Maharashtra Breaking News Updates, 29 September 2022 : नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. शिंदे आणि विचारे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरु केलेल्या या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे.

तर भाजपा नेत्या पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीवरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. त्यानंतर खुद्द पंकजा मुंडेंनीही त्यावर स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं होतं. बीडमधील त्यांच्या या विधानानंतर आता अजून एका उपहासात्मक विधानाची चर्चा आहे. बीडच्याच एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी ‘मी सध्या बेरोजगारच आहे’, असं म्हणताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. यावेळी पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगचाही समाचार घेतला.

या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Mumbai-Maharashtra Latest News Updates, 29 September 2022 : राज्यातील राजकारण, न्यायालयीन घडामोडी आणि अन्य बातम्या वाचा एकाच ठिकाणी 

11:26 (IST) 29 Sep 2022
नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून

नागपूर : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली बसून दारू पित बसलेल्या एका युवकाला वाटसरू युवकाने ‘बेवडा’ म्हटले आणि शिवी दिली. त्यामुळे चिडलेल्या युवकाने दगडाने ठेचून वाटसरू युवकाचा खून केला. बातमी वाचा सविस्तर …

10:48 (IST) 29 Sep 2022
निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत काय होणार? उज्ज्वल निकम म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी दिवसभर झालेल्या सुनावणीनंतर खरी शिवसेना कोणाची’, या राज्यातील सत्तासंघर्षांमधील अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावणी घ्यावी असा निर्णय घटनापीठाने दिला आहे. या निर्णयामुळे शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हासंदर्भातील निर्णय घेण्याचा आयोगाचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिंदे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मात्र आता निवडणूक चिन्हासंदर्भात निवडणूक आयोग नेमका निकाल कसा घेणार यासंदर्भातील दावे-प्रतिदावे केले जात असतानाच ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी अशा वादामध्ये नेमका कशापद्धतीने निर्णय घेतला जातो यासंदर्भातील माहिती दिली.

सविस्तर वाचा –

10:48 (IST) 29 Sep 2022
शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, म्हणाल्या “महाराष्ट्राचा एक दौरा…”

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

सविस्तर बातमी

10:47 (IST) 29 Sep 2022
शशी थरुर यांनी मजरुह सुलतानपुरींचा शेर केला ट्वीट, लोक म्हणाले “त्यांना तर नेहरुंनी सरकारविरोधी लिखाण केल्याने…”

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे खासदार शशी थरुर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एक ट्विट केलं आहे. या ट्विवट्च्या माध्यमातून त्यांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा वाढत असल्याचा दावा अप्रत्यक्षरीत्या केला आहे. यासाठी त्यांनी प्रसिद्ध गीतकार व शायर मजरूह सुलतानपुरी यांच्या एका प्रसिद्ध शेरची मदत घेतली. मात्र त्यांनी हा शेर ट्वीट केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना इतिहासाची आठवण करुन दिली.

सविस्तर बातमी

10:47 (IST) 29 Sep 2022
शरद पवार पुन्हा सत्तेत येणार? सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

शिवसेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडखोरीमुळे अडीच वर्ष सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे राज्यातून गेलेली सत्ता पुन्हा आणण्यासाठी शरद पवार आता कोणती रणनीती अवलंबणार याची चर्चा आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्या इंदापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या.

सविस्तर वाचा –

10:47 (IST) 29 Sep 2022
जम्मू काश्मीरमध्ये आठ तासांत आणखी एक रहस्यमय स्फोट, नेमकं काय चालू आहे?

जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात आणखी एक रहस्यमय स्फोट झाला आहे. बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गुरुवारी सकाळी हा स्फोट झाला. गेल्या आठ तासातील अशा प्रकारचा हा दुसरा स्फोट आहे. सुदैवाने, या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सविस्तर बातमी

10:46 (IST) 29 Sep 2022
‘…नंतर म्हणाल कंडोम द्या,’ सॅनिटरी पॅडची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना महिला IAS अधिकाऱ्याचं अजब उत्तर

सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करुन देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थिनींना बिहार महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी अजब उत्तर दिलं आहे. ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या कंडोम मागाल’, असं उत्तर त्यांनी दिल्याने सध्या चर्चा रंगली आहे.

सविस्तर बातमी

10:45 (IST) 29 Sep 2022
दिपक केसरकरांचं पक्षप्रमुख पदाबद्दल महत्त्वाचं विधान

मुंबई उच्च न्यायालयाने मागील आठवड्यामध्ये उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी दादारमधील शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी दिल्यानंतर आता वांद्रे-कुर्ला संकुल येथे शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. पुढील आठवड्यात वांद्रे-कुर्ला संकुलात होणारा दसरा मेळावा अधिक भव्य करण्याचा निर्धार शिंदे गटाने केला असून याच निमित्त शिंदेंच्या निवासस्थानी शिंदे गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख पदाबद्दल मोठं विधान केलं आहे.

सविस्तर वाचा –

सर्वोच्च न्यायालयातील पहिला निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागल्याने शिवसेनेनं पहिल्यांदाच पक्ष म्हणून आपली बाजू मांडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संपादक असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखामधून ‘सर्व प्रकारच्या लढाईस आम्ही सज्ज आहोत’ असं सांगत शिवसेनेनं निवडणूक आयोगासमोरील लढाईसाठीची तयारी दर्शवली आहे. इतकंच नाही तर शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका करताना, “आईला आई व बापाला बाप न मानणाऱ्यांची नवी अवलाद कमळाबाईने महाराष्ट्राच्या विरोधात उभी केली” असा टोलाही शिवसेनेनं लगावला आहे.