Huma Qureshi Rachit Singh: बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठी बातमी येत आहे. हुमाने बॉयफ्रेंडशी साखरपुडा केला आहे, अशा चर्चा होत आहेत. हुमाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं म्हटलं जातंय. तिच्या एका मैत्रिणीने फोटो पोस्ट केल्यानंतर हुमाच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हुमा कुरेशीच्या बॉयफ्रेंडचं नाव रचित सिंह आहे. हुमा व रचित यांनी एका खासगी सोहळ्यात साखरपुडा उरकला आहे. हुमा कुरेशी व रचित सिंहची कॉमन फ्रेंड, गायिका अकासा सिंगची इन्स्टाग्राम स्टोरी व्हायरल झाली आहे. अकासाची स्टोरी पाहिल्यानंतर हुमा व रचित यांनी साखरपुडा केला आहे, असं म्हटलं जात आहे.

अकासाने इन्स्टाग्राम स्टोरीवर हुमा आणि रचितबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोवर अकासाने लिहिलेल्या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे. “रचित व हुमा तुम्ही तुमच्या Piece of Heaven ला एक नाव दिल्याबद्दल अभिनंदन. ही रात्र खूप छान होती,” असं अकासाने फोटोवर लिहिलं आहे.

अकासा सिंगची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो- इन्स्टाग्राम)

रचित सिंह कोण आहे?

Who is Huma Qureshi BF Rachit Singh : ३९ वर्षांची हुमा कुरेशी व रचित सिंह गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट करत आहेत. मार्च २०२४ मध्ये शाहरुख खान आणि गौरी खानच्या घरी गायक एड शीरन आला होता, त्या पार्टीमध्ये हुमा आणि रचित एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. रचित सिंह हा एक अॅक्टिंग कोच आहे. त्याने आलिया भट्ट, रणवीर सिंह आणि विकी कौशल सारख्या टॉप स्टार्सना प्रशिक्षण दिलं आहे. तसेच त्याने रवीना टंडनच्या ‘कर्मा कॉलिंग’ या सीरिजमध्ये काम केलं होतं.

हुमा व रचित यांच्या साखरपुड्याच्या बातम्या येत आहेत. पण या दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही किंवा साखरपुड्याबद्दलही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हुमा कुरेशीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची ‘मालिक’ चित्रपटात झळकली होती. या सिनेमात हुमाने एक आयटम साँग केलं होतं. आता ती अक्षय कुमारचा अपकमिंग चित्रपट जॉली एलएलबी 3 मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हुमा ‘पूजा मेरी जान’ सिनेमात काम करणार आहे, या सिनेमात मृणाल ठाकुर मुख्य भूमिकेत आहे. तसेच हुमाच्या ‘महारानी 4’ या सीरिजचं कामही सुरू आहे. ही सीरिज यंदा सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊ शकते.