‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा काही दिवसांपूर्वीच थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मोठमोठ्या उद्योगपती, राजकारणी आणि बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान या कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेल्या बॉलिवूड कलाकारांची बरीच चर्चा रंगली. ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक व आराध्यासह या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती. यावेळी ऐश्वर्याच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यादरम्यानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐश्वर्याने करिश्मा कपूरला टाळलं असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ऐश्वर्या मुलीसह फोटोसाठी पोझ देत असतानाच समोरच करिश्मा होती. करिश्माला पाहताच तिने तोंड छायाचित्रकारांकडे वळवलं. यावरुनच ऐश्वर्या व करिश्मा यांची चर्चा सुरू झाली. यामागचं कारण म्हणजे लग्नापूर्वी अभिषेक व करिश्मामध्ये असलेलं नातं. श्वेता बच्चनच्या लग्नामध्ये अभिषेक व करिश्मा एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. या दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं होतं. ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार, २००२मध्ये अभिषेक व करिश्माचा साखरपुडा झाला होता.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

आणखी वाचा – Video : “याला म्हणतात संस्कार”, मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीने केलं असं काही की…; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले, “पैसा असूनही…”

मात्र जया बच्चन यांच्यामुळे दोघांचं नातं तुटलं. लग्नानंतर करिश्माने चित्रपटांमध्ये काम करू नये अशी जया यांची इच्छा होती. तर दुसरीकडे करिश्माची आई बबिता यांचाही या लग्नाला विरोध होता. करिश्मा व ऐश्वर्या या दोघींमध्येही अगदी चांगली मैत्री होती. मात्र अभिषेकबरोबर लग्न ठरल्यानंतर या दोघींच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

आणखी वाचा – दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…”

जवळपास चार वर्षे अभिषेक व करिश्मा एकमेकांना डेट करत होते. अभिषेकबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिने संजय कपूरशी लग्न केलं. मात्र तिचं हे लग्नही फार काळ टिकलं नाही. २००७मध्ये अभिषेक व ऐश्वर्याचंही लग्न झालं. मात्र आज एखाद्या कार्यक्रमात ऐश्वर्या व करिश्मा एकमेकांसमोर आल्या तर बोलणं टाळतात हे या व्हिडीओमध्ये दिसून आलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai bachchan ignore krisma kapoor in neeta ambani party video goes viral on social media see details kmd