Maharashtra News Highlights: २ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या निमित्ताने एकीकडे सणासुदीचं वातावरण असताना दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर तर शिंदे गटाचा मेळावा नेस्को सेंटरला होणार आहे. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्याचीही चर्चा आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये या मेळाव्यांवरून जुंपली असून मेळाव्यासाठी होणाऱ्या खर्चाच्या आकडेवाऱ्या दोन्ही बाजूंनी दिल्या जात आहेत.
Marathi News Live Update: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा…
पिंपरी-चिंचवडमध्ये एक लाख देशी वृक्षांची लागवड; कोणत्या वृक्षांची लागवड?
ट्रक चालकाच्या अपहरण प्रकरणी मनोरमा खेडकर यांना तात्पुरता दिलासा, वडील दिलीप खेडकर अद्याप फरार
Sanjay Raut on Dassuhra Melawa – संजय राऊत यांचं राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत सूचक भाष्य
उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या राजकीय युतीची घोषणा कधी होईल, त्याचं उत्तर एकच आहे तो दिवस मराठी राजकारणातला साडेचारावा मुहूर्त असेल. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणातून यासंदर्भात कळू शकेल – संजय राऊत, शिवसेना खासदार
सीबीआय अधिकाऱ्यांना धक्काबुक्की,उद्योजक मनोज जयस्वालवर गुन्हा दाखल
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अखंड ज्योत यात्रा, ज्योत मशाल होवू देवू नका, असा ईशारा
माजी गृहमंत्री देशमुख हल्ला बनावट, ग्रामीण पोलिसांचा न्यायालयात अहवाल
शिक्षकांचा त्रागा! पात्रता परीक्षा नकोच म्हणून तामिळनाडूचे सूत्र लावा म्हणतात, आज तोडगा ?
माजी गृहमंत्री देशमुख फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार, सरकारवर गंभीर आरोप
Gopichand Padalkar on Jayant Patil: सांगलीतील सभेवरून गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका
माझं त्या जयंत्याला आव्हान आहे. माझे हात-पाय तोडायची भाषा तुम्ही सांगलीत केली. ते वळव्याचं कुत्रं म्हणत होतं की त्याला पोरं शोधायला चाललेत. त्यांना मी आव्हान करतोय की तुम्ही जर जातिवंत पाटील असाल, तर उद्या दुपारी पत्रकार परिषद घेऊन मला वेळ द्यायची, वेळ, वार, ठिकाण सांगा. तुम्ही सांगणार तिथे मी येतो – गोपीचंद पडळकर, भाजपा आमदार
Gopichand Padalkar on Jayant Patil: सांगलीतील सभेवरून गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका
सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा होती. पण त्यात मला ते आई-बहिणीवरून शिव्या देत होते. तिथे मला ते गोप्या-गोप्या म्हणत होते. पण मग मी तुला जंत्या म्हटलं तर चालेल का? – गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar on Jayant Patil: गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली
तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता? जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना – गोपीचंद पडळकरांचं जाहीर सभेत जयंत पाटलांविषयी आक्षेपार्ह विधान
मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि मागे घेत नाही. मी अवलादीचं विधान केलं होतं. पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी दत्तक वगैरेही घ्यायचे ना मुलांना. मला वाटलं तसं काही झालंय का. गावाकडे माणसं सहज म्हणतात तुला कुणी काढलाय? – गोपीचंद पडळकर, भाजपा आमदार
इथे वाचा नेमकं काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर जयंत पाटील यांना…
बीड जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शाळा आणि पोलीस ठाण्यातही पुराचे पाणी (संग्रहीत छायाचित्र)
Marathi News Live Update: मराठवाड्यातील पूरस्थितीसंदर्भातील सर्व महत्त्वाच्या बातम्या.