयोजनार्थ आगामी होणारी निवडणूक ही पहिली निवडणूक म्हणून ग्राह्य धरण्याबाबत तरतूद केली होती. …वाचा सविस्तर
19:44 (IST) 11 Nov 2025

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीसाठी पूजा, रुद्राभिषेक : पाच पुरोहितांकडून वेदमंत्रोच्चारही

संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खरे शिलेदार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ते पुन्हा पक्षाच्या कार्यात सक्रिय व्हावेत, या हेतूने १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. …सविस्तर बातमी
19:35 (IST) 11 Nov 2025

जळगावात ठाकरे गटाला धक्का… माजी खासदारांसह चौघांविरूद्ध पाच कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा !

छत्रपती संभाजीनगरातील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेत उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीच्या नावाने सुमारे पाच कोटी ३३ लाख रूपयांचे औद्योगिक कर्ज काही वर्षांपूर्वी घेण्यात आले होते. …सविस्तर बातमी
19:26 (IST) 11 Nov 2025

सुरगाणा मध्ये पुन्हा एकदा अवैध वाहतूक; व्यापाऱ्याची चौकशी…

जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी राज्य सहकारी आदिवासी महामंडळाच्या नाशिक कार्यालयाने खरेदी केलेले धान्य गुजरातच्या काळ्या बाजारात परस्पर विक्री होत असल्याचे प्रकरण उघड झाले होते. …वाचा सविस्तर
19:22 (IST) 11 Nov 2025

एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्यावत पथकर नाका

मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणारी वाहतूक कोंडी आणि वायू प्रदुषण नियंत्रणात आणण्यासाठी दहिसर पथकर नाक्याऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल स्वीकारण्याबाबतचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. …अधिक वाचा
18:56 (IST) 11 Nov 2025

पिंपरी महापालिकेला केंद्र शासनाचा ‘शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार’

पिंपरी-चिंचवड महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. …अधिक वाचा
18:48 (IST) 11 Nov 2025

Pimpri Chinchwad Crime : ‘फक्त माझीच चालणार’ म्हणत तरुणावर गोळीबार

मद्य पिण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आली. ही घटना बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिरंगुट येथील सावकारवाडी भागात घडली. …अधिक वाचा
18:37 (IST) 11 Nov 2025

Mumbai Air Quality : माझगाव, मालाडमध्ये अशुद्ध हवा; मुंबईची हवा गुणवत्ता खालावली

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून माझगाव, वरळी आणि मालाड येथे ‘वाईट’ हवा नोंदली गेली आहे. मंगळवारी मुंबईचा हवा निर्देशांक १४८ तर या भागांमध्ये तो २४० ते २८० दरम्यान होता. …अधिक वाचा
18:25 (IST) 11 Nov 2025

पुण्यातल्या भरतकाम शिकविणारा क्लास झाला ७५ वर्षांचा…

‘पंचाहत्तरी’चे अप्रूप आणि ‘पन्नाशी’चे आव्हान‘धागा धागा अखंड विणू या’ असे जणू व्रत घेतलेल्या मंदाकिनी परांजपे यांनी १९५० मध्ये पेंटिंग आणि भरतकाम क्लास सुरू केला. त्या क्लासचा अमृतमहोत्सव आणि बालकुमार साहित्य संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता यानिमित्ताने… …सविस्तर बातमी
17:50 (IST) 11 Nov 2025

कापूस उत्पादकांना दिलासा… जळगाव जिल्ह्यात १५ ठिकाणी ‘सीसीआय’ची खरेदी केंद्रे

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘सीसीआय’ची १५ कापूस खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यानंतर ही मान्यता मिळाली असून शेतकऱ्यांना ८१०० रुपयांच्या हमीभावाने विक्रीचा लाभ मिळणार आहे. …वाचा सविस्तर
17:34 (IST) 11 Nov 2025

अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात फेरीवाल्यांचे आंदोलन

नाशिकमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहिमेविरोधात फेरीवाल्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. पंधरा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावरची लढाई छेडण्याचा इशारा श्रमशक्ती हॉकर्स सेलने दिला. …सविस्तर वाचा
17:17 (IST) 11 Nov 2025

Jalgaon Politics : एरंडोल-पारोळ्यात अजित पवार गटाला डावलून भाजप-शिंदे गटाची वेगळी चूल…!

जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू झाली असली, तरी भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) अजुनही युतीवर एकमत झालेले नाही. …वाचा सविस्तर
17:15 (IST) 11 Nov 2025

Eknath Shinde Video : एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या भावाला म्हणाले, “त्यांना सांग…”, फोनवरून केली प्रकृतीची चौकशी!

एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याची बाब समोर आली आहे. …सविस्तर वाचा
17:07 (IST) 11 Nov 2025

त्र्यंबकेश्वर तालुक्यात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे आंदोलन

एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनी रस्त्यांची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी बांधकाम विभागाने आश्वासन दिले होते. त्यास वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही अद्याप सदर रस्त्याची दुरूस्ती झालेली नाही. …अधिक वाचा
16:45 (IST) 11 Nov 2025

ठाकरेंचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर आज शिंदेच्या शिवसेनेत ?

शिवसेनेचे (ऊद्धव ठाकरे) जालना जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर बुधवारी (दिनांक १२ नोव्हेंबर) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकल्याकडून सांगितले जात आहे. …सविस्तर बातमी
16:29 (IST) 11 Nov 2025

ISRO Study Tour : महाराष्ट्रातील १०० हून अधिक विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड…!

गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयावर आधारित स्पर्धा परीक्षेतून सर्व विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. हे विद्यार्थी जानेवारी महिन्यात इस्रो आयआयटी सायन्स सिटी आयआयएम या, शिक्षण व तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत. …अधिक वाचा
16:19 (IST) 11 Nov 2025

वाळू साठ्याचे गौडबंगाल… जळगावात बांधकाम विभागावर दंडात्मक कारवाईची टांगती तलवार !

जिल्ह्यात विविध कारणांमुळे वाळू ठेक्यांच्या लिलावाची प्रक्रिया रखडली असताना, या संधीचा गैरफायदा घेत वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर उच्छाद मांडला आहे. …अधिक वाचा
16:05 (IST) 11 Nov 2025

एकनाथ शिंदे यांचा महायुतीसाठी आदेश पण… दादा भुसे यांच्या विधानाचा अर्थ काय ?

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचा मालेगाव येथे जंगी मेळावा पार पडला. …सविस्तर वाचा
15:59 (IST) 11 Nov 2025

Vasai Virar Update: दिल्लीतील स्फोटानंतर वसई रेल्वे स्थानकात पोलिसांची विशेष तपासणी मोहीम

सोमवारी रात्री वसई, विरार, नालासोपारा, नायगाव या रेल्वे स्थानकात सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडून तोडफोड विरोधी (Anti-Sabotage) तपासणी मोहीम राबविण्यात आली. …सविस्तर वाचा
15:53 (IST) 11 Nov 2025

धुळे : १९ प्रभागात ७४ जागांसाठी आरक्षण सोडत : ३७ महिलांना महापालिका सभागृहात संधी

धुळे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार आज सकाळी धुळे शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर येथे धुळे महापालिका प्रशासनाच्या वतीने १९ प्रभागातील आरक्षण सोडत काढण्यात आली. …सविस्तर वाचा
15:46 (IST) 11 Nov 2025

नवी मुंबईत पुन्हा ‘महिला राज’! १११ पैकी तब्बल ५६ जागा महिलांसाठी राखीव

तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे माजी नगरसेवक, राजकीय इच्छुक उमेदवार आणि नवीन चेहरे यांचे लक्ष लागून आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक प्रभागांमध्ये राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे दिसत आहेत …सविस्तर वाचा
15:45 (IST) 11 Nov 2025

प्रोटिओमिक्स तंत्रामुळे मधुमेह व मूत्रपिंड विकाराचा त्रास आधीच ओळखता येणार!

भारतामध्ये सध्या आठ कोटींहून अधिक व्यक्तींना मधुमेह असून जवळपास १३ कोटी जण प्रि-डायबेटिक श्रेणीत आहेत. निदानासाठी प्रचलित चाचण्या दोष दाखवतात तेव्हा शरीरातील नुकसान मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले असते, असा इशारा तज्ज्ञांनी आधीच दिला आहे. …अधिक वाचा
15:37 (IST) 11 Nov 2025

यवतमाळ : महायुती नाही, पण शिवसेना-राष्ट्रवादीचा फॉर्म्युला ठरला, भाजपकडून अद्याप…

नगरपालिकेच्या नामांकनासाठी अवघा आठवडा उरला असताना, एकाही पक्षाकडून अद्याप नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित झालेले नाही. …सविस्तर वाचा

दिल्लीत झालेल्या स्फोटांवरुन नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांचं हे अपयश असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आणखी काही नवे अपडेट्स समोर येतात का? ते पाहणंही महत्वाचं असणार आहे. तर २ तारखेला निवडणूक होणार आहे त्याची तयारी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरु केली आहे.