big boss 16 bollywood actor salman khan reveal why his mom did not watch the show | Loksatta

“माझी आई बिग बॉस पाहत नाही , कारण…”, सलमान खानने केला खुलासा

सलमान खानने त्याची आई ‘बिग बॉस’ बघत नसल्याचाही खुलासा केला.

“माझी आई बिग बॉस पाहत नाही , कारण…”, सलमान खानने केला खुलासा
‘बिग बॉस हिंदी’चा १६ वा सीझन १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चवीने पाहिला जाणारा शो म्हणजे ‘बिग बॉस’. अतिशय लोकप्रिय असणाऱ्या ‘बिग बॉस हिंदी’चा १६ वा सीझन १ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले अनेक वर्ष बॉलिवूड अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करत आहे. त्याच्या खास शैलीने तो बिग बॉसच्या घरातील सदस्यांची शाळादेखील घेताना दिसतो.

‘बिग बॉस हिंदी १६’च्या टीमने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अभिनेत्री गौहर खानने या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन केले. ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वात कोणकोणते स्पर्धक असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. सलमान खानने या पत्रकार परिषदेत ‘बिग बॉस हिंदी १६’व्या सीझनमधील पहिल्या स्पर्धकाबाबत खुलासा केला. अब्दुल राजिक ‘बिग बॉस’च्या घरातील पहिला स्पर्धक असणार आहे.

हेही वाचा >> Video : ‘मलम पिथा’ गाण्यावर शाळकरी मुलांसह थिरकली कतरिना, व्हिडीओ व्हायरल

सलमान खानने यावेळी त्याची आई ‘बिग बॉस’ बघत नसल्याचाही खुलासा केला. गौहर खानने सलमानला “तुझी आई ‘बिग बॉस’ची फॅन आहे का? त्या शो बघून तुला काही सल्ले देतात का?”, असं विचारलं. यावर उत्तर देत सलमान “माझी आई पूर्वी ‘बिग बॉस’ पाहायची. ‘बिग बॉस’चा १४वा सीझनही तिने पाहिला होता. परंतु, या शोचा १५वा सीझन तिने पाहिलेला नाही. या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक होते. सीझनमध्ये काय झालं, याबद्दल तिला काहीच माहीत नाही. ती आता टीव्हीवरील इतर शो पाहते”, असं म्हणाला.

हेही वाचा >> Viral Video मुळे फेमस झाला अन् अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली थेट चित्रपटात गाण्याची संधी

पुढे तो म्हणाला, “माझी आई ‘बिग बॉस’ बघून मला खूप काही सुचवायची. त्यामुळेच मी एवढ्या चांगल्याप्रकारे हा शो करू शकतो. ‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांचं काहीतरी कर. त्यांची चांगलीच शाळा घे, असं ती मला म्हणायची”. ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या सीझनसाठी प्रेक्षक आतुर आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अजय देवगण आणि आयुष्मान खुराना लवकरच एकत्र पडद्यावर झळकणार; या दिग्दर्शकाच्या चित्रपटावर काम सुरू

संबंधित बातम्या

“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…” जितेंद्र आव्हाडांची अक्षय कुमारच्या लूकवर संतप्त प्रतिक्रिया
“मला संवाद बोलताना…” चित्रपटात अभिनय न करण्याबद्दल मलायकाने केले स्पष्ट वक्तव्य
Video: राम चरणने शहीद कर्नल संतोष बाबूंच्या मुलांसह घेतला सेल्फी; अभिनेत्याच्या कृतीने जिंकली नेटकऱ्यांची मनं
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
तब्बल २० वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होतोय रजनीकांत यांचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट; तिकीट फक्त ९९ रुपये

व्हिडिओ

ताज्या बातम्या
PAK vs ENG Test Series: ‘ओ भाई, आप चेअरमैन हैं’, पाकिस्तानच्या पराभवानंतर रमीझ राजावर भडकला शोएब अख्तर
“सावरकरांच्या सल्ल्यानुसारच….”; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य
IND vs BAN 2nd ODI: ‘जाळ अन् धूर संगटच…’ १५१ किमी उमरान मलिकचा वेग अन स्टंप हवेत उडाला पाहा video
मुंबई : गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
पुणे : बौद्ध पारिभाषिक शब्दकोशात आता चिनी भाषेचाही समावेश