Maharashtra Breaking News Today, 13 October 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातील याचिकेवर आज, १३ ऑक्टोबरला एकत्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर १० ऑक्टोबर सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं १३ ऑक्टोबरला सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे राज्यात टोल दरवाढीवरून वातावरण तापलं आहे. दरम्यान, ठाण्यातून मुंबईत येणाऱ्या लहान वाहनांना टोलमाफी करण्याच्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करत असून यासंदर्भातील चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) दादा भुसे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज होणार आहे. त्यामुळे आज निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील, देशातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.

Live Updates

Mumbai News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा

14:08 (IST) 13 Oct 2023
कल्याण : दुहेरी हत्येच्या आरोपातील सहा जण निर्दोष, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

कल्याण – दुहेरी हत्येचा आरोप असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सहा जणांची ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रेमळ विठ्ठलानी यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मृत्यू झालेल्यांमध्ये एका पोलिसाचाही समावेश होता.

सविस्तर वाचा…

14:07 (IST) 13 Oct 2023
“माझ्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाचं सर्वात महत्त्वाचं वाक्य म्हणजे…”; सुनावणीवर जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहचला. न्यायालयाने निर्देश देऊनही अद्याप विधानसभा अध्यक्षांकडून या प्रकरणी निकाल देण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज (१३ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राहुल नार्वेकरांना सुनावणी प्रलंबित ठेवल्यावरून चांगलंच सुनावलं. तसेच तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला गांभीर्याने घेत नसल्याचं निरिक्षण नोंदवत फटकारलं. यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा…

14:07 (IST) 13 Oct 2023
बालिकेवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, उमरखेडमध्ये रास्ता रोको

आरोपी अजिज खान मोहमद खान पठाण रा. रुपाळा (नागापूर) याच्यावर खुनाचे १० गुन्हे व इतर १२ असे २२ च्या वर गुन्हे नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांत दाखल आहेत.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 13 Oct 2023
टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती

श्रीराम मंदिर लोर्कापण सोहळयाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून ठाण्यातील टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सवात श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. श्रीराम मंदिर कसे असेल, हे प्रत्येक नागरिकांना कळावे, या उद्देशातून ही प्रतिकृती साकारण्यात येत आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वाचा

14:00 (IST) 13 Oct 2023
शाळांजवळील पानटपऱ्यांवर कारवाई करा, युक्रांदची शिक्षण आयुक्तांकडे मागणी

पुणे : शाळेजवळील पानटपरी हटवण्यासाठी महापालिकेला पत्र दिल्याच्या रागातून नगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण संस्थाजवळ शंभर मीटरच्या परिसरातील पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवक क्रांती दलाने शिक्षण आयुक्तांकडे केली.

वाचा सविस्तर…

13:56 (IST) 13 Oct 2023
कल्याणमधील नांदिवली तलाव जवळील ४० घरे जमीनदोस्त, गुरचरण जमिनीवर उभारली होती घरे

कल्याण – शासनाच्या परवानगीविना कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावरील नांदिवली तर्फ येथील तलावाजवळील गुरचरण जमिनीवर उभारण्यात आलेली ४० घरे कल्याण डोंबिवली पालिका आणि महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईतून बुधवारी जमीनदोस्त करण्यात आली.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 13 Oct 2023
“जून महिन्यापासून काय घडलंय?”, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलं

जून महिन्यापासून काय घडलंय? हा गोंधळ असता कामा नये. विधानसभा अध्यक्षांकडून योग्य प्रकारे सुनावणी घेतली जायला हवी. त्यांनी रोजच्या रोज ही सुनावणी घेऊन पूर्ण करायला हवी. आपण नोव्हेंबरनंतर सुनावणी घेऊ असं ते म्हणू शकत नाहीत”, अशा शब्दांत न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे.

13:34 (IST) 13 Oct 2023
तुळजापुरात मंदिराच्या विकासावरून भाजप आमदाराच्या विरोधात वातावरण तापले

छत्रपती संभाजीनगर- तीर्थक्षेत्र विकासासाठी तुळजापूर विकासासाठी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी १३८५ कोटींचा निधी मंजूर केल्यानंतरही तुळजापूर मतदारसंघात स्वागताच्या कमानी उभारण्याऐवजी संघर्ष पेटल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.

वाचा सविस्तर…

13:33 (IST) 13 Oct 2023
पनवेल शहरात एकाच रात्री सात दुकाने फोडली

पनवेल: पनवेल शहरामध्ये चोरट्यांनी एकाच रात्री सात दुकानांचे शटर फोडले मात्र त्यांना एकाच दुकानात पंधरा हजार रुपयांची रोकड सापडली. चोरट्यांच्या हाती काही लागले नसले तरी चोरट्यांनी शहराच्या मध्यवर्ती ठिकणच्या व्यापारी संकुलात चोरी केल्यामुळे दिवाळीपूर्वी पनवेलच्या व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे.

