Bigg Boss 19 Kunickaa Sadanand : ‘वीकेंड का वार’ या भागात होस्ट सलमान खान रागावलेला दिसला आणि त्याने काही स्पर्धकांना त्यांच्या वागण्याबद्दल फटकारले. ‘वीकेंड का वार’मध्ये कुनिका सदानंद यांचा मुलगा अयान लाल आला आणि आई व मुलामधील प्रेम पाहून सलमान खान भावूक झाला. कुनिका यांचा मुलगा अयानने सांगितले की, त्याला त्याच्या आईचा किती अभिमान आहे.

अयान म्हणाला, “संपूर्ण भारत तुला पाहत आहे. तू अदभुत काम करत आहेस. घरातले सगळे तुझ्या १२ वर्षांचं नातवंड, मी, तुझा मोठा मुलगा, तुझी सून, सगळे तुला पाहत आहेत. ज्या ट्रान्सजेंडर समुदायाला तू वकील म्हणून मदत केली आहेस, ते मला कॉल करीत आहेत. आज मी जे काही आहे, ते तुझ्यामुळे आहे. मी जगातील सर्वांत भाग्यवान व्यक्ती आहे की, तू माझी आई आहेस. तुला माझ्यासाठी मजबूत राहावे लागेल आणि तू बाहेर एक आधार प्रणाली आहेस.” त्याच्या आईला प्रोत्साहन देत अयान पुढे म्हणाला, “तू तुझ्या वडिलांसाठी, नंतर तुझ्या पतीसाठी आणि तुझ्या मुलांसाठी जगलीस – आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे, तू ६२ वर्षांची आहेस. तुला माझ्यासाठी मजबूत राहावे लागेल, आई.”

फरहानाला काय म्हणाला अयान?

सलमानने कुनिका यांचा मुलगा अयानला फरहानाशी बोलण्याची संधी दिली. अयानने सांगितले की, त्याच्या आईने तिच्या दुसऱ्या मुलाच्या ताब्यासाठी कसा संघर्ष केला. त्यामुळे केवळ घरातील सदस्यच नव्हे, तर यजमान सलमान खानही भावनिक झाले. फरहानाशी झालेल्या संभाषणादरम्यान, अयानने त्याच्या आईला फ्लॉप अभिनेत्री आणि वकील म्हटले तेव्हाच्या घटनेची आठवण करून दिली.

अयान म्हणाला, “एक लहान मुलगी आहे, जिचे एकमेव स्वप्न आहे की, एक लहान घर, एक नवरा, मुले असावीत आणि तिला आनंद हवा आहे. कारण- तिला बालपणात तिच्या पालकांकडून ते मिळाले नव्हते. तेव्हा ती १७ वर्षांची होती आणि तिने तिच्या वडिलांना सांगितले, ‘बाबा, मी या माणसावर प्रेम करते आणि मला त्याच्याशी लग्न करायचे आहे आणि तिने लग्न केले. लग्न यशस्वी झाले नाही आणि मुलाला एका हिल स्टेशनवरून कोणीतरी पळवून नेले. आता त्याचा ताबा घेण्यासाठी केस लढण्यासाठी, ती चित्रपट उद्योगात आली आणि पैसे कमवत होती. ती दर आठवड्याला मुंबई दिल्लीला विमानाने जायची, काहीही उरले नाही, १२ वर्षांनी केस लढल्यानंतर ती माझ्या भावाला भेटली. पण त्यानंतरही तिच्या मनातील प्रेम कमी झाले नाही आणि तिने माझ्या वडिलांशी लग्न केले. ती सर्व काही सोडून अमेरिकेत गेली आणि मग माझा जन्म झाला.”

अयान पुढे म्हणाला, “त्या लहान मुलीचे स्वप्न होते घर, पती आणि सुंदर मुलांचे. म्हणून जेव्हा तुम्ही सर्व जण म्हणता की, ती स्वयंपाकघरात अडकली आहे, तेव्हा तुम्ही सर्व जण म्हणता की, ती खात राहते, झीशान भाईदेखील तेच म्हणाले, अरे, तिला हे सर्व मिळाले नाही… तिला हे मिळाले नाही, तिच्याकडून संधी हिरावून घेऊ नका.” सलमानने स्पर्धकांना कुनिका यांना फ्लॉप अभिनेत्री म्हणणाऱ्यांना फटकारले आणि त्यांना आठवण करून दिली की, हे कोणाबरोबरही होऊ शकते. मागील भागात स्वयंपाकघर आणि जेवणावरून कुनिका यांचे झीशानशी भांडण झाले होते. ज्यासाठी झीशानने त्यांना सुनावले होते.