Prakasah Amabdekar : महाराष्ट्र सरकारचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होतो आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला. ज्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakasah Amabdekar ) यांनी राज ठाकरेंना टाडा कायद्या अन्वये अटक करावी, सरकारने तशी हिंमत दाखवावी अशी मागणी केली आहे. अमरावतीत ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांना राज ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आला. ज्यानंतर सरकारने हिंमत दाखवून राज ठाकरेंना अटक केली पाहिजे असं म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर ( Prakasah Amabdekar ) यांनी ही मागणी केल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीविरोधात मनसे आक्रमक होण्याची चिन्हं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे काय म्हणाले होते?

महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या भागात ज्या प्रकारचे फ्लायओव्हर्स होत आहेत हे का होत आहेत? मुळच्या लोकसंख्येसाठी नाही होत. बाहेरून येणाऱ्यांसाठी होत आहेत. आपल्या ठाणे जिल्ह्यात देशामधला असा एकमेव जिल्हा आहे ज्यात सात ते आठ महानगरपालिका आहेत. ग्रामपंचायत, नगरपरिषद, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि मग महानगरपालिका हे स्तर लोकसंख्येनुसार वाढत जातात. एका जिल्ह्यात सात ते आठ महानगर पालिका असतील तर ही लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा मोठ्या प्रमाणात आहे, मग त्या शहरांत आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यासाठी सरकारचा पैसा खर्च होतो”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत प्रकाश आंबेडकर ( Prakasah Amabdekar ) यांना विचारलं असता त्यांनी थेट राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली.

हे पण वाचा- Prakash Ambedkar : “ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका, कुणबी मराठा हे खरे…”, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य

प्रकाश आंबेडकर यांची मागणी काय?

राज ठाकरेंसारख्या व्यक्तीवर टाडा लागला पाहिजे. सरकारने मागेपुढे न पाहता त्यांना तुरुंगात टाकून मोकळं झालं पाहिजे. महाराष्ट्रातला माणूस उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आहे. गुजरातमध्येही मराठी माणसं आहेत त्यांचं काय करायचं? समाज दुभंगण्याची वक्तव्य हे करत आहेत. समाज दुभंगला की देश दुभंगतो. नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट आणि युएपीएच्या कायद्यान्वये कारवाई झाली पाहिजे. टाडा तर तातडीने लागला पाहिजे. सरकारने हिंमत दाखवून त्यांना अटक करावी असं प्रकाश आंबेडकर ( Prakasah Amabdekar ) यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं काय वक्तव्य केलं?

आणखी काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी असंही म्हटलंय की, “आरक्षण बचाव यात्रा सुरू केली. याला यश मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या यात दोन गट पडले .एक मराठा आणि दुसरा ओबीसी… मात्र काही जणांचे मनसुबे या यात्रेतून ते उध्वस्त झाले आहेत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vba chief prakash ambedkar demad to govt raj thackeray should be jailed under tada scj