Maharashtra Breaking News Today, 13 October 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातील याचिकेवर आज, १३ ऑक्टोबरला एकत्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर १० ऑक्टोबर सुनावणी पार पडली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं १३ ऑक्टोबरला सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे राज्यात टोल दरवाढीवरून वातावरण तापलं आहे. दरम्यान, ठाण्यातून मुंबईत येणाऱ्या लहान वाहनांना टोलमाफी करण्याच्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करत असून यासंदर्भातील चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) दादा भुसे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज होणार आहे. त्यामुळे आज निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील, देशातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
Mumbai News in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
सुप्रिया सुळे म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा नागपुरातील गुन्हेगारी वाढते. पण त्यांनी अर्धसत्यच सांगितलं. देवेंद्र फडणीस गृहमंत्री होतात तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारी वाढते. सरळसरळ गुंडांना पाठिशी घातलं जातं. विरोधकांना त्रास दिला जातो. हे फक्त देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हाच होतं. नाशिकचं नागपूर होऊ देणार नाही. कारण या नाशिक शहारवर शिवसेनेचं प्रेम आहे – संजय राऊत
इंडिया फॉर इंदिरा आणि इंदिरा फॉर इंडिया या विचाराच्या बाहेर ते पडत नाहीत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.
गावातच मिळणारा रोजगार, १५ हजार रुपये मानधन आणि भविष्यात चतुर्थश्रेणी पदाच्या पदोन्नतीची संधी हे खोऱ्याने दाखल होणाऱ्या अर्जांचे कारण आहे.
नाशिकमध्ये शाळा, कॉलेज, अनेक शैक्षणिक संस्थांना ड्रग्सचा विळखा पडला आहे. विविध मार्गांनी विद्यार्थी आणि विद्यार्थींना ड्रग्सचा पुरवठा केला जातोय. गेल्या सहा महिन्यांत २० ते ३५ वयोगटातील १०० च्या आसपास विद्यार्थी आणि तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील ७५ टक्के पोस्टमार्टममधून सि्दध झालंय की तरुण अंमली पदार्थाच्या आहारी गेले होते – संजय राऊत
आंतरराष्ट्रीय बुकी सोंटू ऊर्फ अनंत जैनचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यामुळे आता शनिवारी तो नागपूर गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण करणार आहे.
दिवाळी, दसरा, छट पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार आहेत.
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागांतून पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही कोकण आणि गोव्यालगत असणाऱ्या काही भागांमध्ये मात्र तो पुन्हा एकदा बरसणार आहे.
पोलीस दलातील अधिकाऱ्यांची वाणवा बघता पोलीस महासंचालक कार्यालयातून पदोन्नतीची प्रक्रिया सुरु केली आहे. येत्या दिवाळीत पोलीस अधिकाऱ्यांनी पदोन्नतीचे ‘गिफ्ट’ मिळणार आहे.
तांत्रिक बिघाडामुळे महाऔष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगावॉटचा संच क्रमांक ५ पुन्हा एकदा बंद पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा संच सातत्याने बंद पडत आहे.
उपस्थितांनी सिमेंटच्या पिल्लरमधील सळी कापत त्याला सळी डोक्यातून आरपार असलेल्या स्थितीत नागपुरातील कल्पवृक्ष रुग्णालयात हलवले.
ठाणे-मुंबई दरम्यान असलेल्या टोलनाक्यांवर पुढील १५ दिवस चित्रीकरण करून व ठाणे परिवहन कार्यालयात नोंदणी झालेली किती वाहने दररोज ये-जा करतात याची आकडेवारी सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळाला दिले आहेत. त्यानुसार, सरकारचे कॅमेरे टोलनाक्यांवर लागणार आहेत. तसंच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
तून मुंबईत येणाऱ्या लहान वाहनांना टोलमाफी करण्याच्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचार करत असून यासंदर्भातील चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) दादा भुसे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची बैठक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज होणार आहे. त्यासाठी दादा भुसे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह
Mumbai News Live in Marathi : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा