सध्या सगळीकडेच प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाची भव्यदिव्यता पाहता अवाढव्य खर्च करण्यात आला असल्याचं चित्र पाहायला मिळालं. शिवाय अनेक बॉलिवूड कलाकारांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. दरम्यान यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंबही उपस्थित होतं. यावेळी मुकेश अंबानी व नीता अंबानींची मुलगी ईशा अंबानीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. काही महिन्यांपूर्वीच ईशाने जुळ्या मुलांना जन्म दिला. मायदेशी परतल्यानंतर ईशा बऱ्याचदा कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. आता तिच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक होताना दिसत आहे. ईशाने तिच्या वागणूकीमधून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. आणखी वाचा - दोन मुलं, अफेअर, १३ वर्षांचा संसार मोडला अन्…; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचा उल्लेख करत शबाना म्हणाल्या, “प्रेम होतं म्हणून…” आणखी वाचा - “लग्नापूर्वी माझे अफेअर्स होते पण…”, लग्नानंतर वनिता खरातचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाली, “याआधी मी…” ईशा ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’च्या उद्घाटन सोहळ्या दरम्यान फोटोंसाठी विविध पोझ देताना दिसली. तिने लाल रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. ईशाने यावेळी छायाचित्रकारांशी प्रेमळ संवाद साधला. ती म्हणाली, "तुम्ही इथे आल्याबाबत तुमचे आभार. तुमच्या उपस्थितीमुळे आम्हाला खूप आनंद झाला. कार्यक्रमामधून जाण्यापूर्वी सगळ्यांनी जेवून जा". आणखी वाचा - Video : धर्मेंद्र यांच्या फार्महाऊसवर जोरदार दारू पार्टी, स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “माझे मित्र…” ईशाने सगळ्यांना आपुलकीने व काळजीपूर्वक जेवून जाण्यास सांगितलं. ईशाच्या या स्वभावामुळे तिच्यावर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. श्रीमंती असूनही अजून पाय जमिनीवरच आहेत, पैसा असूनही संस्कार कायम आहेत, याला म्हणतात संस्कार, तू किती चांगली आणि गोड आहेस, समोरच्या व्यक्तीचा आदर कसा करावा हे हिच्याकडून शिकावं, आज तू मन जिकलं अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.