Aamir Khan Singing Raag Video Goes Viral : बॉलीवूड अभिनेता आमिर खान त्याच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. त्याची गणना इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये केली जाते. आमिर इंडस्ट्रीमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जातो. नुकताच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो गाताना दिसत आहेत. या व्हिओमुळे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत.
आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल भयानीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आमिर एका गायिकेबरोबर राग गाताना दिसत आहे. यामध्ये आमिर कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. आमिरचे हे टॅलेन्ट पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
आमिरचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. “तुम्ही चित्रपटांमध्ये गायला हवं”, “तुमचा आवाज खूप छान आहे. हिडन टॅलेन्ट”, “आमिर खाननेही गायनात करिअर करावे.” अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. आमिर खानच्या गायन प्रतिभेने सर्वजण प्रभावित झालेले दिसत आहेत.
कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ‘सितारे जमीन पर’ नंतर आमिर खान त्याच्या चित्रपट निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहे. आमिरच्या ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटात सनी देओल दिसणार आहे. लवकरच आमिर खान सलमान आणि शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसू शकतो अशा बातम्याही आहेत. अलीकडेच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये शूटिंग सेटवर तीन व्हॅनिटी व्हॅन दाखवण्यात आल्या आहेत ज्यावर आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांची नावे लिहिलेली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या वेब सीरिजमध्ये तिन्ही खान एकत्र दिसू शकतात. अशी चर्चा आहे की शाहरुख स्वतःची भूमिका साकारणार आहे. सलमान आणि आमिर कॅमिओ भूमिका करताना दिसणार आहेत. या अपडेटनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.