Maharashtra Monsoon Session 2025 Live Updates, 11 July : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच गुरुवारी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक सादर केलं, त्यानंतर त्यावर चर्चा झाली आणि नंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आलं. आता हे विधेयक विधानपरिषदेत सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.
या अधिवशनाच्या दरम्यान आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टिनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने संजय गायकवाड यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची देखील चर्चा आहे. या बरोबरच राज्यभर विविध ठिकाणी मुसळधार पावसानेही हजेरी लावल्याचं दिसत आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडमोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Latest Maharashtra News Live Today : राज्यातील राजकीय व इतर महत्त्वाच्या घडमोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
‘बाजारात स्वस्त दरात भेसळयुक्त दूध, कायदा आणखी कडक करा’, आमदार सदाभाऊ खोत यांची मागणी
“राज्यात म्हशीचे दूध तब्बल ८० ते ९० लाख लीटर तयार होतं आणि गाईचे दूध १ कोटी २५ लाख लीटर तयार होतं. तसेच राज्यातील एकूण दुधाचं पॅकिंग ७० लाख लीटरच्या आसपास आहे. तसेच ३० ते ४० लाख लीटर दूध हे काही पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं. तसेच काही लाख लीटर दुधाच्या पावडरसाठी वापरलं जातं. एका बाजूला शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय परवडत नाही. याचं कारण भेसळयुक्त दूध बाजारात मोठ्या प्रमाणात येतं. त्यामुळे शेतकऱ्यांनाही लुटायचं आणि लोकांच्या आरोग्याशी खेळायचं असा हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे बाजारात स्वस्त दरात मिळणारे भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी कायदा कडक करण्याची आवश्यकता असल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु असून विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)