Maharashtra News Highlights: मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या. त्याचा जीआरदेखील काढला. शिवाय उर्वरीत दोन मागण्यांबाबत येत्या एक ते दोन महिन्यांत निर्णय घेण्याचंही आश्वासन दिलं. मात्र, यामुळे ओबीसी समाज नाराज झाल्याचं चित्र निर्माण झालं असून ओबीसी नेत्यांनी या जीआरविरोधात कोर्टात जाण्याची तयारी चालू केली आहे.

Live Updates

Maharashtra Latest News Today, 05 September 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

15:35 (IST) 5 Sep 2025

खासगी ट्युशन क्लासेसबाबत केंद्र शासनाकडून महत्वाची माहिती; आता अकरावी, बारावीचे विद्यार्थी….

भारतात खासगी ट्युशन क्लासेसचे चलन मागील काही दशकांत वेगाने वाढले असून आज ते शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनले आहे. …सविस्तर वाचा
15:15 (IST) 5 Sep 2025

आमदार ठाकरे, वंजारी यांच्याकडून जश्ने ईद मिलादुन्नबी मिवरणुकीचे स्वागत

मिरवणुकीची सुरुवात ‘परचम कुशाई’ या पारंपरिक विधीने झाली. नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांनी मिरवणुकीचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. …अधिक वाचा
15:04 (IST) 5 Sep 2025

स्मार्ट प्रीपेड मीटरबाबत मोठी बातमी… केंद्र व राज्याच्या दाव्यात विसंगती.. ग्राहक संघटना म्हणते…

राज्यात विजवितरण कार्यक्षम व पारदर्शक करण्याच्या नावावर शासनाने विजेचे स्मार्ट मीटर बसविण्याची योजना राबवणे सुरू केले आहे. …सविस्तर वाचा
14:54 (IST) 5 Sep 2025

वाहतूक प्रकल्पांना मिळणार गती; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे एमएमआरडीए प्रशासनाला सूचना

वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना खासदारांनी प्रशासनाला दिल्या. …सविस्तर बातमी
14:48 (IST) 5 Sep 2025

दारुगोळा कारखान्याने अडवला वाघांचा रस्ता; अधिवासही हिरावला…

कळमेश्वर मार्गावरील खैरी-निमजीच्या जंगलालगत असलेल्या ‘सोलार एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी’ने दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारला वनखात्याची ८८ हेक्टर जमिनीची मागणी केली होती. …सविस्तर बातमी
14:46 (IST) 5 Sep 2025

‘ब्लड मून, रेड मून’ पाहायची करा तयारी; भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण

रात्री ९.२७ मिनिटांनी खंडग्रास ग्रहणाला सुरवात होऊन १२.२२ वाजेपर्यंत ते पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपने ह्यांनी दिली आहे. …अधिक वाचा
14:42 (IST) 5 Sep 2025

सोन्याचा पुन्हा उच्चांक… जळगावमध्ये आता ‘इतका’ दर

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोने दरात दिवसागणिक वाढ होत आहे. शुक्रवारी देखील सोन्याने गुरूवारचा उच्चांक मोडीत काढून पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. …वाचा सविस्तर
14:35 (IST) 5 Sep 2025

महायुती-महाविकास आघाडीत फोडाफोडीचे राजकारण!

निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. …वाचा सविस्तर
14:33 (IST) 5 Sep 2025

देह व्यापाराच्या अंधाऱ्या गल्लींना शिक्षणाने दिला उजेड

या वस्तीतील महिलांची संख्या पूर्वी साधारण १००० ते १५०० होती. मात्र मुलांच्या भविष्याबाबत सतत समुपदेशन, मार्गदर्शन आणि आधार मिळाल्याने आज ती संख्या घटून २०० ते २५० इतकी राहिली आहे. …वाचा सविस्तर
14:18 (IST) 5 Sep 2025

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! …तर शिक्षकांनी राजीनामा द्यावा लागणार

सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. …सविस्तर वाचा
14:16 (IST) 5 Sep 2025

आश्चर्य! भरपावसाळ्यात विहिरीला येते गरम पाणी, गडचिरोलीतील ‘या’ गावात…

सत्यांना मलय्या कटकु (रा. ताटीगुडम) हे शेती करतात. घराजवळच त्यांनी विहीर खोदलेली आहे. …वाचा सविस्तर
14:01 (IST) 5 Sep 2025

नक्षल चळवळीत मोठा फेरबदल, दंडकारण्याची जबाबदारी माडवी हिडमाकडे…

दक्षिण बस्तर भागातल्या सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावातील रहिवासी असलेला माडवी हिडमाने १९९६-९७ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी नक्षल चळवळीत प्रवेश केला. …सविस्तर बातमी
13:48 (IST) 5 Sep 2025

वर्ध्यात भव्य व्यापारी संकुल, मेट्रो साकारणारा अधिकारी देणार संकुलास आकार…

एक चांगला सुशोभीत बाजार याठिकाणी साकार व्हायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत असते. त्या भावनेची नोंद घेत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर यांनी खास बैठकच आज बाजार समिती कार्यालयात घेतली. …अधिक वाचा
13:44 (IST) 5 Sep 2025

‘एअरपोर्ट फनेल’बाधित परिसरासाठी समूह पुनर्विकासाचा लाभ? सहा हजारहून अधिक इमारतींचा पुनर्विकास ठप्प

विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला तसेच वाकोला, धारावी आदी परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’बाधित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पहिल्यांदा नोव्हेंबर २०१६ मध्ये उपस्थित करण्यात आला. …वाचा सविस्तर
13:25 (IST) 5 Sep 2025

कोकणनगर गोविंदा पथकाच्या १० थरांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात गुरुवार, ४ सप्टेंबर रोजी कोकणनगर गोविंदा पथकाकडे १० थरांच्या विश्वविक्रमासाठीचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. …सविस्तर वाचा
13:24 (IST) 5 Sep 2025

Laxman Hake OBC Morcha: बारामतीमध्ये ओबीसींचा मोर्चा

लक्ष्मण हाकेंनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या नवीन जीआरविरोधात भूमिका मांडली आहे. आपल्या मागण्यांसाठी ओबीसी समाजातर्फे बारामतीमध्ये मोर्चाकाढण्यात आला असून आता गणेश विसर्जनानंतर ओबीसींची संघर्षयात्रा काढण्याचा निर्धात लक्ष्मण हाकेंनी माध्यमांना बोलून दाखवला.

12:48 (IST) 5 Sep 2025

“मोक्का”तून नाव वगळण्यासाठी वाल्मीक कराडची खंडपीठात धाव; शासनास नोटीस

याप्रकरणी खंडपीठाचे न्या. संदिपकुमार सी. मोरे आणि न्या. मेहरोझ के. पठाण यांनी गुरुवारी शासनास नोटीस बजावण्याचा आदेश दिला. …वाचा सविस्तर
12:46 (IST) 5 Sep 2025

ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी ब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल

प्रवाशांना कर्जतपर्यंत प्रवास करता येईल. तर, खोपोली – सीएसएमटी लोकल प्रवास रद्द राहणार आहे. मध्य रेल्वे प्रशासन सणासुदीच्या दिवशी ब्लाॅक घेत असल्याने प्रवाशांनी मध्य रेल्वे विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. …अधिक वाचा
12:40 (IST) 5 Sep 2025

नांदेड: ‘सन्मान कष्टाचा,आनंद उद्याचा’; पण ‘सुळसुळाट दलालांचा’! बांधकाम कामगारांच्या योजनांमधील चित्र, गुन्हा दाखल

महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये बोगस लाभार्थी आणि दलालांचा शिरकाव झाला असून त्यामुळे वरील घोषवाक्यात ‘सुळसुळाट दलालांचा’ या आणखी एका ओळीची भर पडली आहे. …सविस्तर बातमी
12:40 (IST) 5 Sep 2025

उल्हासनगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर; २०१७ प्रमाणेच प्रभाग, ७८ सदस्यसंख्या, २०२२च्या तुलनेत प्रभाग घटले

उल्हासनगर महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना बुधवारी जाहीर करण्यात आली.यंदाच्या प्रारूप प्रभाग रचनेत २०१७ प्रमाणेच २० प्रभाग असून ७८ सदस्यसंख्या आहे. …वाचा सविस्तर
12:31 (IST) 5 Sep 2025

टायगर मेमनच्या नातेवाईकांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही

याचिकाकर्ते घरांचा नोंदणीकृत विक्री करार अस्तित्वात नसल्याने वैध मालकी, खरेदीदार असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत. …सविस्तर बातमी
12:17 (IST) 5 Sep 2025

विदर्भातील ओबीसी नेते भाजपच्या केंद्रस्थानी; राजकारण की समाजकारण?

जरांगेंनी आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करणार ही घोषणा केल्यावर भाजपने जरांगेंच्या मुंबई आंदोलनापूर्वीच ओबीसींना चुचकारणे सुरू केले होते. …सविस्तर बातमी
11:51 (IST) 5 Sep 2025

रेल्वेत चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे गजाआड…१६ गुन्ह्यांची उकल, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष म्हणजे मागील ७ वर्षांपासून ही टोळी सक्रीय असून पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागली आहे. …सविस्तर वाचा
11:48 (IST) 5 Sep 2025

शेवा कोळीवाडा पुनर्वसन रखडणार; जेएनपीए विस्थापितांना जमीन देण्यास केंद्राचा नकार

जेएनपीए बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या शेवा कोळीवाडा ग्रामस्थांचा भूखंडाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळत भूखंड देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोळीवाडा विस्थापितांचे पुनर्वसन रखडणार आहे. …सविस्तर वाचा
11:46 (IST) 5 Sep 2025

पुरंदर विमानतळाच्या ‘लॉजिस्टिक पार्क’ च्या क्षेत्रात घट; किती एकरात होणार लॉजिस्टिक पार्क ?

land acquisition challenges for Purandar airport : विमानतळाच्या जागेचे क्षेत्र कमी झाल्याने आता सुमारे ३०० ते ४०० एकर क्षेत्रात पार्क उभारणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. …सविस्तर वाचा
11:44 (IST) 5 Sep 2025

Dagdusheth Halwai Ganpati : श्री गणनायक रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

यंदा श्री गणनायक रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. …अधिक वाचा
11:41 (IST) 5 Sep 2025

Bombay High Court : सनातन संस्था आणि हमीद दाभोलकरांबाबत उच्च न्यायालयाचा।महत्त्वाचा निर्णय

Bombay High Court news in marathi :उच्च न्यायालयाने उजव्या विचारसरणीच्या संस्थेने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले मानहानीचे खटले गोव्यातील न्यायालयातून महाराष्ट्रात वर्ग करण्यास परवानगी दिली. …सविस्तर वाचा
11:40 (IST) 5 Sep 2025

उल्हासनगरात पर्यावरण कार्यकर्ती सरिता खानचंदानी यांनी केलेली आत्महत्या; पतीकडून पाच जणांविरुद्ध तक्रार

पर्यावरण संरक्षण, ध्वनी प्रदूषणविरोधी लढा देणाऱ्या हिराली फाउंडेशनच्या प्रमुख आणि वकील सरिता खानचंदानी (५१) यांनी २८ ऑगस्ट रोजी उल्हासनगर ४ येथील रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. …सविस्तर वाचा
11:34 (IST) 5 Sep 2025

TEACHERS DAY : सेवानिवृत्त शिक्षकांची फरफट सुरूच; प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका, वेतननिश्चितीतील त्रुटींमुळे लाखोंचे नुकसान

अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्तीनंतर त्यांचे वेतन कमी झाले असून, गेल्या चार-पाच महिन्यांपासून त्यांना पेन्शनही मिळालेली नाही. …अधिक वाचा
11:14 (IST) 5 Sep 2025

विसर्जन मिरवणुकांसाठी आज रात्रीपासूनच बंदोबस्त

अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. …सविस्तर बातमी

मराठ्यांमध्ये संभ्रम, ओबीसींमध्ये खदखद; मनोज जरांगे यांची फसवणूक झाल्याची भावना (File Photo)

Maharashtra Latest News Today, 05 September 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी