लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तरी शिवसेनेचा शिंदे गट अनेक जागांवरील त्यांचे उमेदवार जाहीर करू शकलेला नाही. महाराष्ट्रात महायुतीत काही जागांवर तिन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामध्ये कल्याण लोकसभेचाही समावेश आहे. मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. परंतु, त्यांना कल्याणमध्ये भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अद्याप त्यांच्या मुलाची उमेदवारीदेखील जाहीर करू शकले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या महायुतीतल्या स्थानाबद्दल, अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ज्या खासदारांच्या विरोधात मतदारसंघात विरोधी वातावरण होतं त्या खासदारांच्या लोकसभेसाठी उमेदवाऱ्या जाहीर होऊनही नंतर त्या रद्द करण्यात आल्या. असाच प्रकार कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या़बाबतीत घडेल. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसेल, अशी टिप्पणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांनी केली आहे. अशाच प्रकारचं वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनीदेखील केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas kadam says if shrikant shinde does not get nomination i will retire from politics asc
First published on: 05-04-2024 at 22:52 IST