बॉलीवूड अभिनेता सलमान खान व अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच चर्चेत असतात. एक काळ असा होता, जेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. सगळीकडे त्यांच्याच नात्याची चर्चा सुरू होती. मात्र, हे नाते जास्त काळ टिकले नाही, काही वर्षातच दोघे वेगळे झाले. ब्रेकअपनंतरही त्यांच्या नात्याची अनेकदा चर्चा रंगताना दिसते. ब्रेकअपनंतर दोघे पहिल्यांदाच ‘एक था टायगर’ चित्रपटात एकत्र झळकले होते. दरम्यान, एका मुलाखतीत ‘एक था टायगर’ चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी सलमान व कतरिनाबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- …म्हणून जया बच्चन सोशल मीडियापासून राहतात लांब; त्यांनीच सांगितले कारण म्हणाल्या, “आपल्याबद्दल..”

अलीकडेच कबीर खानने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्या मॅशेबल इंडिया या नवीन पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी ‘एक था टायगर’मध्ये कतरिना आणि सलमानला एकत्र कास्ट करण्यामागचा खुलासा केला. कबीर म्हणाला, “एक था टायगर चित्रपटासाठी आम्ही कतरिनाला आधीच साइन केले होते. चित्रपटात तिची झोयाची व्यक्तिरेखा होती आणि मग आम्ही सलमान खानकडे गेलो. याच काळात त्यांचे ब्रेकअप झाले होते. असे असूनही या दोघांनी चित्रपटात उत्तम काम केले. पण, त्यावेळी दोघे एकमेकांबरोबर काम करताना अवघडल्यासारखे वाटत होते.”

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि कतरिनाने २००५ मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र, पाच वर्षातच त्यांचे नाते तुटले. २०१० मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर कतरिनाने रणबीर कपूरला डेट करायला सुरुवात केली. मात्र, कतरिनाचे रणबीर कपूरसोबतही ब्रेकअप झाले होते. यानंतर कतरिनाने २०२२ मध्ये अभिनेता विकी कौशलबरोबर लग्नगाठ बांधली.

हेही वाचा- अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुखचा हटके अंदाज, किंग खानचं गुजराती ऐकून सगळेच झाले थक्क! म्हणाला, ‘तबीयत एकदम…’

सलमान खान आणि कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘मैने प्यार क्यूं किया’, ‘पार्टनर’, ‘हॅलो’, ‘युवराज’, ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’मध्ये एकत्र काम केले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दोघांचा ‘टायगर ३’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८६ कोटी रुपयांची कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director kabir khan revealed salman khan and katrina kaif was not comfortable to do film ek tha tiger due to breakup dpj