Latest Marathi News Updates : औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलेले आहे. १७ मार्चच्या रात्री नागपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद काल (१८ मार्च) रोजी दिवसभर उमटले. या विषयावर विधानसभा आणि विधान परिषेद घमासान चर्चा झाली. या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चोख उत्तरेही दिली. तरीही विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra News Live Today, 19 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
राजू शेट्टी दोन खटल्यात निर्दोष मुक्त
वारणा कारखाना परिसरातील आंदोलन तसेच लोकसभा निवडणुकीवेळी केलेले वादग्रस्त विधान अशा दोन खटल्यांत वडगांव दिवाणी व फौजदारी न्यायालयाने माजी खासदार राजू शेट्टी व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सविस्तर वाचा…
नागपूर राडाप्रकरणी फहीम शमीम खान हा मास्टरमाईंड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मायनोरीटीस डेमोक्रेटिक पक्षाचा तो शहर अध्यक्ष आहे. एफआयआरमध्ये फहीम शमीम खानचं नाव होतं, असं वकील आसिफ कुरेशी यांनी टीव्ही ९ ला सांगितलं. तसंच, फहीम खानला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
ॲस्टर रुग्णालयाचा बालकल्याण संकुलास मदतीचा ‘आधार’
कोल्हापूर : येथील ॲस्टर आधार रुग्णालयाने बालकल्याण संकुलास ३ लाख ७० हजारांची, तर याच रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले यांनी १ लाख ३० हजारांची व्यक्तिगत मदत केली. या दोन्ही रकमेचे स्वतंत्र धनादेश बालकल्याणचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी दरवर्षी संस्थेला पाच लाखांची मदत करणारे सल्लागार डॉ. दामले, रुग्णालयाचे वैद्यकीय सेवाप्रमुख डॉ. अजय केणी, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. दलोन फर्नांडिस, वित्त अधिकारी रेश्मा माने, संकुलाचे उपाध्यक्ष व्ही. बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मजा तिवले उपस्थित होते.
असाही आधार
बालकल्याण संकुलास एकाच छताखाली अत्याधुनिक उपचार करून आरोग्यसेवेत कोल्हापूरचा वेगळा ठसा उमटवलेल्या प्रेरणा रुग्णालयाच्या ‘ॲस्टर आधार’ मध्ये संकुलातील बालकांच्या आजारपणात मोफत उपचार, औषधे उपलब्ध करून दिली जातात. संस्थेत येऊन मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. तेथील सर्व डॉक्टर व्यक्तिगत पातळीवर वर्षातून एकदा दोन ते अडीच लाखांची मदत संस्थेला करतात. त्यातून संस्थेतील मुलांचे भवितव्य चांगले घडत आहे.
कोल्हापुरात जैववैद्यकीय कचरा उघड्यावर; रुग्णालयास नोटीस
कोल्हापूर : येथील क्रांतिसिंह नाना पाटीलनगर भागातील ‘सीटी डेन्टल अँड एम्पलिमेंट सेंटर’ या रुग्णालयाने दैनंदिन वापरातील जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एक लाख रुपये दंड का करण्यात येऊ नये, अशी नोटीस सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांनी फिरती वेळी डॉ. दयासागर पाटोळे यांना बजावली आहे.
सदरचे रुग्णालय दैनंदिन निर्माण होणाऱ्या कचऱ्याची बेकायदेशीर पध्दतीने विल्हेवाट लावत असल्याचे आज फिरतीवेळी सकृतदर्शनी स्पष्ट झाले. हे रुग्णालय जैववैद्यकीय कचरा अशास्त्रीय पध्दतीने साठा करीत आहे. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियम, अटींचा भंग करून नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक परिस्थिती निर्माण केलेली आहे. याबाबत तीन दिवसांत खुलासा प्राप्त न झाल्यास आरोग्य विभागामार्फत रुग्णालयावर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये मध्ये नमूद केले आहे.
कराडची ग्रामदेवता कृष्णामाई मंदिरातील दरवाजे तोडून चोरी
कराड : कराडची ग्रामदेवता कृष्णामाई मंदिराच्या तीन दरवाजांची कुलपे तोडून गाभाऱ्यातील तिजोरीतून ओवाळणी पात्रातील सुमारे सातशे रुपयांची नाणी व किरकोळ नोटा अशी रक्कम चोरट्याने चोरून नेली. कृष्णाघाट व तेथील कृष्णामाई मंदिरासह संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी भूमिहिनांकरिता ‘लँड बँक’; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना
सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेचा लाभ गोरगरीब आणि भूमिहीन कुटुंबीयांना मिळण्यासाठी आणि ही योजना प्रभावीपणे अमलात येण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ‘ लँड बँक ‘ ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे. यात सरकारी गायरान आणि शर्तभंग जमिनी घेऊन ही लँड बँक योजना हाती घेऊन लाभार्थ्यांना नाममात्र एक रुपये दराने पाचशे चौरस फूट आकाराचे भूखंड देण्याची कल्पना आहे.
औरंगजेबचे स्टेटस ठेवल्याने भंडाऱ्यात तणाव; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
भंडारा : औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. नुकतीच नागपूरमध्ये याच कारणावरून दंगल घडली. त्याची धग कायम असताना भंडाऱ्यातही रात्रीपासून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. एका आरोपी तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर औरंगजेबचे स्टेटस ठेवले. एवढेच नाही तर इतरांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह पोस्ट सुद्धा टाकल्या.
नागपूर: भालदारपुरा परिसरात दंगलखोरांनी केला महिला पोलिसांचा विनयभंग
नागपूर : शहरातील महाल गांधी गेट परिसरात उसळलेल्या दंगलीने वेगळेच वळण घेतले आहे. भालदारपुरा परिसरात हिंसाचार करणाऱ्या जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उगारला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोरांनी महिला पोलिसाची वर्दी फाडण्याचा प्रयत्न करून, तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
नागपुरात हिंदू- मुस्लिम मित्रांमध्ये एकी, दंगलग्रस्त भागातील…
नागपूर: मैत्रीला जात- धर्म नसतो. नागपुरात दंगल आणि हिंसाचार झाल्यावरही या भागातील हिंदू- मुस्लिम मित्रांमध्ये एकोपा कायम असल्याचे सकारात्मक चित्र पुढे येत आहे. गीतांजली चौक परिसरात आजू- बाजूला दुकान असलेल्या सैय्यद तौफिक आणि मुकेश गंगोत्री या दोघा मित्रांनी घटनेच्या दिवशी एकी दाखवत कश्या प्रकारे एक- मेकांना मदत केली. सोबत नेमके काय घडले याबाबत माध्यमांना सांगितले.
कल्याणमधील नववर्ष स्वागत यात्रेत सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी
कल्याण – कल्याण संंस्कृती मंच आणि इनरव्हिल क्लब ऑफ कल्याणतर्फे हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांची यावेळी रेलचेल असणार आहे. या सांस्कृतिक मेजवानीत स्वारंगिणी हा गाण्यांचा कार्यक्रम, दीपोत्सव आणि महा रांगोळी हे उपक्रम असणार आहेत. हेच या वेळच्या स्वागत यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
वागळेच्या कचरा हस्तांतररण केंद्रामुळे उद्योग नगरीची कोंडी
ठाणे : वागळे इस्टेट येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचरा नेण्यास स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्यानंतर आता ठाणे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचू लागले आहेत. महापालिकेच्या नियोजनाविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असतानाच, या हस्तांतरण केंद्राविषयी उद्योजकांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Live Updates : सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करू नका, गृहराज्यमंत्र्यांचे आवाहन
पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक काय असतो हे दाखवलं जाईल. पोलिसांचं मनोबल कमी होता कामा नये. अशावेळेला कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे, असे आदेश दिले आहेत. व्हिडिओ व्हायरल करून काही साध्य होणार नाही. आपल्याच महाराष्ट्राची बदनामी देशात करू. फेसबुक आणि इन्स्टाग्राम नियंत्रणात करता येतं. व्हॉट्सअॅपवरून होणारे व्हिडिओ कंट्रोल करता येत नाहीत – योगेश कदम, गृहराज्यमंत्री
Maharashtra Live Updates : नागपुरात आजही संचारबंदी, लोकांना बाहेर पडण्यास निर्बंध
संचारबंदी असलेल्या ठिकाणी वाहतूक सेवाही थांबण्यात आल्या आहेत. रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालय सुरू ठेवण्यात आल्या आहेत. संचारबंदी उठेपर्यंत लोकांना बाहेर जाता येणार नाही – राहुल मदने, पोलीस उपायुक्त, नागपूर</p>
Maharashtra Live Updates : भाजपाच्या ‘पोटात’ नवा शिवाजी वाढतोय; नागपूर राडाप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून बोचरी टीका
छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रात एकोपा निर्माण केला. आज मात्र महाराष्ट्र दुभंगला आहे व धर्मद्वेषाने पेटला आहे. कुराणाची प्रत कोठे मिळाली तर सन्मानाने परत करा असं छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र सांगते. मात्र नागपुरात कुराणातील आयती जाळण्याचा प्रकार झाला. राजापुरात होळींचे खांब मशिदीत घुसवून दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्रात पेटवापेटवी सुरू आहे ती औरंगजेबाच्या नावाने. चारशे वर्षांपूर्वी गाडलेल्या औरंग्या पुन्हा जिवंत केला गेला. कारण भाजपाच्या पोटात नवा शिवाजी वाढतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माफ करा! – सामना अग्रलेख (उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र)
महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन
Maharashtra News Live Today, 19 March 2025 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा