‘आदिपुरुष’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस प्रचंड चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला कधीपासून सुरुवात होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर आता अखेर ती तारीख जाहीर करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाचा सर्वत्र दबदबा होता. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर त्यानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील सर्व गाण्यांना आणि दुसऱ्या ट्रेलरला देखील उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाची तिकीटं काढण्यासाठी प्रेक्षक वाट पाहत होते. तर आता या चित्रपटाची तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट पहावी लागणार नाही.

आणखी वाचा : Adipurush 2nd trailer: नवे व्हीएफएक्स, जबरदस्त ॲक्शन अन्…; बहुप्रतीक्षित ‘आदिपुरुष’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करत या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग कधी सुरू होईल हे जाहीर केलं. त्यानुसार या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला रविवारपासून म्हणजेच उद्यापासून सुरुवात होईल. प्रेक्षकांना या चित्रपटाचा ॲडव्हान्स बुकिंग ऑनलाइन करता येईल आणि याचबरोबर थिएटरमध्ये जाऊनही तिकीटं काढता येतील.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

त्यामुळे आता ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाल्यावर या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंग ला कसा प्रतिसाद मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या चित्रपटाला आतापर्यंत एकूण मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट ॲडव्हान्स बुकिंगमधूनही मोठी रक्कम कमावेल अशी सर्वांना आशा आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १६ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush advance booking will be staring from tomorrow know how to book tickets rnv