Mumbai, Maharashtra Rains News Live Updates, July 14, 2022 : दोन दिवसांसाठी मुंबई, संपूर्ण कोकणासह राज्यात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारीही मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले होते.मुंबईमध्ये आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ४७ टक्के पाऊस पडला आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत २२०० ते २५०० मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत महिन्याभरातच ११०० मिमी पाऊस पडला आहे.
तर राज्यातील सत्ता पालटल्यानंतर भाजपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आज द्रौपदी मुर्मू आज मुंबईत येत असून यानिमित्ताने पाठिंबा देणाऱ्या पक्षांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. असं असतांना द्रौपदी मुर्मू आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
राज्यातील अशा विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Today : राज्यातील विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…
राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलमध्ये कर कपात केली असून यामुळे पेट्रोल प्रतिलिटर ५ आणि डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झालं आहे.
वसईच्या वाघरळ पाडा येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी बिल्डर आणि जमीन मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तीन चाळ बिल्डरांविरोधात एमआरटीपीएअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दुर्घटनेनंतर बिल्डर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. वाचा सविस्तर बातमी…
ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्ष उन्मळून पडण्याबरोबरच फांद्या पडण्याचे सत्र थांबता थांबत नसून गेल्या चोवीस तासात शहरात तब्बल ३२ वृक्ष उन्मळून पडले आहेत. १३ ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत तर ९ झाडे धोकादायक स्थितीत असल्याचे समोर आले आहे. या घटनांमध्ये कुणीही जखमी झालेले नसले तरी यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाचा सविस्तर बातमी…
सलग पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक नागरी वस्त्यांत पाणी शिरले आहे. ५५१ लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ २ दिवसांपासून २२ वाहनचालक आपल्या ट्रकमध्येच अडकून पडले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. वाचा सविस्तर बातमी…
कात्रज भागात मोलमजुरी करुन एकट्या राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना उघडकी आली. ज्येष्ठ महिलेकडील दागिने लांबवून चोरटा पसार झाला. वाचा सविस्तर बातमी…
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील जलसाठा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. आजघडीला तलावांमध्ये एकूण नऊ लाख ५२ हजार दशलक्ष लिटरवर वापरायुक्त पाणी उपलब्ध झाले असून पाणी तुटवड्याची चिंता मिटली आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा साठा सर्वात जास्त म्हणजेच तिप्पट आहे. वाचा सविस्तर बातमी…
मुंबई शहर आणि उपनगरांत गुरुवारी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील २४ तासांमध्ये शहर आणि उपनगरात मध्यम ते अति जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे. तर, सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे आज देखील (गुरुवार) मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रक काहीसे विस्कळीत झाले होते. वाचा सविस्तर बातमी…
“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रबरोबरच इंटरनेटच्या माध्यमातून जगभरात अल्पवाधित लोकप्रिय झालेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांना या डायलॉगमुळे घरी मात्र रोषाला सामोरं जावं लागलंय. शहाजीबापू यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भातील खुलासा केलाय. येथे वाचा सविस्तर वृत्त.
'झाडी, डोंगार, हाटील'ने सारेच झाले इम्प्रेस पण शहाजीबापूंनी घरात पाऊल ठेवताच पत्नी म्हणाली, "काय ते बोलून राहीला डोंगार बिंगार, नीट…"https://t.co/go7cVIDw1G
— LoksattaLive (@LoksattaLive) July 14, 2022
सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू यांनी घरी गेल्यावर काय घडलं हे सांगितलंय…#shivsena #ShahajibapuPatil #SocialViral
पुणे जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. या ठिकाणी जाताना पर्यटकांनी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. लोणावळा, खंडाळा, लोहगड, पवना धरण परिसर, सिंहगड, मढेघाट आदी ठिकाणी पर्यटनाला जाताना काळजी घेण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी बंडखोरी करणारे शिवसेनेचे नेते आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भविष्यात नक्की एकत्र येतील असं मत व्यक्त केलं आहे. “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रातील कनाकोपऱ्यात पोहचलेल्या शहाजीबापू यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना हे विधान केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त.
भविष्यात शिंदे आणि ठाकरे एकत्र येतील का?; शहाजीबापू म्हणाले, “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य हे सर्व आमदारांच्या…”https://t.co/PHPcOL4SqX
— LoksattaLive (@LoksattaLive) July 14, 2022
जनता शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला#EknathShinde #UddhavThackarey #Shivsena #BJP #Maharashtra
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना फुटल्याचा आरोप केल्यानंतर या आरोपांवरुन आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांना लक्ष्य केलं आहे. शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे शरद पवार यांचा हात होता असं म्हणणाऱ्या केसरकरांना आव्हाड यांनी, “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?” असा प्रश्न विचारलाय. आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय. येथे वाचा सविस्तर वृत्त.
‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”https://t.co/LVQTNcryNX
— LoksattaLive (@LoksattaLive) July 14, 2022
शिंदे गटाच्या प्रक्त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन केली टीका#EknathShinde #SharadPawar #DeepakKesarkar #Shivsena #NCP #JitendraAwhad
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’बद्दल बोलू नये असं मत व्यक्त केल्यानंतर निलेश राणे यांनी कठोर शब्दांमध्ये केसरकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन निलेश यांनी काही ट्वीट करत केसरकर यांना लक्ष्य केलं आहे. केसरकरांविरोधात संताप व्यक्त करणारी काही ट्वीट बुधवारी रात्री निलेश राणेंनी केली असून यामध्ये केसरकरांनी राणे कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त करताना आम्ही गप्प बसणार नाही, असं सांगण्यात आलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त.
“…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापलेhttps://t.co/mE5N5lPWIa
— LoksattaLive (@LoksattaLive) July 14, 2022
सावंतवाडीमध्ये केसरकरांनी केलेल्या विधानावरुन वाद#NileshRane #NarayanRane #DeepakKesarkar #Shivsena #BJP #UddhavThackarey
राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार असणारे यशवंत सिन्हा यांनी उद्धव ठाकरेंवर भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर दबाव असल्याने त्यांनी आपल्या जागी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला असं यशवतं सिन्हा गुवाहाटीत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. मी कोणत्या राजकीय पक्षाशी नाही, पण कदाचित केंद्र सरकारसोबत लढत आहे असंही यावेळी ते म्हणाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यादरम्यान राज ठाकरे यांना मात्र हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. एबीपी माझाशी बोलताना राज ठाकरेंनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडून अमित ठाकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याची ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र राज ठाकरेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नव्या सरकारला आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
काँग्रेसकडून शिंदे आणि फडणवीसांकडे शिवसेनेची तक्रार करण्यात आली असून शिवसेनेच्या अनैतिक कृतीवर तातडीने पावलं उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र-मुंबई पाऊस लाइव्ह अपडेट्स