वाचा सविस्तर…

13:30 (IST) 13 Oct 2023
कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या सुळकुड पाणीप्रश्नी उपोषण सुरू; नागरिकांचा प्रतिसाद

कोल्हापूर : सुळकूड योजना अंमलबजावणीसाठी आज इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण सुरू झाले. यामध्ये नागरिक, महिला, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

सविस्तर वाचा…

13:23 (IST) 13 Oct 2023
बुलढाण्याच्या प्रणालीची राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत दमदार कामगिरी

प्रणालीला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:22 (IST) 13 Oct 2023
पंधरा वर्षे छपाई यंत्र न वापरताच भंगारात, उल्हासनगर महापालिकेचा प्रताप, नागरिकांच्या खर्चाचा चुराडा

उल्हासनगरः पालिकेची आर्थिक स्थिती नाजून असल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे उल्हासनगर महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पालिकेने १५ वर्षांपूर्वी खरेदी केलेले छपाई यंत्र न वापरताच भंगारात काढण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरातून पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. २००८ वर्षात पालिकेने १२ छपाई यंत्रे खरेदी केली होती. मात्र त्यांचा एकदाही वापर केला नाही.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 13 Oct 2023
निराधारांची दिवाळी होणार गोड!; अनुदानात वाढ, आता १५०० प्रति महिना मिळणार

गेल्या तीन महिन्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या निराधारांसाठी आता गोड बातमी आली असून त्यांची दिवाळी ‘प्रकाशमय’ होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर निराधारांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:14 (IST) 13 Oct 2023
ठाणे शहरासाठी पुढील ३० वर्षांचे पाणी नियोजन आराखडा, ठाणे महापालिकेकडून नियोजनाच्या अंमलबाजवणीसाठी प्रयत्न

ठाणे : महापालिका क्षेत्राचे वाढते नागरिककरण लक्षात घेऊन पुढील ३० वर्षांत शहराला प्रतिदिन १ हजार ११६ दशलक्षलीटर इतका पाणीपुरवठा होणे अपेक्षित असून त्याआधारे ठाणे महापालिकेने शहराचा पाणी नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार विविध धरणांतून वाढीव पाणी घेण्याचे नियोजन असून या पाणी आरक्षणासाठी ठाणे महापालिकेने शासनस्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 13 Oct 2023
भिवंडी शहराच्या नव्या रचनेचा प्रारूप आराखडा तयार, पालिकेने मागिवल्या नागरिकांकडून हरकती व सुचना

ठाणे : भिवंडी शहरामध्ये पुढील वर्षातील वाढते नागरिकरण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने शहराचा नवीन विकास प्रारूप आराखडा पालिका प्रशासनाने तयार केला आहे. या आराखड्यामध्ये शहरातील विविध भुखंडावर आरक्षणे टाकण्यात आली असून उद्यान, मैदान, रस्ते तसेच इतर नागरी सुविधांचा समावेश आहे. हा आराखडा मंजूर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पालिकेने प्रारुप आराखडा प्रसिद्ध करत नागरिकांकडून ३० दिवसांत हरकती व सूचना मागविल्या आहेत.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 13 Oct 2023
शिंदखेडा तालुक्यातील खासगी बस अपघातात २० प्रवासी जखमी

धुळे: मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा (ता.शिंदखेडा) शिवारात शुक्रवारी सकाळी पुणे – गोरखपूर ही खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस उलटली.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 13 Oct 2023
यावल तालुक्यात एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त; १० ब्रास वाळूसाठाही जमा

जळगाव: यावल तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर महसूल विभाग व फैजपूर येथील पोलिसांच्या संयुक्त पथकाने पकडले.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 13 Oct 2023
ठाणे : गृहसंकुलातील गरबा प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद

ठाणे – नवरात्रौत्सावाच्या काळात रास-गरबा खेळण्याची इच्छा असते. पण, तो खेळता येत नसल्यामुळे काहींचा हिरमोड होतो. अशा व्यक्तींना रास-गरबा खेळता यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून विशेष गरबा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येतात. यंदाही नवरात्रौत्सवाच्या पंधरा दिवस आधीपासून या प्रशिक्षण कार्यशाळा सुरु झाल्या आहेत.

सविस्तर वाचा…

13:12 (IST) 13 Oct 2023
कालव्यांसाठी निविदा मंजूर; मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचण्याचा मार्ग प्रशस्त

नाशिक: येवला तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी साकारलेल्या देवसाने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालवा आणि पुणेगाव-दरसवाडी डाव्या कालव्याचे मातीकाम, बांधकाम, अस्तरीकरण करण्यासाठी २५२ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 13 Oct 2023
अंबरनाथमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, प्रकाशनगर भागात पहिल्या प्रकल्पासाठी हालचाली, पहिली बैठक सकारात्मक

अंबरनाथः अंबरनाथ शहरात पुन्हा एकदा झोपडपट्टीमुक्तीच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरातील झोपडपट्ट्या मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर विकसीत करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच पालिका मुख्यालयात बैठक पार पडली असून यात प्रकाशनगर भागात सर्वप्रथम ही योजना राबवण्यावर एकमत झाले आहे. या बैठकीला स्थानिक रहिवाशांचीही उपस्थिती होती.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 13 Oct 2023
डोंबिवलीत बनावट मोजणी नकाशाच्या आधारे ११ माळ्याच्या इमारतीची उभारणी; महाराष्ट्रनगर मधील विकासकावर गुन्हा

कल्याण: डोंबिवलीतील महाराष्ट्रनगरमध्ये एका विकासकाने भूमि अभिलेख विभागाच्या बनावट मोजणी नकाशाच्या आधारे कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाकडून दोन वर्षापूर्वी इमारत बांधकाम परवानगी घेतल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 13 Oct 2023
धान घोटाळ्याप्रकरणी कोटलावार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश; जिल्ह्यातील ४२ गिरणी मालकही चौकशीच्या फेऱ्यात

धान खरेदी व भरडाईत गैरव्यवहार केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळ गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन रमेश कोटलावार यांना ८ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले होते.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 13 Oct 2023
ठाणे : एक महिन्यात ४२ मुलांचे पुनर्वसन, जिल्हा महिला बालविकास विभागाची कामगिरी

ठाणे – बेपत्ता झालेली, गैर प्रकारात अडकलेली, बालकामगार, निराधार मुलांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरु केलेल्या चाईल्ड हेल्पलाईनद्वारे ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने ४२ मुलांची सुटका करून त्यांचे पुनर्वसन केले आहे.

सविस्तर वाचा..

13:10 (IST) 13 Oct 2023
नागपुरातील अल्पसंख्याक विद्यार्थिनींच्या वसतिगृहाचा निधी परत जाणार? नागपूर विद्यापीठ आणि ‘एलआयटी’च्या वादाचा फटका

मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारसी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात २०० प्रवेश क्षमतेचे वसतिगृह बांधण्यास शासनाने काही वर्षांपूर्वी मंजुरी दिली.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 13 Oct 2023
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये दीर व भावजयेत सुप्त संघर्ष

पिंपरी : साधनसुचिता, पक्ष संघटनेचा नारा देणाऱ्या पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये मोठी गटबाजी उफाळली आहे. आमदार आणि पक्ष संघटना एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे दिसते. हा सुप्त संघर्ष असून, निवडणुका जवळ येताच संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे.

वाचा सविस्तर…

13:09 (IST) 13 Oct 2023
नागपूर काँग्रेसमधील गटबाजी कधी संपणार? बैठकीतील गोंधळामुळे कार्यकर्ते संतप्त

नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये गेल्या दहा वर्षांत काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली. पण विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ, जिल्हा परिषदेतील विजयांमुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या असताना पक्षाचे नागपुरातील नेते अजूनही गटबाजीतून बाहेर पडताना दिसत नाही.

वाचा सविस्तर…

13:09 (IST) 13 Oct 2023
ठाणे पोलीस दलात मोठे फेरबदल; सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठाणे: ठाणे पोलीस दलात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये नौपाडा, शिळडायघर, चितळसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा सामावेश आहे.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 13 Oct 2023
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदावर पार्थ पवार यावेत ही सर्वाची इच्छा: अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात निवड होण्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात सुरुवात झाली.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 13 Oct 2023
पुण्यातील ३४ समाविष्ट गावांतील सांडपाणी वाहिन्यांचे काम निकृष्ट? आता होणार पोलखोल

पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील सांडपाणी वाहिन्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या आरोपानंतर शासकीय अभियांत्रिकी विद्यापीठामार्फत या कामांची तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावातील सांडपाणी वाहिन्यांच्या कामाची पोलखोल होण्याची शक्यता आहे.

वाचा सविस्तर…

12:56 (IST) 13 Oct 2023
“मंगळवारपर्यंत योग्य वेळापत्रक द्या”, सरन्यायाधीशांनी टोचले नार्वेकरांचे कान

आमदार अपात्रतेप्रकरणी योग्य वेळापत्रक ठरवले गेले नाही तर आम्ही आदेश देणार. मंगळवारपर्यंत हे वेळापत्रक तयार करून सादर करा – CJI

सविस्तर वाचा

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Mumbai News Live in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा