Maharashtra Politics Updates, 14 August 2025 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला कत्तलखाने व मांसविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयावर देखील आक्षेप घेतले जात आहेत, यादरम्यान माझ्या सरकारने घेतलेला नाही. यासंदर्भात महापालिकांना अधिकार देण्याचा निर्णय आधीच्या सरकारच्या काळात म्हणजे १९८८ मध्ये घेण्यात आला होता, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. कोणी काय खावे, हे ठरविण्यात राज्य सरकारला रस नाही. आम्हाला लक्ष देण्यासाठी दुसरे अनेक विषय आहेत असेही फडणवीस म्हणाले आहेत. याबरोबरच संपूर्ण राज्यात बुधवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला, शुक्रवारपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Live Updates

Mumbai Breaking News : महाराष्ट्रातील सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर

14:25 (IST) 14 Aug 2025

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सदनिकांचे उदघाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरळी, मुंबई येथे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकांचे उदघाटन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सदनिकांची पाहणी केली.


14:22 (IST) 14 Aug 2025

भाजपा नांदेड उत्तर जिल्ह्याची कार्यकारिणी; चव्हाणांच्या चरणी !

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख यांनी या भागातल्या जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून चव्हाण समर्थकांना प्राधान्य दिल्याचे सांगितले जात आहे. …वाचा सविस्तर
14:17 (IST) 14 Aug 2025

यंदा १० थरांचा थरार ?

जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाच्या नावावर सर्वाधिक उंच थर रचण्याचा विक्रम आहे. यंदा १० थर उभारून विक्रम नोंदविण्याचा प्रयत्न काही गोविंदा पथकांकडून होण्याची शक्यता आहे. …अधिक वाचा
14:04 (IST) 14 Aug 2025

अखेर वाहतूक धोरण अंमलबजावणीला सुरवात ! वाहतूक समस्या नियंत्रणासाठी प्रयत्न

वाहतूक धोरण निश्चित करून दीड ते दोन वर्षे उलटून गेल्यानंतर अखेर वसई विरार शहरात वाहतूक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. वाहतूक विभागाने पार्किंग व नोपार्किंग सूचना फलक लावणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. …वाचा सविस्तर
14:03 (IST) 14 Aug 2025

नाशिक : माणिक कोकाटे आता शेताच्या बांधावरुन खो-खो…

आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आवर्जून वेळ काढून क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांनी नाशिक येथील खो- खो प्रबोधिनीच्या खेळाडूंशी हितगुज केले. …वाचा सविस्तर
13:28 (IST) 14 Aug 2025

सांगलीचा काँग्रेसचा गड भाजपकडून उद्ध्वस्त

सांगलीतील कृष्णामाईच्या काठी काँग्रेस रूजली, वाजली आणि गाजलीही त्याच सांगलीत आता काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. …सविस्तर बातमी
13:25 (IST) 14 Aug 2025

कराड : बनावट दाखल्याने जात प्रमाणपत्र मिळवले…

शाळा सोडल्याचा बनावट दाखला सादर करून ‘लमानी (विमुक्त जाती संवर्ग)’ या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळविल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. …सविस्तर बातमी
13:13 (IST) 14 Aug 2025

प्रवाशांनो, सलग सुट्ट्यांमुळे ॲप आधारित टॅक्सी मिळणे अवघड; वाहतूक कोंडीचा चालक, प्रवाशांना फटका

मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिक ॲप आधारित टॅक्सीकडे वळू लागले आहेत. परंतु, सलग सुट्ट्यांमुळे ही सेवा मिळणे कठीण झाले असून प्रवाशांचा खोळंबा होत आहे. …वाचा सविस्तर
13:13 (IST) 14 Aug 2025

प्रवाशांनो, सलग सुट्ट्यांमुळे ॲप आधारित टॅक्सी मिळणे अवघड; वाहतूक कोंडीचा चालक, प्रवाशांना फटका

मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील नागरिक ॲप आधारित टॅक्सीकडे वळू लागले आहेत. परंतु, सलग सुट्ट्यांमुळे ही सेवा मिळणे कठीण झाले असून प्रवाशांचा खोळंबा होत आहे. …वाचा सविस्तर
13:06 (IST) 14 Aug 2025

डॉ. गफ्फार कादरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात

विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर आरोप करणारे डॉ. गफ्फार कादरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. …वाचा सविस्तर
12:57 (IST) 14 Aug 2025

सिंधुदुर्ग:​ स्वातंत्र्यदिनी महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे ६० ते ७० आंदोलने; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली दखल

महसूल यंत्रणा स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. …अधिक वाचा
12:51 (IST) 14 Aug 2025

ड्रग्जचा विळखा! अमरावती शहरात आठ महिन्यांत…

काल-परवा गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील रॅलिज प्लॉट परिसरातील एका घराच्या छतावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून दहा जणांना अटक केली आणि एमडी (मेफेड्रॉन), गांजा आणि विदेशी मद्य जप्त केले. …सविस्तर वाचा
12:27 (IST) 14 Aug 2025

वाद कबुतरखान्याचा, विषय पारव्यांचा ; कौतुक कबुतरांचे, पण लाभार्थी पारवेच

शहरात सध्या कबुतरखान्यांवरून वाद सुरू आहे. कबुतरखान्यांमध्ये दिसणारे पक्षी कबुतर नसून पारवे आहेत, अशी माहिती पक्षीनिरीक्षकांनी व्यक्त केले आहे. …अधिक वाचा
12:27 (IST) 14 Aug 2025

जळगावात काँग्रेसला पुन्हा धक्का… प्रतिभा शिंदे यांच्यानंतर ‘या’ पदाधिकार्‍याचा राजीनामा

गेल्या ४५ वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या त्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने काँग्रेससाठी तो आणखी मोठा दुसरा धक्का मानला जात आहे. …अधिक वाचा
12:25 (IST) 14 Aug 2025

भारतात दंत आरोग्याच संकट वाढत आहे! लहान मुलांच्या दातांच्या समस्यात वाढ…

भारतात दातांच्या आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले असून लहान मुलांचे दंत आरोग्य ही एक गंभीर समस्या बनताना दिसत आहे. …सविस्तर वाचा
12:18 (IST) 14 Aug 2025

खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या अडीच हजार रिक्षा चालकांचे कल्याणमध्ये सोमवारी चक्काजाम आंदोलन, डोंबिवलीतही रिक्षा चालकांची आंदोलनाची तयारी

सुमारे दोन हजार पाचशे रिक्षा चालकांनी सोमवारी (ता. १८) कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक भागातील मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक येथे सकाळी साडे अकरा वाजता चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. …अधिक वाचा
12:02 (IST) 14 Aug 2025

सानपाड्यात खड्ड्यांचे विघ्न; अंतर्गत रस्त्यांची चाळण, प्रशासनाबाबत तीव्र नाराजी

विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस बाकी असताना सानपाड्यातील नागरिक मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विघ्नाला सामोरे जात आहेत. …सविस्तर वाचा
12:01 (IST) 14 Aug 2025

बदलापूरात रेल्वे प्रवाशांचा पुन्हा संताप, स्थानक व्यवस्थापकांना घेराव, सातत्याने लोकल उशिराने, उद्घोषणे अभावी सावळा गोंधळ

गुरूवारी स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयात लेखी उत्तर देण्याची मागणी केली. त्यावरून बराच काळ फलाट क्रमांक तीनवर गोंधळ सुरू होता …सविस्तर बातमी
11:18 (IST) 14 Aug 2025

Gadkari Rangayatan : ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या लोकार्पण स्वातंत्र्यदिनी.., यानिमित्ताने ”फोकलोक” चे आयोजन

ऑक्टोबर २०२४ मध्य़े नुतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम सुरू करताना आणि कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रंगभूमीवर कार्यरत असलेले कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांच्याशी महापालिकेने सविस्तर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणीही केली होती. …अधिक वाचा
10:38 (IST) 14 Aug 2025
“अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी…”; सूरज चव्हाणांच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची पोस्ट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सूरज चव्हाण यांना नवीन पदावर नियुक्ती देण्यात आल्यानंतर रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे. छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. रोहित पवार यांनी ही नियुक्ती अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी असल्याची शंका व्यक्त केली आहे.

“लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरीप्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं? अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो. ‘शब्दाला पक्का’ या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली अशी चर्चा आहे. मारहाण करताना फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टरचा पट्टा निघण्याच्या आतच प्रमोशन केलं, नियुक्ती करणाऱ्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. शेवटी, ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’!” असे रोहित पवार म्हणाले आहेत.