सलमान खान, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, सोनाली बेंद्रे असे एकापेक्षा एक दिग्गज कलाकार असलेला ‘हम साथ साथ है’ चित्रपट ५ नोव्हेंबर १९९९ मध्ये प्रदर्शित झाला. या कौटुंबिक कथेवर आधारित असलेल्या चित्रपटाने तेव्हा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. सुरूवातीला या चित्रपटात माधुरी दीक्षितला महत्त्वपूर्ण भूमिका देण्याचा दिग्दर्शकांचा विचार होता. परंतु, त्यानंतर माधुरीने हा चित्रपट नाकारला. यामागचं कारण अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “हेल्मेट रागाच्या भरात फेकून…”, अँजेलो मॅथ्यूजच्या टाईमआऊटवर मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाला, “आयुष्यात…”

माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांनी ‘साजन’, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यावेळी या जोडीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. यामुळेच अभिनेत्रीला भविष्यात ‘हम साथ साथ है’ ऑफर करण्यात आला. परंतु, माधुरीने हा चित्रपट नाकारला.

‘हम साथ साथ है’ चित्रपट नाकारण्याबद्दल माधुरी सांगते, “या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी ‘हम साथ साथ है’साठी माझ्याकडे विचारणा केली होती. मी करिश्मा कपूर किंवा सोनाली बेंद्रे यांनी साकारलेल्या भूमिका साकारू शकत होते. पण, सूरज यांना त्या भूमिका माझ्यासाठी योग्य वाटल्या नाहीत. बरीच चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला तब्बूने साकारलेली भूमिका म्हणजेच सलमानच्या वहिनीची भूमिका ऑफर केली.”

हेही वाचा : “ती सोडून गेली तेव्हा…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकांनी सांगितलं विशाखा सुभेदारने शो सोडण्याचं कारण

“चित्रपटातील एका सीनमध्ये सलमान खान त्याच्या वहिनीच्या पायांना हात लावून नमस्कार करतो असा सीन आहे. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील रोमान्सचं कौतुक झाल्यानंतर सलमानने माझ्या पायांना स्पर्श करून मला नमस्कार करणं मला ठीक वाटलं नाही. प्रेक्षकही पटकन हे स्वीकारू शकले नसते.” असं सांगत माधुरीने भूमिका नाकारण्यामागचं कारण स्पष्ट केलं.

हेही वाचा : मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव एल्विश यादव प्रकरणात; स्पष्टीकरण देत म्हणाला, “आम्ही सापांची तस्करी…”

दरम्यान, माधुरी दीक्षितनंतर सलमान खानच्या वहिनीची म्हणजेच साधना शर्मा ही भूमिका चित्रपटात तब्बूने उत्तमरित्या साकारली. या चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्याच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं. सलमान-माधुरी यांच्या जोडीबद्दल सांगायचं झालं, तर दोघांनी सर्वात आधी १९९१ मध्ये ‘साजन’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यानंतर दोघांनी १९९३ मध्ये ‘दिल तेरा आशिक’ आणि १९९४ मध्ये ‘हम आपके हैं कौन’मध्ये काम केलं. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress madhuri dixit revealed why she rejected hum saath saath hain movie sva 00