Maharashtra Legislative Council Election Live: राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या आज, सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. महाविकास आघाडीपुढे सहाही जागा जिंकण्याचे आव्हान असताना, भाजपाने पुन्हा आघाडीला तडाखा देऊन सरकार स्थिर नाही, हा संदेश देण्याची योजना आखली आहे. या निवडणुकीत ‘अकरावा’ म्हणजे पराभूत होणारा उमेदवार कोण असेल याचीच उत्सुकता आहे. सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील एक जागा रिक्त आहे तर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता मावळली आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २५ ते २६ मतांची आवश्यकता असेल. गुप्त पद्धतीने मतदान होत असल्याने मतांची फाटाफूट होण्याची शक्यता वर्तविली जाते. राज्यसभेत राजकीय पक्षांची मते फुटली नव्हती. पण, विधान परिषदेत काहीही होऊ शकते, हे साऱ्याच पक्षांचे नेते सूचित करीत आहेत.  

Live Updates
10:42 (IST) 20 Jun 2022
विधानभवनात दाखल होताच शिवसेना आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी विधानभवनात दाखल होताच शिवसेना आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी

10:37 (IST) 20 Jun 2022
विधानपरिषदेसाठी आतापर्यंत १०० आमदारांचे मतदान

विधानपरिषदेसाठी आज सकाळी ९ वाजता मतदान सुरु झाले असून, आतापर्यं १०० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

10:25 (IST) 20 Jun 2022
शिवसेनेचे आमदार विधानभवनात दाखल

शिवसेनेचे आमदार विधानभवनात दाखल झाले आहेत. शिवेसेना आमदारांसोबत मंत्री आदित्य ठाकरे हे देखील विधानभवनात आले आहेत. एकनाथ शिंदे हे देखील विधानभवनात दाखल झालेले आहेत.

10:09 (IST) 20 Jun 2022
आम्हाला धोका असेल तर समोरच्यांना नाही का? – संजय राऊत

राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात विधान परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा चुरशीची लढत होत आहे. या निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे सर्व आमदार एकत्र आहेत असे म्हटले आहे. वाचा सविस्तर…

10:02 (IST) 20 Jun 2022
मतदानाच्या पहिल्या तासात ६५ आमदारांचे मतदान

मतदानाच्या पहिल्या तासात ६५ आमदारांचे मतदान केले. यामध्ये भाजपाच्या ५० तर राष्ट्रवादीच्या १५ आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

10:01 (IST) 20 Jun 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून विधानभवनाकड रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून विधानभवनाकड रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर व अन्य नेते आहेत.

09:46 (IST) 20 Jun 2022
काँग्रेसचे आमदार विधानभवनात दाखल; थोड्याचवेळात बैठक होणार

काँग्रेसचे सर्व आमदार दोन बसद्वारे विधानभवनात दाखल झाले असून,थोड्याचवेळात या सर्व आमदारांची बैठक होणार आहे.

09:34 (IST) 20 Jun 2022
दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार; पाच वाजता मतमोजणी सुरू होणार

विधानपरिषद निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपासून सुरुवात झाली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार असून, पाच वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

09:32 (IST) 20 Jun 2022
भाजपाचे सर्व आमदार विधानभवनातील पक्ष कार्यालयात दाखल

भाजपाचे सर्व आमदार विधानभवनातील भाजपा कार्यालयात दाखल झाले असून, या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सर्व भाजपा आमदरांना सूचना देऊन, मतदानास पाठवत आहेत.

09:30 (IST) 20 Jun 2022
भाजपाला पाच जागा जिंकण्यासाठी १३० मतांची गरज

भाजपाला पाच जागा जिंकण्यासाठी १३० मतांची गरज लागेल. राज्यसभेत भाजपाला पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. यातूनच भाजपाचे नेते पाचही जागा जिंकण्याबाबत आशावादी आहेत.

09:28 (IST) 20 Jun 2022
भाजपचा पाचवा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे विजयासाठी पुरेशी मते नाहीत

विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. भाजपचा पाचवा आणि काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराकडे विजयासाठी पुरेशी मते नाहीत. त्यामुळे अपक्ष आणि छोटय़ा पक्षांच्या २९ आमदारांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

09:22 (IST) 20 Jun 2022
मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासात १५ आमदरांचे मतदान

मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या अर्धा तासात १५ आमदरांचे मतदान झाले आहे.

09:21 (IST) 20 Jun 2022
भाजपा नेते हरिभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क

भाजपा नेते हरिभाऊ बागडे यांनी सर्वप्रथम बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.

09:19 (IST) 20 Jun 2022
विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानास सुरुवात

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी ९ वाजता सुरुवात झाली आहे. सर्व पक्षाचे आमदारे विधानभवनात मतदानासाठी दाखल होत आहेत.