वर्धा : दिवाळी, दसरा, छट पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या खालीलप्रमाणे आहेत.

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (२० फेऱ्या)

kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा

गाडी क्र. ०२१३९ सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १९.१०.२०२३ ते २०.११.२०२३ या कालावधीत सोमवार आणि गुरुवारी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

गाडी क्र. ०२१४० सुपरफास्ट स्पेशल दि. २१.१०.२०२३ ते २१.११.२०२३ या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे- दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

संरचना- १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन.

हेही वाचा : उपनिबंधक वैशाली मिटकरी यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना अटक

२) नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१० फेऱ्या)

गाडी क्र. ०२१४४ सुपरफास्ट स्पेशल दि. १९.१०.२०२३ ते १६.११.२०२३ या कालावधीत प्रत्येक गुरुवारी १९.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

गाडी क्र. ०२१४३ सुपरफास्ट स्पेशल दि. २०.१०.२०२३ ते १७.११.२०२३ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

थांबे- वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी.

संरचना- १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन.

आरक्षण वरील विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १४/१०/२०२३ रोजी सर्व प्रवासी आरक्षण केंद्र स्थानांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.