Mumbai News Update : बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिन आहे. परंतु, गेल्यावर्षी २१ जून २०२२ रोजी शिवसेनेत बंडखोरी झाल्याने शिवसेनेचे दोन गट पडले. निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि पक्षनाव शिंदे गटाला दिले असले तरीही ठाकरे गटाने शिवसेनेवरील दावा सोडलेला नाही. त्यामुळे आज पहिल्यांदाच शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसेनेच्या दोन गटाकडून साजरा करण्यात येत आहे. ठाकरे गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. तर, शिंदे गटाचा वर्धापन दिन कार्यक्रम मुंबईतील नेस्को सेंटर येथे होणार आहे. दोन्ही गटांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यानिमित्ताने मुंबईत येणार आहेत. ठाकरे गटाच्या काल (१८ जून) झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे आज सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Mumbai Maharashtra News Update राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला धक्का दिला. विधानसभेतील ४० आमदार फुटले असले तरी विधान परिषदेत ठाकरे गटाच फूट पाडण्यात शिंदे यांना यश येत नव्हते. अखेर ठाकरे गटाचा दुसरा आमदार फोडण्यात शिंदे गटाला यश मिळाले.
जळगाव: शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण काँक्रिटीकरण सुरू असताना आता विद्रुपीकरणही होत आहे. नळजोडणी आणि बिघाड दुरुस्तीसाठी रस्ते खोदले जात आहेत.
राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. यात जिल्हा परिषदेतील रिक्त जागांचाही समावेश आहे. मात्र, भरती कधी होणार हा मोठा प्रश्न असला तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २०२३ मध्ये पदभरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
पिंपरी: शहरातील इमारतींच्या टेरेसवर असलेल्या ५२ ‘रूफ टॉप’ हॉटेलचालकांवर कारवाईचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिला आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने संबंधितांना नोटीस पाठविल्या आहेत.
पुणे: पुणे रेल्वे स्थानकातील ब्रिटिशकालीन पादचारी पूल पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खुला झाला आहे. करोना संकटानंतर २०२० मध्ये बंद करण्यात आलेला हा पूल दुरूस्ती व इतर सुधारणा करून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. हा पूल सर्व फलाटांना जोडणारा असल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
महाविकास आघाडीच्या काळात वनमंत्री असताना तरुणीच्या आत्महत्येमुळे वादग्रस्त ठरलेले संजय राठोड आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सुद्धा त्यांच्या अन्न व औषध प्रशासन खात्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या मंत्रीपदाचा एक वर्षाचा जमाखर्च लक्षात घेता वाद अधिक आणि कामे कमी अशीच स्थिती आहे.
रविवारी उत्तर नागपुरातील कार्यकर्ता स्नेहमिलन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गडकरी यांना उत्तर नागपुरातून या राखीव मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे त्यांच्या भाषणावरून स्पष्ट होते.
हवामानातील बदलांचा वेग गेल्या काही वर्षात वाढला असला तरीही यावर्षी हे बदल अधिक तीव्र झाले आहेत. भर उन्हाळ्यात वादळीवारे आणि गारपिटीसह झालेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर मान्सूनची वेळ असताना तापलेले उन्ह, यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. लवकर येणार म्हणत असतानाच मान्सूनचे आगमन भारतात उशीरा झाले आणि महाराष्ट्राची वेस ओलांडलेला मान्सून या वेशीवरच अडकला आहे.
चंद्रपूर : कन्हाळगाव अभयारण्यात रविवारी एक अस्वल मृतावस्थेत आढळून आली. या अस्वलीचा मृत्यू नेसर्गिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
आईपासून दूरावलेला बिबट्याचा बेवारस बछडा वर्ध्यातील करुणाश्रमात आला तेव्हा डोळ्याने बघू शकत नव्हता. ‘ॲन्ट्रोप्रीऑन ऑफ आईज’ या आजाराने त्याला ग्रासले होते. तब्बल तीन महिन्याच्या अथक उपचारानंतर यश आले आणि आता हा ‘जग्गू’ बिबट स्वत:च्या डोळ्यांनी जग बघतोय. वर्धा येथील करुणाश्रमात दीड वर्षांपासून दाखल झालेला जग्गू आता १७ महिन्यांचा झालाय.
एमएचसीईटी परीक्षेचा निकाल बारा जून रोजी जाहीर झाला. परंतु अद्याप प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले नाही. त्यामुळे अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्ट,कृषी व अन्य अभ्यासक्रमाचे प्रवेश खोळंबले आहे. परिणामी या व्यावसायिक शाखेसाठी इच्छूक विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमात प्रवेश घेवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे.
मध्य रेल्वेवरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून अनेक उपाययोजना, मोहिमा राबविल्या जातात. यामधील मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाद्वारे ‘माय लेफ्ट इज माय राइट..’ ही मोहीम सुरू केली. मात्र या मोहिमेचा विसर मध्य रेल्वेला झाल्याचे दिसून येत आहे.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परिसरातून सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी बेपत्ता झाले होते. या मुलांचे एका चारचाकी वाहनात मृतदेह सापडले आहेत. एकाच वेळी तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर: मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे सोमवारी निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांची अभिनयाची कारकीर्द नाटकातून सुरू झाली. देश बंधू संगीत मंडळी च्या नाटकात त्यांनी अभिनय साकारला होता.
पुणे: वारजे माळवाडी भागातील जयभवानी चौक परिसरात सराइतावर भरदिवसा गोळीबार करून पसार झालेल्या तीन जणांना पोलिसांनी पकडले. गोळीबार करणारे तिघे जण अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून दोन पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत.
मुंबई: गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न २२ वर्षे प्रलंबित असून तो मार्गी लावण्यासाठी, पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी, २५ जून रोजी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट् न्यूज लाइव्ह
Mumbai Maharashtra News Live Update राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा