MLC Election Result : गेल्या काही दिवसांपासून शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आली होती. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. यासह अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण अशा एकूण पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.

Live Updates

Teachers-Graduate MLC Election Live Update: शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?

15:15 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: “नाशिकमध्ये वेगळंच काहीतरी व्हायला लागलंय का?” शुभांगी पाटील यांचा सवाल!

महाविकास आघाडीनं काम केलं नसतं तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते. सत्यजीत तांबेंनी सांगितलं म्हणून ते आमदार होतील असं नाही. पण बॅनरबाजीवर कायद्यानं बघितलं पाहिजे. कारवाई व्हायला हवी होती. आचारसंहितेचा भंग करणं कितपत योग्य आहे हे बघायला हवं. नाशिक विभागात काहीतरी वेगळंच व्हायला लागलंय का? असा प्रश्न मला पडलाय – शुभांगी पाटील

15:13 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: शुभांगी पाटील त्र्यंबकला दर्शनासाठी दाखल!

त्र्यंबकचं दर्शन घेतलं. बाबांना सगळं सांगितलं. जनतेला विजयी कर, असं साकडं घातलं आहे. बाबांचं दर्शन घेणं हे माझं कर्तव्य आहे – शुभांगी पाटील

14:35 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे आघाडीवर

औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे आघाडीवर आहेत. विक्रम काळे यांना आत्तापर्यंत १९ हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. नागपूरपाठोपाठ औरंगाबामध्येही पदवीधर निवडणुकीत भाजपाला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे. भाजपाचे किरण पाटील हे पिछाडीवर आहेत. किरण पाटील यांना १३ हजारांहून जास्त मतं मिळाली आहेत. सहा हजारांहून जास्त मतांनी विक्रम काळेंनी आघाडी घेतली आहेत.

14:28 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नागपूरमध्ये मविआच्या सुधाकर आडबालेंची विजयाकडे वाटचाल

नागपूमध्ये सुधाकर आडबाले यांना आत्तापर्यंत १३ हजार मतं पडली आहेत. मविआचे उमेदवार असलेले सुधाकर आडबाले हे आत्तापर्यंत सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष सुरू केला आहे. या निवडणुकीत प्राधान्याने एकच मुद्दा होता की जुनी पेन्शन योजना झाली पाहिजे. भाजपाचे नागो गाणार मागे पडले आहेत, कारण ते ज्या पक्षाकडून उभे होते त्या पक्षाला ही भूमिका मान्य नाही असं आडबाले यांनी माध्यमांना सांगितलं आहे.

14:12 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमरावतीत पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर

अमरावती पदवीधर : पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर

मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या मतांचे गठ्ठे धीरज लिंगाडे यांच्यासाठीचे. दुपारी ३ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता

13:32 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमोल मिटकरींचं खोचक ट्वीट!

कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले प्रथम त्यांचे अभिनंदन. EVM पेक्षा बॅलेट वर सुद्धा भाजप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने EVM ऐवजी बॅलेट वर घेण्याचे औदार्य दाखवावे. – अमोल मिटकरी</p>

13:15 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: सत्यजीत तांबे भाजपात जाणार?

सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत. मी एवढंच सांगितलं की तांबे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधानपरिषदेत अपक्ष म्हणून राहता, त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता. तांबे निवडून येतील अशी मला १०० टक्के खात्री आहे. – दीपक केसरकर

वाचा सविस्तर

12:44 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: औरंगाबादमध्ये मविआ आघाडीवर, भाजपाची पिछाडी

औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे आघाडीवर असून भाजपाचे किरण पाटील पिछाडीवर पडल्याचं दिसून येत आहे. एकीकडे कोकणात भाजपानं मोठ्या बहुमतानं पहिल्या विजयाची नोंद केली असताना औरंगाबादमध्ये भाजपाला संघर्ष करावा लागत असल्याचं दिसून येत आहे.

12:31 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: “मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे रात्री-बेरात्री जाऊन…”, ज्ञानेश्वर म्हात्रेंची विजयानंतर प्रतिक्रिया!

हा विजय माझ्या एकट्याचा नसून सर्व शिक्षकांचा आहे. गेल्या ६ वर्षांतल्या कामाची पोचपावती शिक्षकांनी दिली आहे. ३३ संघटनांचा मला पाठिंबा होता. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आज सुफळ झालाय. त्यावरच आज हा विजय झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुदानाच्या प्रलंबित प्रश्नावर मी आंदोलनं केली. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे रात्री-बेरात्री जाऊन हा प्रश्न सोडवला होता. आता पेन्शनचा प्रश्नही मला सोडवायचा आहे. गेल्या ६ वर्षांत शिक्षक नसलेल्या माणसाने आम्हाला मागे टाकलं होतं. हा बदला त्याचा घेतला आहे शिक्षकांनी – ज्ञानेश्वर म्हात्रे

12:24 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कोकणात मविआच्या पाठिंब्यानंतरही बाळाराम पाटलांचा पराभव

या निवडणुकीत मला अनपेक्षित असा निकाल समोर आला आहे. मी निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केलं, त्यांचे आभार व्यक्त करतो. कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलानं मान्य करतो. आलेला निकाल मान्य करून पुढे मार्गक्रमण करण्याचा माझा विचार आहे – बाळाराम पाटील, शेकापचे उमेदवार

12:20 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रेंना २० हजाराहून जास्त मतं!

कोकण मतदारसंघातील शिक्षकांचे आभार मानेन की त्यांच्या एकजुटीमुळे ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाचही जिल्ह्यातील मंत्री, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या पाठिशी होते. या मतदारसंघात आजपर्यंत फक्त शिक्षक आमदार झाले आहेत. तीच परंपरा शिक्षकांनी राखली आहे – ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या बंधूंचा दावा

12:17 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: “..त्यांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फसवलं आणि…”

नाशिक विभाग पदवीधरची निवडणूक चर्चेत होती. पण एका उमेदवाराने दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फसवलं. दोन्ही राष्ट्रीय पक्ष त्याच्यामागे उमेदवारी घेऊन फिरत होते. पण त्यानं उमेदवारी न घेता अपक्ष उमेदवारी घेतली. दोन्ही पक्षांची मतं मिळवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीच्या निमित्ताने नगर जिल्ह्यातील राजकारण कसं चालतं, हे पहिल्यांदा स्पष्ट झालं – सुभाष जंगले, अपक्ष उमेदवार, नाशिक

12:09 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: संगमनेरमध्ये सत्यजीत तांबेंच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुण्यापाठोपाठ संगमनेरमध्येही सत्यजित तांबे यांच्या विजयाचे निकालाआधीच बॅनर झळकले. स्थानिक कार्यकर्त्यांनी हे बॅनर्स लावल्याचं सांगितलं जात आहे.

12:04 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: शंभूराज देसाईंना शिंदे गट-भाजपा युतीच्या बहुमताची खात्री!

आम्ही या निवडणुकीचं चांगलं नियोजन केलं होतं. मतदारांपर्यंत पोहोचून आम्ही चांगली तयारी केली आहे. आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना, भाजपा आणि मित्रपक्षांना मिळेल – शंभूराज देसाई, शिंदे गटाचे आमदार

12:03 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कोकणात भाजपाचे उमेदवार आघाडीवर

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कोकणात भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर…

12:01 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमरावतीमध्ये १९२ मतं ठरली वैध!

अमरावतीमध्ये स्वयंघोषणा पत्र अर्थात सेल्फ अॅफिडेविट सादर न केल्यामुळे ७३ मतं ठरली बाद!

11:36 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: नागपुरात नागो गाणार की सुधाकर आडबाले?

नागपुरात माझ्या बाजूने कल दिसून येत आहेत. सर्वाधिक पसंती क्रमांक माझ्याबाजूने असल्याचं दिसत आहे. पहिल्या फेरीतील ट्रेंड शेवटपर्यंत कायम राहील. मी निवडून येईन हे नक्की आहे – सुधाकर आडबाले, मविआचे उमेदवार

11:12 (IST) 2 Feb 2023
अमरावती पदवीधर मतदार संघात मतमोजणी सुरू, निकालाची उत्‍कंठा

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने  निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. मतमोजणीला बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे सकाळी ८ वाजतापासून सुरूवात झाली.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 2 Feb 2023
नागपूर : उत्सुकता शिगेला, मतमोजणी सुरू, गाणार, अडबाले की झाडे?

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजतापासून सुरुवात झाली असून शिक्षकांचा कौल विद्यमान आमदार नागोराव गाणार यांच्या बाजूने जाणार की माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले वा शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यापैकी एका नवीन चेहऱ्याला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता लागली आहे.

सविस्तर वाचा

10:42 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: आमच्या सर्व जागा निवडून येतील – अर्जुन खोतकर

विधानपरिषद निवडणुकीत आमच्या सर्व जागा निवडून येतील, अर्जुन खोतकरांचा दावा!

10:34 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: “..म्हणून मीच विजयी होणार”, शुभांगी पाटील यांनी सांगितलं गणित!

विजय फार दूर नाही. फार चांगल्या मतांनी हा विजय होईल. मतदान १ लाख २९ हजार ४५६ इतकं झालं आहे. त्यातून बाद होणाऱ्या मतांनंतर कोटा ठरवला जाईल. जे प्रमाण ठरवलं जाईल, त्यानुसार विजयी उमेदवार ठरेल. त्यानुसार विजयासाठी जो कोटा आहे, त्यापेक्षा जास्त मतदारांना मी वैयक्तिकरीत्या ओळखते. त्यामुळे विजय माझाच आहे – शुभांगी पाटील

10:13 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: अमरावतीमध्ये २६५ पोस्टल मतांची मोजणी पूर्ण

अमरावतीमध्ये २६५ पोस्टल मतांची मोजणी पूर्ण

10:04 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: “मराठवाड्यात यंदा परिवर्तन होणार”, किरण पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

आम्हाला १०० टक्के खात्री आहे. निश्चितपणे यावेळी मराठवाड्यात परिवर्तनाची लाट दिसतेय. भाजपा आणि शिवसेना आघाडीचा विजय होईल – भाजपा उमेदवार किरण पाटील

09:55 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: पोस्टल मतांनंतर आता मुख्य मतमोजणीला सुरुवात!

नाशिकसह पाचही मतदारसंघात पोस्टल मतमोजणी पूर्ण झाली असून या ठिकाणी आता नियमित मतांच्या मोजणीला सुरुवात झाली आहे.

09:09 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: शुभांगी पाटील यांना विजयाचा विश्वास!

नाशिकमधील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. नाशिकच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडी वाढल्या होत्या. त्यामुळे इथल्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

08:29 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: पुण्यात निकालाआधीच तांबेंच्या विजयाचे पोस्टर

पुण्यामध्ये सत्यजीत तांबेंच्या विजयाचे पोस्टर झळकले असून त्यामुळे अनेकांच्या भुवयाय उंचावल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत आहे.

08:06 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: मी आमदार झाल्याशिवाय मरणार नाही – रवींद्र डोंगरदेव

आमदार झाल्याशिवाय रवींद्र डोंगरदेव मरणार नाही हे लक्षात ठेवा. मी सुरुवात कमी वयात केली आहे. नक्कीच आयुष्यात यशस्वी होणार. मी वेळेत सुरुवात केली. चांगली सुरुवात अर्ध यश असतं. पुढच्या वेळी रवींद्र डोंगरदेव आमदार असणारच. – अपक्ष उमेदवार रवींद्र डोंगरदेव

08:04 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: पाच मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात

शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे निकाल आज हाती येणार असून नागपूर, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या पाच मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

08:01 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: सध्या या पाच मतदारसंघात कोण आहेत आमदार?

नाशिक – नाशिकमध्ये काँग्रेसकडून सुधीर तांबे आमदार होते. मात्र, बंडखोरीनंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं.

अमरावती – अमरावतीमध्ये भाजपाकडून रणजीत पाटील आमदार होते.

कोकण – कोकण शिक्षक मतदारसंघात शेकापचे बाळाराम पाटील आमदार होते.

नागपूर – नागपुरात भाजपाच्या पाठिंब्यावर अप आमदार नागो गाणार गेल्या निवडणुकीत जिंकून आले होते.

औरंगाबाद – औरंगाबादेत राष्ट्रवादीचे विक्रम काळे आमदार होते.

07:59 (IST) 2 Feb 2023
MLC Election Results: कुठे, कुणामध्ये कशी आहे लढत? – कोकण

कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघात मविआचे उमेदवार बाळाराम पाटील आणि भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात थेट लढत आहे.

Maharashtra mlc election result 2023 Live: पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल

Teachers-Graduate MLC Election Live Update: शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज कोण बाजी मारणार?